Thursday, November 26, 2020

देवेंद्र फडणवीसांनी केला विक्रम पावस्करांच्या कार्याचा गौरव...आपल्या फेसबुक पेजवर पावस्करांसोबतचा फोटो केला व्हायरल...जिल्ह्यात जोरदार चर्चा...

कराड
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे सोबत काढलेला फोटो ठेवला आहे.आणि त्यावर  "अंगी भगवा आणि आचरणात छत्रपतींचा सांगावा असलेला खरा हिंदुत्ववादी छावा' हे वाक्य लिहिलं आहे.विक्रम पावस्करांच्या राजकीय जीवनाला भविष्यात खूप उंचीवर घेऊन जाणारे हे वाक्य आहे...त्यांच्या नेतृत्वाची शहर, तालुक्यासह जिल्ह्याला खऱ्या अर्थाने भविष्यात मोठी गरज असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.  

विक्रम पावसकर हे ग्राउंड वर काम करणारे जनतेचे नेते आहेत.वडील नगरसेवक विनायक पावसकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकारणात ते मार्गक्रमण करीत आहेत. लोकांसाठी त्यांनी प्रत्येक अडचणीवेळी रस्त्यावर उतरून काम केल्याचे सर्वानाच महित आहे. ते नगरसेवक असताना पालिकेच्या फ़ंड्स ची वाट न पाहता रस्त्याचे काम स्वतःच्या पैशातून करण्याचा आगळा विक्रम त्यांच्या नावावर आजही आहे.कोणतेही सण किंवा सामाजिक कार्यक्रम असो ,त्यांचे योगदान शहरातील जनतेसाठी भरभरून असते.समाजासाठी काम करायचे असेल तर एखादे मंत्रिपद पाहिजे,किंवा सत्तेतच असले पाहिजे असं काही नसतं,तर विधायक कार्यासाठी धडपड करायची प्रवृत्ती आणि अडचणीच्या काळात लोकांना मदत करण्यासाठी धावून जाण्याचे धाडस या दोन गोष्टी लागतात.भाजपा चे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर हे याच पठडीतले. त्यांची लोकांशी थेट नाळ असल्याने  नेहमीच सामाजिक कार्यात ते अग्रेसर दिसतात. मागील लॉक डाऊन काळात त्यांनी मोठं काम केलं आहे. गरजुना अत्यावश्यक मदत करण्यासह मजुरांच्या स्थलांतरणाचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. टेम्परेचर व ऑक्सिजन टेस्टिंगसहित कोरोना पेशंटच्या गरजेनुसार ऑक्सिजन मशीनची उपलब्धताही त्यांच्या मित्रपरिवाराच्यावतीने कोरोना काळात करण्यात आली आहे.त्यांनी "बाप्पा आपल्या दारी' ही अभिनव कल्पनादेखील गणेशउत्सवाच्या पार्शवभूमीवर यशस्वीरीत्या राबवली आहे.
 कोरोनाच्या संकटाने सम्पूर्ण जिल्हा होरपळलेल्या अवस्थेत असताना व सगळी हॉस्पिटल्स पेशंट्सनी फुल्ल असताना घरातच अनेकजण उपचार घेत होते,अशा पेशंटसची संख्यादेखील काही हजारात होती,तेव्हा व्हेंटिलेटरविना पेशंट दगावत होते.रुग्ण दगावण्याचा रेशीओ वाढला होता. अशावेळी विक्रम पावसकर मित्र परिवार लोकांसाठी धावून आला.त्यांच्या वतीने येथील टिळक हायस्कुल येथे 25 बेड चे कोविड सेंटर उभे राहले व त्या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांना उपचार मोफत मिळाले. अडचणीवेळी समाजासाठी धावून येण्याच्या त्यांच्या याच बांधिलकीचे नेहमीप्रमाणे सम्पूर्ण जिल्ह्यातून कौतुक झाले.इतरांनीही त्यांच्या एकूणच कार्याचा आदर्श घ्यावा अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त होत असतानाच नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर  विक्रम पावस्करांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.पावस्करांच्या एकूणच  जिल्ह्यातील पक्ष कार्यासह सामाजिक कार्याची पोच देण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या बरोबर पावस्करांचा असलेला फोटो शेअर करून त्यावर"अंगी भगवा आणि आचरणात छत्रपतींचा सांगावा असलेला खरा हिंदुत्ववादी छावा'हे त्यांचा गौरव करणारे वाक्य लिहिले आहे.खरच... एखाद्या कर्तृत्ववान तरुण नेतृत्वाला कसे "नवाजावे'... याचे हे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल...सध्या फडणवीसांच्या या पोस्टची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्या नेतृत्वाचा एवढा गौरव करतात अशा नेतृत्वाची गरज सातारा जिल्ह्यासह कराड शहर व तालुक्याला नक्कीच आहे हेही फडणवीसांनी भाजपाच्या भविष्याकरिता या पोस्टच्या माध्यमातून सुचवलेही आहे......विक्रम पावस्करांच्या कार्याचा हा केलेला गौरव भाजपच्या प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे... असलीच पाहिजे...मात्र पक्षाच्या व राजकारणांच्या भिंती ओलांडून, छत्रपतींच्या विचाराची शाल पांघरून सर्वसामान्यांच्या मनात घर करत युवकांना दिशा देण्यासाठी सरसावलेल्या   या युवा नेतृत्चाचा अभिमान कराडकर म्हणून यापुढे प्रत्येकालाही असायला हवा हेही तितकेच खरे!!

1 comment:

  1. चांगले सामाजिक कार्य
    अभिनंदन

    ReplyDelete