कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराजबाबा चव्हाण याना दोन दिवसांपूर्वी इन्कमटेक्स ची नोटीस आली असल्याचे स्वतः पृथ्वीराज बाबानी आज पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितले.निवडणूक काळात दिलेल्या "एफिडीवेट'मध्ये चुकीची माहिती दिली असे कारण पुढे करत ही नोटीस आल्याचे त्यांनी सांगितले. नोटीस पाठवून बदनामी करण्याचे यामागे षडयंत्र आहे.पवार साहेबानादेखील ई डी ची नोटीस पाठवून असा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला होता.मी या नोटीसीला माझे योग्य उत्तर देणार आहे असेही ते म्हणाले. ऐन दिवाळीत मला नोटीस पाठवून या नोटीसरूपाने मला शुभेच्छा दिल्या आहेत असेही म्हणत त्यांनी यावेळी मिश्किल टिप्पणीही केली.
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पत्रकारांबरोबर दिवाळी फराळाचा आस्वाद घेत केलेल्या अनौपचारिक चर्चेवेळी ते पत्रकारांशी बोलत होते.दरम्यान जिल्ह्यातील काही भाजपाचे नेते काँग्रेसमध्ये भविष्यात येतील असे संकेतही त्यांनी यावेळी बोलताना दिले. या झालेल्या चर्चेद्वारे त्यांनी विविध विषयांवर चर्चा करत पत्रकारांशी मुक्त संवाद साधला.
बिहार निवडणुकीमध्ये आम्ही कमी पडलो अशी कबुली देत तेजस्वी यादव यानी मिळवलेली मते भविष्यात त्यांना उत्तर भारतातील मोठा नेता म्हणून घडवू शकतात अशी भविष्यवाणी देखील त्यांनी यावेळी केली.भाजप पैसे,जाहिरातबाजी याच्या जोरावर सांम,दाम,दंड,भेद,चा वापर करत राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली. नितीश कुमार यांना भाजपापेक्षा कमी जागा मिळूनही त्यांना भाजपने मुख्यमंत्री करून त्यांचे एकप्रकारे खच्चीकरणच केले आहेआम्ही बिहार निवडणुकीत कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करत आहोत असेही ते यावेळी म्हणाले.
राज्यात व देशात मोठे पक्ष टिकणे महत्वाचे आहे.लहान पक्षामुळे समाजकारणात अस्थिरता येते असा अनुभव आहे,त्यामुळे यापुढील सर्वच स्तरावर निवडणुका पक्ष चिन्हावर झाल्यास या अडचणींवर आळा बसायला मदत होईल.पदवीधर निवडणुकीत व शिक्षक मतदार संघात आम्ही मित्रपक्षांशी केलेल्या राजकीय समझोत्याने जागा लढवत आहोत, भाजप ला सत्तेपासून दूर ठेवणे हा यामागचा आमचा उद्देश आहे.या निवडणुकीत आम्ही निश्चित यशस्वी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मी मुखमंत्री असताना मराठा आरक्षणाबाबत जो आदेश काढला त्यात स्वल्पविरामचाही बदल न करता भाजपने तोच आदेश पुन्हा काढला.मात्र त्या आदेशाला कोर्टाने फेटाळल्यामुळे आता तो कसा चालणार? असा सवाल करत त्यांनी भाजपच्या मराठा आरक्षण भूमिकेवर टीका केली,मात्र सध्याच्या सरकारची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका व्यकत करण्याबाबत त्यांनी अप्रत्यक्ष नकार दर्शवला. दरम्यान अशोक चव्हाण या आरक्षण समितीवर चांगले काम करत असल्याची पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.
कराड दक्षिण मध्ये माजी मंत्रीविलासकाकांबरोबर आम्ही एकत्र येऊन येथेही भाजपला रोखण्याचे काम करणार असल्याचे ते म्हणाले.दरम्यान येथील नगरपरिषदेच्या राजकारणाबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता, निवडणूक येऊं दे मग बोलतो... असे म्हणून त्यांनी येथील पालिका निवडणुकीसाठी विरोधकांना घरी बसवण्यासाठीची आपली रणनीती आत्तापासूनच तयार असल्याचे संकेत आपल्या बोलण्यातून दिले.
No comments:
Post a Comment