Sunday, November 15, 2020

"कृष्णे 'ची निवडणूक झाली जाहीर : मोहितेंच्या मनोमिलनाचे पुढे काय झाले ? भोसलेची मात्र निवडणुकीसाठी "फुल्ल' तयारी.?? कार्यक्षेत्रात चर्चेला उधाण...


वेध माझा ऑनलाइन
कराड : येथील कृष्णा सह. साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली  आहे. कृष्णेच्या रणांगणात पुन्हा भोसले-मोहिते ही पारंपारिक झुंज दिसेलच. मात्र अविनाश मोहितेंची तयारी स्वातंत्रपणे या लढाईत  असल्याने ही निवडणूक तिरंगी होणार की दोन्ही मोहितेंचे मनोमिलन होऊन भोसले विरूद्ध मोहिते एकत्र येऊन लढणार अशी चर्चाही अद्याप आहेच...मनोमिलनाच्या चर्चेसाठी मोहितेंच्या बैठका झाल्या... चालु आहेत...एवढंच समजतय...दुसरीकडे मात्र भोसलेंनी या निवडणुकीसाठी "फुल्ल' तयारी केल्याचे दिसते आहे...भोसले गटाकडून उमेदवारी अर्ज भरण्याचा धडाका देखील सुरू झाला आहे  

सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुका कार्यक्षेत्र असलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे.आज २५ मे पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. २९ जून रोजी मतदान होणार असून १ जुलैला मतमोजणी होणार आहे

 माजी मंत्री कै विलासराव पाटील-उंडाळकर व आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या झालेल्या मनोमिलनाचे मोठे परिणाम दाखवणारी ही निवडणूक ठरेल. गाव पातळीवर विलासकाकांचे नेतृत्व मानणारे राजकारण ‘कृष्णे’साठी भोसलेंच्या पथ्यावर पडते हे नेहमीचे चित्र असते. मात्र झालेल्या मनोमिलनाने यापुढे हे चित्र बदलण्याची चिन्हे आहेत का ? हे पहायचे आहे. 
आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानसभेच्या झालेल्या विजयासाठी कृष्णेचे माजी अध्यक्ष व पृथ्वीराज बाबांचे कट्टर समर्थक इंद्रजित मोहिते यांनी आपले मोठे योगदान दिले आहे. भोसलेंचा पराभव व्हावा म्हणून त्यांनी दिवसाची रात्र केल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. याचे बक्षिस म्हणून या होणार्‍या कृष्णेच्या निवडणुकीतून इंद्रजितबाबाना विजयश्री देण्याकरिता आ.पृथ्वीराज चव्हाण प्रयत्न करणार हे नक्की आहे त्यांच्या बरोबरोने ना विषवजित कदम हेदेखील फक्त  इंद्रजित बाबांनाच यावेळी चेअरमन म्हणून  बघण्यास इच्छुक असल्याने त्यांचाही ठिया आता कृष्णा कार्यक्षेत्रात दिसेल.  

दुसरीकडे राष्ट्रवादीचे दक्षिणचे नेते कृष्णेचे माजी चेअरमन अविनाश मोहिते हे देखील या निवडणुकीत आत्मविश्वासाने उतरले आहेत.त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेसह आपला एकट्याचाच फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने या निवडणुकीत आपली ऐकला चलो रे ची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे का अशी चर्चा आहे तरीही अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांचे वेगवेगळे पॅनेल पडणार की पृथ्वीराज बाबांच्या मध्यस्थीने हे दोघे एकत्र भोसलेंना फाईट देणार? हे कळणे बाकी आहे. दुसरीकडे इंद्रजित मोहिते यांनी आपली स्वतंत्रपणे तयारी या निवडणुकीसाठी सुरू केली आहेच. अचानकपणे अविनाश मोहितेंना जवळ केल्यास सभासद समर्थक व उमेदवार नाराज होतील का? अशी त्यांना भिती आहे. तर अविनाश मोहितेंनादेखील  मनोमिलन झाल्यास तशाच प्रकारची भीती आहे 
 कारखान्याच्या झालेल्या ‘त्या’ बहुचर्चित कर्ज प्रकरणाची अद्यापही चर्चा चघळली जात असते त्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न यानिवडणुकीत महत्वाचा आहेच... सभासद कितपत आणि कोणावर विश्‍वास ठेवतात हे देखील या निवडणुकीत यानिमित्ताने पहावे लागणार आहे. तरीही प्रिथ्वीराजबाबा यांची भूमिका हे मनोमिलन घडवण्यात निर्णायक ठरते का याकडेही लक्ष आहे...

कृष्णा कारखाना बंद अवस्थेत जातो की काय? अशी भिती मागील पंचवार्षिक निवडणुकीनंतर निर्माण झाली असताना भोसलेंनी अडचणीत असणारा कारखाना पुन्हा सुरळीत केला. तसेच कृष्णेने राज्यात उच्चांकी दर दिला असे भोसले समर्थक निवडणुकीच्या तोंडावर ठामपणे सांगताना दिसतायत. दक्षिणेच्या राजकारणाचे पडसाद या निवडणुकीवर नेहमीच उमटतात त्यामुळे काका-बाबा गटाच्या मनोमिलनाचाही या निवडणुकीवर काय परिणाम होणार? हेदेखील पहायचे आहे. कारण काका समर्थक भोसलेंच्या पाठीशी यापूर्वी अनेकदा दिसलेही आहेत. इंद्रजित मोहितेंनी कारखान्याच्या वार्षिक सभेपूर्वी पत्रकार परिषद घेऊन भोसलेंवर टिका करणे या पलिकडे या पाच वर्षात कृष्णेच्या सभासदांसाठी दुसरे काही काम केलय का ? अशी चर्चा त्यांच्याबद्दल नेहमीच ऐकायला मिळते तर अविनाश मोहिते यांनी बाहेर काहीही चर्चा झाली तरी आजअखेर चुप्पीच साधली आहे. एकूणच  दोन्ही मोहिते गट आपापल्या जागी अजूनही ठाम आहेत या दोघांचा मनोमिलनाचे पुढे काय हा प्रश्न आहेच... मात्र भोसले गट फुल्ल तयारीत या रिंगणात उतरल्याचे चित्र आहे  सध्याची ही वर-वर दिसणारि परिस्थिती असली तरी ऐन रणधुमाळीत जसा जसा धुरळा उडेल तसे तसे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे... 

1 comment: