Sunday, January 31, 2021

आज 64 जण बाधित

 सातारा दि.31 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 64 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर  एका  बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झालाअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील*   सातारा 5, शनिवार पेठ 1, गोडोली 2, कुडाळ 1,शाहुनगर 1, खोजेवाडी 1, जगतापवाडी 1, देशमुख कॉलनी 1, सुतार कॉलनी 1, जकातवाडी 1, कोडोली 1,
*कराड तालुक्यातील*   
*फलटण तालुक्यातील* मळवडी 1,   
*वाई तालुक्यातील*   सोनगिरवाडी 1, रविवार पेठ 1, 
*खटाव तालुक्यातील* मांडवे 4, वडुज 8, येराळवाडी 1,   पळसगांव 1, मांडवे 4,
*माण तालुक्यातील*    
*कोरेगाव तालुक्यातील*    कोरेगांव 1, आर्वी 1, पिंपरी 1, सुरली 2, सासुर्वे 3,  रहिमतपूर 1, साप 2, ल्हासुर्णे 1, कडेगांव 2, एकंबे 1,  
*खंडाळा तालुक्यातील*  शिरवळ 2, भावकलवाडी 1, अहीरे 1,
*जावळी तालुक्यातील*    
*पाटण तालुक्यातील*   मारुल 2, कढणे 1,विढणी 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील*   महाबळेश्वर 2,पाचगणी 1, 
*इतर*   
* एका बाधिताचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये नायकाची वाउी ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष या एका कोविड बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. 

*एकूण नमुने-312742*
*एकूण बाधित -56442*   
*घरी सोडण्यात आलेले -53849*  
*मृत्यू -1817* 
*उपचारार्थ रुग्ण-776* 

 
0000

Saturday, January 30, 2021

आज कराडातील सोमवार पेठेत c c tv कॅमेऱ्यांचे होणार लोकार्पण..भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्करांचा उपक्रम... आ शिवेंद्रसिहराजे भोसले,सुधीर गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती...

कराड
भाजपा चे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी स्वखर्चातून केलेली अनेक कामे शहराला माहीत आहेत, आणखी एक उपक्रम त्यांनी नुकताच उभा केला आहे.येथील सोमवार पेठेत त्यांनी सुरक्षा कॅमेरे स्वखर्चाने बसवले आहेत लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी हे सामाजिक पाऊल उचलले आहे.त्याचा लोकार्पण सोहळा आ श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिहराजे भोसले आणि आ सुधीर गाडगीळ यांचे हस्ते आज सोमवारी सायंकाळी सहा वाजता संपन्न होत आहे.

विक्रम पावसकर हे ग्राउंड वर काम करणारे जनतेचे नेते आहेत.वडील नगरसेवक विनायक पावसकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकारणात ते मार्गक्रमण करीत आहेत. लोकांसाठी त्यांनी प्रत्येक अडचणीवेळी रस्त्यावर उतरून काम केल्याचे सर्वानाच महित आहे. ते नगरसेवक असताना पालिकेच्या फ़ंड्स ची वाट न पाहता रस्त्याचे काम स्वतःच्या पैशातून करण्याचा आगळा विक्रम त्यांच्या नावावर आजही आहे.कोणतेही सण किंवा सामाजिक कार्यक्रम असो ,त्यांचे योगदान शहरातील जनतेसाठी भरभरून असते.समाजासाठी काम करायचे असेल तर एखादे मंत्रिपद पाहिजे,किंवा सत्तेतच असले पाहिजे असं काही नसतं,तर विधायक कार्यासाठी धडपड करायची प्रवृत्ती आणि अडचणीच्या काळात लोकांना मदत करण्यासाठी धावून जाण्याचे धाडस या दोन गोष्टी लागतात.भाजपा चे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर हे याच पठडीतले. त्यांची लोकांशी थेट नाळ असल्याने  नेहमीच सामाजिक कार्यात ते अग्रेसर दिसतात. मागील लॉक डाऊन काळात त्यांनी मोठं काम केलं आहे. गरजुना अत्यावश्यक मदत करण्यासह मजुरांच्या स्थलांतरणाचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. टेम्परेचर व ऑक्सिजन टेस्टिंगसहित कोरोना पेशंटच्या गरजेनुसार ऑक्सिजन मशीनची उपलब्धताही त्यांच्या मित्रपरिवाराच्यावतीने कोरोना काळात करण्यात आली आहे.त्यांनी "बाप्पा आपल्या दारी' ही अभिनव कल्पनादेखील गणेशउत्सवाच्या पार्शवभूमीवर यशस्वीरीत्या राबवली आहे.
 कोरोनाच्या संकटाने सम्पूर्ण जिल्हा होरपळलेल्या अवस्थेत असताना आणि सगळी हॉस्पिटल्स पेशंट्सनी फुल्ल असताना घरातच अनेकजण उपचार घेत होते,अशा पेशंटसची संख्यादेखील काही हजारात होती,तेव्हा व्हेंटिलेटरविना पेशंट दगावत होते.रुग्ण दगावण्याचा रेशीओ वाढला होता. अशावेळी विक्रम पावसकर मित्र परिवार लोकांसाठी धावून आला.त्यांच्यावतीने येथील टिळक हायस्कुल येथे 25 बेड चे कोविड सेंटर उभे राहले व त्या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांना उपचार अक्षरशः मोफत मिळाले. अडचणीवेळी समाजासाठी धावून येण्याच्या त्यांच्या याच बांधिलकीचे नेहमीप्रमाणे सम्पूर्ण जिल्ह्यातून कौतुक झाले.इतरांनीही त्यांच्या एकूणच कार्याचा आदर्श घ्यावा अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त होत असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर विक्रम पावस्करांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली होती. माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या बरोबर विक्रम पावस्करांचा फोटो शेअर करून त्यावर"अंगी भगवा आणि आचरणात छत्रपतींचा सांगावा असलेला खरा हिंदुत्ववादी छावा' असे त्यांचा गौरव करणारे वाक्य त्यावर लिहिले होते....खरच... एखाद्या कर्तृत्ववान तरुण नेतृत्वाला कसे "नवाजावे'... याचे हे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल...आता... सम्पूर्ण सोमवार पेठेतच त्यांनी सुरक्षेच्या ड्रीष्टीने स्वखर्चातून उभे केलेल्या सुरक्षा कमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा आज होत आहे...आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले,सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे.या उपक्रमाचे कौतुक सम्पूर्ण शहरातून होत आहे...

