माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे समजते.भाजपा च्या तुलनेत राज्यात काँग्रेसची अवस्था तशी बरी नाही हे नाकारून चालणार नाही.पक्षीय व्यवस्था सुधारण्यासाठी पृथ्वीराजबाबांसारखा मिस्टर क्लीन नेता काँग्रेसच्या बळकटीसाठी राज्यात प्रभावी ठरू शकतो या उद्देशाने पृथ्वीराज बाबा राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
आ पृथ्वीराज बाबा हे काँग्रेसचे निष्ठावन्त नेते म्हणून देशात परिचित आहेत.सध्या राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या जडणघडणीत काँग्रेसच्या वतीने त्यांचे योगदान मोठे आहे.मात्र या सरकारमध्ये त्यांना कोणतेही मंत्रिपद नको असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.भाजपा ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यातील हे सरकार बनल्याचे राज्यातील चित्र आहे.मात्र या तीन पक्षाच्या आघाडी सरकारमधील काँग्रेसची राज्यातील संघटनात्मक घडी इतरांच्या तुलनेत बसवण्याची गरज निर्माण झाली आहे.सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आहे तसेच राज्याचे महसूलमंत्री म्हणूनही ते कारभार पाहत आहेत.त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी पक्षाने दिल्याने पक्षवाढीकरिता त्यांना वेगळा वेळ देऊन काँग्रेससाठी संघटनात्मक काम करणे तितकेसे शक्य होत नसल्याचे दिसते आहे,त्यामुळे काँग्रेस पक्षाला संघटनात्मक कामासाठी खास वेळ देणारा नवा अध्यक्ष राज्यात हवा आहे की जेणेकरून राज्यातील पक्षाची स्थिती बळकट होऊ शकेल, आणि त्यासाठी काँग्रेस हायकमांडने आ पृथ्वीराज चव्हाण यांना यासाठीची जबाबदारी देण्याची तयारी दर्शवली असल्याचे वृत्त आहे.
येत्या आठवड्यात कराड येथे माजी आ विलास्काका पाटील उंडाळकर व आ पृथ्वीराज बाबा यांचा एकत्रित काँग्रेस पक्षाचा मेळावा होणार आहे. इतिहासात प्रथमच या दोन नेत्यांचा एकत्रित मेळावा काँग्रेस पक्षासाठी होत असल्याने याची मोठी चर्चा आहे.याच दरम्यान विलास्काका यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य ऍड उदयसिह पाटील यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित केला आहे.मात्र सध्या आ पृथ्वीराज बाबा येथे नाहीत,ते दिल्ली दरबारी असल्याचे समजते.ते येथे आल्यानंतर हा मेळावा पार पडणार आहे.दरम्यान याच आठवड्यात काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाबांच्या नावाची घोषणा होऊन, बाबा या मेळाव्याला राज्याचे प्रदेशअध्यक्ष म्हणून थेट दिल्लीहुन येऊन येथे हजर राहतील व जिल्ह्याला सुखद धक्का देतील अशी काँग्रेसजनांमध्ये चर्चा आहे.त्यामुळे काँग्रेसजनांना त्यांच्या दिल्लीहून येण्याचा "इंतजार' आहे,... त्यांच्या येण्याची प्रत्येक काँग्रेसप्रेमी वाट पाहताना दिसतो आहे...पाहूया काय होतंय ते...
No comments:
Post a Comment