येथील कार्यक्षम नगरसेवक सौरभ पाटील यांच्या खेळाडूंविषयीच्या संवेदनशीलतेचे दर्शन कराड शहराला नुकतेच झाले.लॉक डाऊन काळात येथील स्टेडियम बंद अवस्थेत होते. झालेल्या पावसाने त्याची दुरावस्था देखील झाली होती, शहर व परिसरातील खेळाडूची त्याकारणाने कुचंबना होत होती.दरम्यान शासनाने स्टेडियम खुले करण्याबाबत सूचना केल्यानंतर सौरभ पाटील त्यांनी तातडीने काल येथील पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्टेडियमची दुरुस्ती करायला सुरुवात करावी अशा सूचना केली,त्यानुसार कामकाजास सुरुवात झाली आहे. या निमित्ताने तात्यांच्या खेळाडूंविषयीच्या संवेदनशीलतेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
येथील नगरसेवक सौरभ पाटील यांना युवकांचे आशास्थान मानले जाते.त्यांच्या कामाचा अवाका मोठा आहे.सकाळपासून सायंकाळ पर्यंत नियमित पालीकेत हजर राहून ते शहरातील जनतेची कामे करताना दिसतात.त्यांचे कोरोना काळात कोणतीही जाहिरातबाजी न करता केलेलं काम आजही सर्वांच्या लक्षात आहे.राजकारणापलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करण्याची वैचारिक ताकद आपल्या ऊराशी बाळगणारे राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांचा नुकताच वाढदिवस मोठ्या आनंदाने शहरातील जनतेने साजरा केला.विशेष म्हणजे सर्व राजकीय पक्षातील लोकांनी त्यांच्या वाढदिनी त्यांना अभिष्टचिंतन करण्याकरिता शहरातील चौकाचौकातून गर्दी केलेली पहायला मिळाली.
त्यात्या अजादशत्रू आहेत.सभ्य व संवेदनशील राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे, सर्वच सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करण्यात त्यांना इंटरेस्ट आहे. त्याचाच प्रत्यय शहरातील खेळाडूंना नुकताच आला.येथील खेळाडूंसाठी लॉक डाऊन काळापासून स्टेडियम उपलबद्ध होत नव्हते.खेळाडूंची खेळाशिवाय होणारी तगमग तात्यांच्या कानावर अनेकवेळा येथील खेळाडू घालत होते.दरम्यान शासनाने खेळाडूंसाठी स्टेडियम खुले करण्याबाबतचे आदेश दिले त्यानंतर मात्र, सौरभ तात्यांनी येथील पालिका अधिकाऱ्यांसमवेत स्टेडियमची पाहणी केली व बरेच दिवस बंद अवस्थेत असलेले स्टेडियम दुरुस्त करण्याबाबत सूचना करून लवकरात लवकर ते खेळाडूंसाठी योग्य अवस्थेत तयार करण्याच्या सूचना केल्या. कला, क्रीडा,सांस्कृतिक याविषयी जबरदस्त प्रेम व व्यासंग असणाऱ्या तात्यांच्या या जाणतेपणाचे कौतुक करेल तेवढे कमी आहे. त्यांनी वाचन संस्कृती जपण्यासाठी शाळांमधून वाचक विद्यार्थी घडावेत म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाचन चळवळ सुरू केली आहे...
राजकारण राजकारणाच्या ठिकाणी होतच राहील,पण त्याच्या पलीकडे जाऊन सभ्यता, वैचारिकता,व संवेदनशीलता याच्या आधारे सामाजिक घटकांच्या अनेकविध प्रश्नांचा विचार करण्याची क्षमता ठेवून त्याची सोडवणूक करण्यासाठी धडपडणाऱ्या या युवा नेतृत्वाचा कराडकराना अभिमान असलाच पाहिजे...
I proud of him and my best wishes with him.
ReplyDeleteGreat leader tatyasaheb
ReplyDelete