आज 86 जण बाधित

सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार   नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर 2  बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झालाअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील*  सातारा 2, खोजेवाडी 1, लक्ष्मीनगर 1, वंगल गोवे 1, चिमणगांव 1, काळज 5, शाहुनगर 1, निनाम पाडळी 1, सदरबझार 1,होळीचागांव 1, पानमळेवाडी 1, खेड 1, कोडोली 2, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 1,
*कराड तालुक्यातील*  बानुगडेवाडी 1, शेणोली 1, शिनवार पेठ 1,
*फलटण तालुक्यातील*  खडकी 1, डोंबलवाडी 1, बरड 1, चांभारवाडी 3, पाडेगाव 2, लक्ष्मीनगर 2, गिरवी 1, 
*वाई तालुक्यातील*  वाई 1, यशवंतनगर 2, 
*खटाव तालुक्यातील*   पुसेसवाळी 1, मांडवे 1, कळंबी 1,येराळवाडी 6,
*माण तालुक्यातील*  गोंदवले बु. 4, जाशी 1, 
*कोरेगाव तालुक्यातील*   पींपोडे 2, सासुर्वे 1, नांदवळ 1, रहिमतपूर 2,
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 8, पाडेगांव 4, लोणंद 1,
*जावळी तालुक्यातील*   काटवली 1, कळंबे 2,गोपाळपंताची वाडी 1, भिवडी 1,
*पाटण तालुक्यातील* मारुल 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* भिलार 1,पागचगणी 1, 
*इतर*  वाळवण आटपाडी 2, कडेगांव 2, वैभवनगर 1
* 2 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये मटगुलड ता. महाळेश्वर येथील 50 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 60 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. 

*एकूण नमुने-311590*
*एकूण बाधित -56376*   
*घरी सोडण्यात आलेले -53749*  
*मृत्यू -1816* 
*उपचारार्थ रुग्ण-813* 

 
0000

Friday, January 29, 2021

"कृष्णा' कारखान्याची साखर इंडोनेशियाला रवाना...

कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सभासद हिताचे निर्णय राबवत सहकारात आदर्श निर्माण केला आहे. कृष्णा कारखान्याच्या साखरेची चव संपूर्ण देशभरातील लोकांना चाखायला मिळतेच. पण आता सातासमुद्रापार राहणार्‍या परदेशातील लोकांनाही ’कृष्णा’च्या साखरेची चव चाखायला मिळणार आहे. कारण कृष्णा कारखान्याने उत्पादित केलेली साखर नुकतीच इंडोनेशियाला रवाना झाली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या केंद्र शासनाने कारखान्यांची आर्थिक तरलता सुधारावी. साखर कारखान्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून साखर निर्यात योजना जाहीर केली आहे. या योजनेस अनुसरून आणि मागील तसेच चालू हंगामातील शिल्लक साखर साठा विचारात घेऊन आणि सध्या पांढर्‍या साखरेला बाजारात कमी प्रमाणात असलेली मागणी, पर्यायाने मंदावलेला साखरेचा उठाव, बाजारात घसरलेले साखरेचे दर अशा अनेक बाबींचा विचार करून कारखान्यात रॉ शुगरची निर्मिती करण्याचे धोरण सर्वत्र अंगीकारण्यात आले आहे. या रॉ शुगरला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी आणि केंद्र सरकारचे सकारात्मक निर्यात धोरण याचा विचार करून, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी 2020-21 या गळीत हंगामात रॉ शुगर उत्पादित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच या हंगामात 5 लाख क्िंवटल कच्ची साखर तयार करून ती निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्यानुसार कारखान्यात उत्पादित केलेल्या साखरेचा पहिला ट्रक निर्यातीसाठी नुकताच पाठविण्यात आला.
या ट्रकचे विधिवत पूजन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, की केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत कृष्णा कारखान्याने साखर निर्यातीचा हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, या निर्णयाचा लाभ कारखान्यास होणार आहे.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, संजय पाटील, गिरीश पाटील, सुजित मोरे, अमोल गुरव, ब्रिजराज मोहिते, दिलीपराव पाटील, पांडुरंग होनमाने, गुणवंतराव पाटील, निवास थोरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, रघुनाथ मोहिते, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, सेक्रेटरी मुकेश पवार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) पी. डी. राक्षे आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आज 90 जण सापडले बाधित

सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 90 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झालाअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 6, कळंबे 1, बसाप्पा पेठ 2, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, तामजाईनगर 2, मंगळवार तळे 1, माजगाव 1, चिंचणेर वंदन 1, लिंब 2. मौजे पिलाणी 1.
*कराड तालुक्यातील* सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, बनुगडेवाडी 1, मलकापूर 1, रेठरे बु 1.
*फलटण तालुक्यातील* फलटण 1, कोळकी 1, फरांदवाडी 1, साठे फाटा गोखळी 1, निंबळक 1, निरगुडी 1, तरडगाव 2, वडगाव 1. 
*वाई तालुक्यातील* वाई 1, किकली 1. 
*खटाव तालुक्यातील*  वडूज 1, पुसेसावळी 1, पुसेगाव 1.  
*माण तालुक्यातील* मोगराळे 1, ढाकणी 1, दहिवडी 5, गोंदवले बु 2, शेवरी 2, पळशी 1. 
*कोरेगाव तालुक्यातील* पिंपोडे बु 1, साप 3, जळगाव 1, सातारा रोड 1, रहिमतपूर 11, निगडी 1, किरोली 1, सासुर्वे 3, धामणेर 1, पिंपरी 7. 
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1, शिंदेवाडी 3. 
*जावळी तालुक्यातील* कुडाळ 1, भिवडी 1, बामणोली 1. 
  *महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1. 
*इतर* 1,
*2 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये मोरवे ता. खंडाळा येथील 80 वर्षीय पुरुष, म्हसवे ता. जावळी येथील 83 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. 

*एकूण नमुने-310811*
*एकूण बाधित -56289*   
*घरी सोडण्यात आलेले -53690*  
*मृत्यू -1814* 
*उपचारार्थ रुग्ण-785* 

 
0000

Thursday, January 28, 2021

आज 54 जण बाधित

सातारा दि.28 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 54 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 4, माची पेठ 1, शाहुनगर 1,  करंजे 1, मल्हार पेठ 1, बोरेगाव 1, कुमठे 1, 
 *कराड तालुक्यातील* कराड 1, गुरुवार पेठ 1, वहागाव 1, शेनोली 1, 
*पाटण तालुक्यातील* पाटण 2, ढेबेवाडी 1, अवसारी 1, तारळे 1,  कुसरुन 1, मन्याचीवाडी 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 1, लक्ष्मीनगर 1, अलगुळेवाडी 1, वाघोशी 1, शिंदेवाडी 1, कोराळे 2,  
*वाई तालुक्यातील* वाई 1,  
*खटाव तालुक्यातील*  निमसोड 1, दारुज 1,  औंध 1, पुसेगाव 1, 
 *माण तालुक्यातील* मोगे 1, दहिवडी 1, गोंदवले बु 2, गोंदवले खु 1,  दिवडी 1, म्हसवड 5,  
 *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, ल्हासुर्णे 1, 
*खंडाळा तालुक्यातील* पाडेगाव 1, खंडाळा 1,  
  *महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1,  
*इतर* 4,  काले 1, 
 *एकूण नमुने-310239*
*एकूण बाधित -56197*   
*घरी सोडण्यात आलेले -53672*  
*मृत्यू -1812* 
*उपचारार्थ रुग्ण-713* 

 
0000

येत्या आठवड्यापासून जुना पूल हलक्या वाहतुकीस खुला होणार - आ पृथ्वीराज चव्हाण

कराड
येथील जुन्या पुलावरून किती क्षमतेची वाहने जाऊ शकतात याची तपासणी नुकतीच केली आहे त्यानुसार या पुलावरून या आठवड्याभरात हलकी चारचाकी वाहनांची दुतर्फा वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिली.त्यामुळे वाढलेल्या येथील अपघाताचे प्रमाण कंट्रोल मध्ये येण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे नेते ऍड उदयसिह पाटील, झाकीर पठाण,शिवराज मोरे, नगरसेवक अप्पा माने, पोलीस निरीक्षक बी आर पाटील, राहुल चव्हाण,ज्ञानेश्वर राजापूरे सिद्धार्थ थोरवडे, रमेश वायदंडे, बांधकाम विभाग अधिकारी,तसेच नगरपलिका अभियंता एन एस पवार आदि मान्यवर उपस्थित होते...

Wednesday, January 27, 2021

आज जिल्ह्यात 24 जण बाधित

  सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 24 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर एका बाधिताचा मृत्यु झालाअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील*  सातारा 2,  शनिवार पेठ 1, गणेश कॉलनी 1, रामाचा गोट 1, मालेगाव 1, शिंदेवाडी 1, वनवासवाडी 1, कोडोली 1, खेड 1, भैरवगड 1. 
*पाटण तालुक्यातील*   बाचळी 1. 
*फलटण तालुक्यातील*   फलटण 1. 
*वाई तालुक्यातील* कळंबे 2, वाई 1.
*खटाव तालुक्यातील*   खटाव 1.
 *माण तालुक्यातील* दहिवडी 1. 
*कोरेगाव तालुक्यातील*   पिंपोडे बु 1, करंजखोप 1. 
*खंडाळा तालुक्यातील*  शिरवळ 1, शिंदेवाडी 1. 
*महाबळेश्वर तालुक्यातील*  पाचगणी 1. 
*इतर*  1
*एका बाधिताचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये चिंचणेर लिंब, ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला या एका कोविड बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

            *एकूण नमुने- 309729*
        *एकूण बाधित -56143*   
        *घरी सोडण्यात आलेले - 53579*  
        *मृत्यू -1812* 
         *उपचारार्थ रुग्ण-752* 

 
0000

Tuesday, January 26, 2021

शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक होण्याला केंद्र सरकार जबाबदार - आ पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

कराड : दिल्ली येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक होण्याला संपूर्णपणे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, असं म्हणत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या घटनेची तीव्र शब्दात निंदा करत असून, मोदी सरकारने हटवादीपणा सोडून कृषी विधेयक तात्काळ मागे घ्यावीत, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 

मोदी सरकारने कायदे करताना कोणाशीही चर्चा केली नाही व हे अन्यायी कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादले गेले. याआधीचे मनमोहन सिंह व वाजपेयी सरकार कोणतेही कायदे करताना सर्वांना विश्वासात घेऊन त्याची अंमलबजावणी केली जायची. कायदे मांडण्याआधी त्याची संसदीय समितीमध्ये चर्चा व्हायची, यामुळे त्या कायद्यांना सर्वसमावेशक मत असायचे. पण नरेंद्र मोदींनी चर्चेचा कोणताही मार्ग न अवलंबता कायदे घाईगडबडीने लादण्याचा मार्ग अवलंबला.  हम करे सो कायदा हि मोदींची भूमिका चुकीची आहे.    

केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे बहुमत नसताना पास केलेले आहेत. त्याला देशभरातील शेतकरी आणि राजकीय मंडळी विरोध करतायत.  शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने कडक थंडीमध्ये बसून आहेत आणि ते परत घरी जायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून चर्चेच्या फेऱ्या झडतायत. त्यातून काही मार्ग निघत नाही, शेतकऱ्यांना सरकारचा तोडगा मंजूर नाही. पंतप्रधानांना देशाचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे पण यामध्ये ते अपयशी ठरत आहेत. 

बऱ्याच वाटाघाटीनंतर शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये टॅक्टर रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली. परंतु किती वाजता ती सुरू होईल आणि त्यांना कोणत्या वेळी ती काढता येईल यावरून वाद झालेत. या रॅलीदरम्यान अश्रुधुराचा वापर केला गेला, लाठीचार्जही करण्यात आला हे अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही आडमुठी भूमिका आहे. मोदींच्या हटवादीमुळे यातून काहीही तोडगा निघत नाही. मोदी सरकार आल्यापासून नोटबंदी आणि जीएसटीसारख्या अनेक गोष्टी त्यांनी रेटून नेल्या. कारण त्यांच्याकडे लोकसभेमध्ये बहुमत आहे. जे कायदे ज्या जनतेसाठी करायचे असतात त्यांनाच विश्वासात न घेता ते लादले जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. 

कृषी कायदे पास करत असताना लोकसभेत बहुमत होतं पण ते राज्यसभेत नव्हतं. राज्यसभेतील विरोधी सदस्यांना निलंबित करून बहुमत तयार करून हे कायदे पास केले गेले, शेतकऱ्यांसाठी काही करायचे असल्यास शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना आधी विश्वासात घ्यायला हवे होते. मोदी सरकारनं असं काहीही न करता अत्यंत हटवादी भूमिका घेऊन हे कायदे पास करून घेतले आहेत. राजधानी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी संपूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत. 



----------------------------------------------------------

Monday, January 25, 2021

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज बाबांची संवेदनशीलता...अपघात पाहून थांबवली गाडी ताफ्यातील गाडीतून जखमी वृद्धेला रुग्णालयात केले दाखल...

कराड : माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाणांचे संवेदनशीलतेचे दर्शन कराडच्या जनतेला आज पाहायला मिळाले.  आ पृथ्वीराज बाबा सैदापूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून परतत असताना सैदापूर येथील कॅनाल जवळ  त्यांना लोकांची गर्दी दिसली त्यांनी आपली गाडी थांबविण्याची सूचना केली व चौकशी केली असता समजले कि, एक अपघात झाला आहे व यामध्ये एक वयोवृद्धा जखमी झाली आहे.  पृथ्वीराज बाबा स्वतः गाडीमधून उतरून अपघातग्रस्त वयोवृद्धेची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.  त्या वृद्धेला रुग्णालयात उपचारासाठी  दाखल केले. व त्यासाठी आपल्या ताफ्यातील वाहनाची व्यवस्था केली. त्या वयोवृद्ध आजीला हाताला जबर दुखापत झाली आहे तसेच डोक्याला सुद्धा थोडा मार लागला आहे. या आजींचे नाव मालन सुतार असे आहे त्या सैदापूर गावच्या रहिवाशी आहेत. 

पृथ्वीराज बाबांचे अनेक गुणात्मक रूप कराडकरांनी आजपर्यंत पाहिले आहेत. आज त्यांच्या संवेदनशीलतेचे रूप कराडकरांनी पाहिले. त्यांच्यासमवेत नगरसेवक इंद्रजीत गुजर, सैदापुरचे सचिन पाटील, अ‍ॅड. अमित जाधव, पृथ्वीराज बाबांचे स्वीय सहायक गजानन आवळकर आदी यावेळी उपस्थित होते. पृथ्वीराजबाबांच्या संवेदनशीलतेची परिसरात व सोशल मीडिया वर चर्चा जोरदार सुरु आहे. 

Sunday, January 24, 2021

कराड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत जयवंतदादा गप्प का राहिले..? दादांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय...? शहरात चर्चा ...


अजिंक्य गोवेकर / कराड
येथील पालिकेत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभांची चर्चा चौक चौकात आहे.या सभेमधून कोण काय बोललं हा चर्चेचा विषय सध्या सगळीकडे चघळला जात असला तरी, या सभांमधून झालेल्या हमरी तुंमरीचे औच्चूक्य अधिक दिसते आहे. दुसरीकडे मात्र शहराचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी या सभांमधून आपले मौन बाळगून सर्वानाच विचार करायला लावले आहे.त्यांच्या गप्प बसण्यामागे नेमके काय राजकारण दडलंय हे समजून घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे.

येथील पालिकेत नुकतीच सर्वसाधारण सभांची मालिकाच जणू पार पडली. एकूण दिडशेच्या आसपास शहरातील विषय या सभांमधून चर्चेत आले.या विषयाच्या वाचन करण्यावरुन सुरुवातीलाच मोठे वादंग पाहायला मिळाले. विषयाचे वाचन करण्याने काहींची झालेली दमछाक पहायला मिळाली तर काहीं जणांनी प्रशासनाला धारेवर धरत कामाचा आग्रह केल्याचे दिसून आले.एकूण तीन सभा टप्या टप्याने पार पडल्या आणि ही सभांची मालिका संपली. उपनगराध्यक्ष जयवंतदादा या सभांमधून पहिल्यापासून मात्र गप्पच दिसले, त्यामुळे या सभेमधून  इतर कोण काय बोलले यापेक्षा दादा गप्प का आहेत? याचीच चर्चा झाली. त्यांच्या मौनामागचे कारण काय ? असे प्रश्न आजही लोकांसमोर आहेत.
उपनगराध्यक्ष जयवंत पाटील हे अभ्यासू व शहराच्या प्रश्नांची जाण व माहिती असणारे उपनगराध्यक्ष म्हणून परिचित आहेत. अनेकवेळा रोखठोक व स्पष्टपणे मते मांडून आपल्या कामाचा आवाका दाखवत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्याचे अनेकानी पाहिले आहे. चर्चेत भाग घेऊन उगाचच स्टंट करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. योग्य विषयावर  चर्चा घडवून आणण्यात ते नेहमी अग्रेसर असतात. वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळो न मिळो, दररोज पालिकेत हजर राहून लोकांची कामे करताना ते नेहमीच दिसतात.येथील पालिका निवडणुकीला आता काहीकाळ बाकी आहे.त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द चोख बजावली आहे. येथील नगरपालिकेतून उचलबांगडी झालेले यापूर्वीचे वादग्रस्त मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या अनेक भानगडी लोकांसमोर आणत त्यांनी प्रशासनाचा चेहरा वेळोवेळी उघडा पाडला आहे. डांगे यांचे कारनामे शहराच्या राजकारणात कसे व किती घातक आहेत यावर ते वारंवार रोखठोक बोललेही आहेत. शहराच्या प्रश्नांवर भरभरून बोलणारे व प्रशासनाला वेळप्रसंगी धारेवर धरणारे जयवंतदादा यावेळी झालेल्या पालिका सभेमधून मात्र गप्प का राहिले  ? याचा विचार झाला पाहिजे......
जनशक्ती आघाडीतील धुसफूस सर्वानाच माहीत आहे.स्वच्छ सर्वेक्षण विषयासंदर्भात सी ओ डाके यांनी काही दिवसांपूर्वी येथील लोकप्रतिनिधींशी "एक' पत्रव्यवहार केल्यानंतर आघाडीच्या वतीने आणि नगराध्यक्षांच्या बाजूने याबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी पत्रकार परिषदा घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी दादां आघाडीच्या पत्रकार परिषदेस उपस्थित दिसले नाहीत तर ते नगराध्यक्षांच्या बाजूने बोलताना दिसले.त्यावेळी त्यांनी यापूर्वीचे वादग्रस्त मुख्याधिकारी डांगे यांच्यावर टीकेची झोड उठवत आघाडीलाही अप्रत्यक्ष घरचा आहेर दिला होता.डांगे आपली कामे ऐकत नाहीत, त्यामागे आघाडी अंतर्गत राजकारण होत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सुचवले होते. त्यानंतर मात्र त्यांचा पार्टी अंतर्गत एकत्र काम करण्यात इंटरेस्ट फारसा दिसला नाही.त्यांनी आपल्याला बसण्यासाठी पालिकेत स्वतंत्र बैठक व्यवस्था व्हावी अशी मागणी देखील केली होती.त्याचवेळी आघाडीत बिघडी झाल्याची चर्चा सुरू झाली. आत्तादेखील त्यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाही आणि त्यातच पालिकेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे त्यामुळे आघाडीशी पुन्हा जुळवून घेण्याच्या मानसिकतेत जयवंतदादा दिसत नाहीत.म्हणून नुकत्याच झालेल्या पालिका सभांमधून सगळे एकत्र दिसले खरे... मात्र सभेसाठी उपस्थित राहून अधूनमधून.फक्त हसत आणि गप्प राहूनच दादानी आपली प्रतिक्रिया देणे पसंत केले. चर्चेत फारसे सहभागी झालेले दिसले नाहीत.
एकूणच सगळ्या घडामोडी पाहता दादांचा 
जनशक्ती अंतर्गत काडीमोड आता निश्चित आहे त्यामुळे होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी ते आपली कोणती खेळी नव्याने खेळणार आणि कोणते नवे राजकीय समीकरण जुळवून आणणार? हेच आता पहायचे आहे...   

आज जिल्ह्यात 66 जण बाधित

सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 66 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये 
        *सातारा तालुक्यातील*   सातारा 2, भोसले वाडा 1, सदरबझार 1, अपशिंगे 1,  करंजेपेठ 1, बोरगाव 2, गार्डन सिटी राधिका रोड 1, बुधवार पेठ 1, गोडोली 1, माची पेठ , नगरपालिका 1, कासारस्थळ 1, खेड 6, कृष्णानगर 2, रेणावळे 1, 
*कराड तालुक्यातील*  चरेगाव 4, 
*पाटण तालुक्यातील*  पाटण 1, मरळी 1, 
*फलटण तालुक्यातील*   मलठण 1, बिरदेवनगर 1, ठाकूरकी 1, 
*खटाव तालुक्यातील*   मांडवे 2, वडूज 1,  निढळ 1, खटाव 2, 
  *माण तालुक्यातील*   डोंबालवाडी 1, मार्डी 1,  कळस्करवाडी 2, म्हसवड 1,  रांजणी 1, 
*कोरेगाव तालुक्यातील*   सासुर्वे 1, नागनाथवाडी 1,  खेड 1,  कोरेगाव 1,
*खंडाळा तालुक्यातील*   मयुरेश्वरनगर लोणंद 2, 
*महाबळेश्वर तालुक्यातील*  दानवली 1, लिंगमळा 6, महाबळेश्वर 1, बुराडणी 1, 
*वाई तालुक्यातील*   गंगापूरी 1, रविवार पेठ 2, 
*इतर* मिरज (सांगली)1, 
            *एकूण नमुने- 308080*
        *एकूण बाधित - 56012*   
        *घरी सोडण्यात आलेले - 53458*  
        *मृत्यू - 1811* 
         *उपचारार्थ रुग्ण- 743* 

0000

Saturday, January 23, 2021

100,10 आणि 5 च्या नोटा मार्चनंतर चालणार नाहीत...आर बी आय ची माहिती...





विशेषवृत्त -
कराड-
जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या  नोटासंदर्भात रिझर्व्ह बँकेने  महत्त्वाची माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 100, 10, 5 च्या सर्व जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनातून हटवण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी ही माहिती दिली. या जुन्या नोटा मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांच्या म्हणण्यानुसार, आरबीआय मार्च-एप्रिलपर्यंत जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर पडतील. वास्तविक, 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याच्या अगोदरच याच्या नवीन नोटा यापूर्वीच चलनात आल्या आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2019 मध्ये 100 रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. खरं तर नोटाबंदीच्या वेळी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याने गोंधळ झाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही, तर प्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनमध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील असे आरबीआयचे म्हणणे आहे.  दहा रुपयांच्या नाण्यांविषयी वेगवेगळा अफवा पसरविल्या जातात.
बरेच व्यापारी किंवा दुकानदार त्यांना घेण्यास नकार देत आहेत. यावर आरबीआयचे म्हणणे आहे की, ही बँकेसाठी अडचण आहे, म्हणून अशा अफवा टाळण्यासाठी बँक वेळोवेळी सल्ला देते. तरी देखील अनेक लोक चलनामध्ये 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार देतात. यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी लोकांनी दहा रुपयांच्या नाण्यांविषयी कोणत्याही अफव्यांवर लक्ष देऊ नये.

विधानसभा अध्यक्ष, म्हणून लवकरच पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवडीवर होणार शिक्का मोर्तब?

कराड
राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. 

महाराष्ट्रात प्रभारी म्हणून बंगळुरूचे एच. के. पाटील यांची चार महिन्यांपूर्वी नियुक्ती झाली. त्यांनी पक्षपातळीवर संघटनात्मक बदल हाती घेतले. त्याचा भाग म्हणून मुंबई अध्यक्ष बदलण्यात आले. महिला प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले.  प्रदेशाध्यक्षपदही बदलण्यात आले. बाळासाहेब थोरात यांच्या जागी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून वर्णी लागली. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी उरकल्यानंतर महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पवार-फडणवीस यांनी २४ तासांत अन् आवाजी मतदानाने सरकारचे बळ दाखवावे असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परिणामी, फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा दिला होता. न्यायालयातील लढाईचे नेतृत्व तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी केले हाेते. मात्र सरकारमध्ये चव्हाण यांनी मंत्रिपद नाकारले होते. त्यामुळे चव्हाण यांचे पुनर्वसन पक्षाला करायचे होते. प्रारंभी राष्ट्रवादीचा चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्यास विरोध होता, पण आता राज्यातील स्थिती बदलली आहे  नूतन प्रदेशाध्यक्ष पटोले हे कुणबी असून ते विदर्भातील आहेत. त्यामुळे काँग्रेसला विधानसभा अध्यक्ष मराठा समाजातील आणि तो पश्चिम महाराष्ट्रातील हवा असल्याचे सांगण्यात येते.
विधानसभेत महाविकास आघाडीचे १७० चे संख्याबळ आहे. विधानसभा उपाध्यक्ष महाविकास आघाडीकडेच आहेत. त्यामुळे आवाजी मतदान घेऊन नवा विधानसभा अध्यक्ष निवडीत सरकारला कोणताही धोका नाही त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण याना विधानसभा अध्यक्षपदाचे दावेदार आता मानले जात आहे, आणि काँग्रेसने त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आहे.

Friday, January 22, 2021

आज जिल्ह्यातील 67 जण बाधित

  सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर  2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये 
        *सातारा तालुक्यातील*  सातारा 2, देगांव रोड 1, फडतरवाडी 1,म्हसवे 2, आसनगांव 1,भाटमरळी 1, तासगांव 3, कोडोली 1, करंजे 1, केसरकर पेठ 1,मंगळवार पेठ 1, 
*कराड तालुक्यातील*   शनिवार पेठ 1, भरेवाडी 1, ठाकुर्की 1, फडतरवाडी 1, 
*पाटण तालुक्यातील*  
*फलटण तालुक्यातील*  लक्ष्मीनगर 1, साखरवाडी 1, बरड 1,लक्ष्मीनगर 1,
*खटाव तालुक्यातील*    मायणी 1, वडुज 1, नागनाथवाडी 1, 
  *माण तालुक्यातील*   फलटण 1, मोगराळे बिजवडे 4, गोंदवले बु. 3, पळशी 1, पिंगळी 2,
*कोरेगाव तालुक्यातील* रहिमतपूर 7, आसनगांव 3,   
*खंडाळा तालुक्यातील*  पाडेगांव 1, लोणंद 1, शिरवळ 2,
*महाबळेश्वर तालुक्यातील*  महाबळेश्वर 1, मेटगुताड 1, पाचगणी 1, 
*वाई तालुक्यातील* वायगांव 1, रविवार पेठ 1, 
*जावली तालुक्यातील* जावली 1, भीवडी 1,कुडाळ 5,
*इतर*  1, वायनाड केरळ 1, वारगडवाडी 1,
* 2 बाधिताचा मृत्यु*
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे रंगेघर ता. जावली येथील 75 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील‍ विविध खासगी हॉस्पीटलमध्ये शिरंबे ता. कोरेगांव येथील 68 वर्षीय महिला अशा दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

            *एकूण नमुने -306915*
        *एकूण बाधित -55879*   
        *घरी सोडण्यात आलेले -53310*  
        *मृत्यू -1809* 
         *उपचारार्थ रुग्ण-760* 

0000

Thursday, January 21, 2021

दहावीची परिक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान होणार - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

कराड
 कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्यानं जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होतंय. एसएससी (10 वी) बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.

आता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केलीय. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. 12 वी परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल आणि 10 वी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.

Wednesday, January 20, 2021

कराडच्या विक्रांत देसाई व दिगम्बर शेडगे यांच्या "डी. एस. कन्सल्टन्सी' फर्मचे पुण्यात शानदार उदघाटन...

कराड
 येथील विक्रांत देसाई व दिगम्बर शेडगे यांच्या "डी एस कन्सल्टन्सी' या टॅक्सकन्सल्टन्सी फर्म चा शानदार उदघाटन सोहळा कराड नगरपरिषदेतील जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिह यादव व  पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक मा.राजाभाऊ लायगुडे ( अप्पा) यांच्या हस्ते पुणे येथे नुकताच संपन्न झाला.

या संस्थेचे संचालक कराडचे व्यवसायिक बापू देसाई व माजी नगराध्यक्षा सौ संगीता देसाई यांचे चिरंजीव विक्रांत देसाई व त्यांचे व्यवसायिक भागीदार दिगम्बर शेडगे यांचे सर्व उपस्थितांनी याप्रसंगी अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.विक्रांत देसाई हे  आय टी इंजिनिअर आहेत मार्केटिंग मध्ये एम बी ए देखील त्यांनी केले आहे.त्यानंतर त्यांनी टॅकसेशन मधील आपला अभ्यास पूर्ण करून व्यवसाय सुरू केला आहे, तर शेडगे हे टॅक्स कन्सल्टन्सीचा व्यवसाय इथे पहिल्यापासून करत आहेत. पे रोल, पी एफ, ई एस आय सी,पी टी, जी एस.टी ,ई. टेंडरिंग,ही कामे त्यांच्या डी एस कन्सल्टन्सी मध्ये केली जाणार आहेत.
 टॅक्स कन्सल्टन्सीच्या अधिक माहितीसाठी
9561169654/9890994467 या मोबाईल नंबरवर संपर्क करावा असे आवाहन संबंधितांनी केले आहे.
यावेळी विजयसिंह यादव (भाऊ),कोल्हापूर चे उपमहापौर मा.दिगंबर फराकटे, पै.आप्पासाहेब आखाडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड शहर प्रमुख सागर बर्गे,  अशोक कदम (सि.ए.)
 विकास पाटील (सि.ए.).अनिल (अप्पा) जाधव,अविनाश कदम (बांधकाम व्यावसायिक) संतोष अवघडे (ग्रा.सदस्य)राजेशभाऊ पवार,. हणमंत गलांडे (काका)  रमेश कदम(सर).विजय सपकाळ(सर)आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी देसाई व शेडगे परिवाराच्या वतीने कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ.संगिता देसाई व संभाजी शेडगे, यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

आज 53 जण बाधित

  सातारा दि.20 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये 
        *सातारा तालुक्यातील* सातारा 3, सदरबझार 2, मल्हार पेठ 2, 
*कराड तालुक्यातील* विद्यानगर 1, 
*फलटण तालुक्यातील* खुंटे 1, 
  *माण तालुक्यातील* झाशी 8, गोंदवले खु 1, गोंदवले बु 2, लोधावडे 1,  नरवणे 1, कासारवाडी 1, 
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 8, चंचळी 1, जळगाव 1, पळशी 1, रहिमतपूर 3, त्रिपुटी 1,  
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 6, खंडाळा 1, 
*जावली तालुक्यातील* कुडाळ 1,  
*महाबळेश्वर तालुक्यातील* लिंग मळा 1, ताईघाट 1, पाचगणी 1, 
*वाई तालुक्यातील* कवटे  2, 
*इतर* 1
            *एकूण नमुने -304928*
        *एकूण बाधित -55748*   
        *घरी सोडण्यात आलेले -53160*  
        *मृत्यू -1806* 
         *उपचारार्थ रुग्ण-782* 

0000

Monday, January 18, 2021

ग्रामपंचायत निकाल ; महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर

कराड
 माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का बसल्याचं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. कराडमधील महत्वाच्या अशा दोन ग्रामपंचायतींवर भाजपच्या पॅनेलने विजय मिळवला आहे. शेणोली शेरे आणि कार्वे गावात भाजपप्रणित पॅनेलनं विजय मिळवला आहे. हा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कार्वे गावात अतुल भोसले यांचे पॅनेल विजयी झाले आहे. कार्वे ग्रामपंचायतीच्या 17 जांगांपैकी 10 जागांवर भाजपच्या पॅनेलनं विजय मिळवला आहे. तर पृथ्वीराज चव्हाण समर्थकांच्या गटानं 7 जागांवर विजय मिळवला. ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला अपयश आलं आहे.

शेणोली शेरेमध्ये अतुल भोसलेंच्या पॅनेलचा विजय
कराड तालुक्यातील शेणोली शेरे गावात पृथ्वीराज चव्हाणांना धक्का बसला असून भाजपच्या अतुल भोसले यांच्या पॅनेलनं एकतर्फी विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे कार्वे गावातही भाजप समर्थित पॅनेलनं विजय मिळवला आहे.

खुबीमध्येही अतुल भोसलेंची विजयी सलामी

दुसरीकडे कराड तालुक्यातील पहिला निकाल खुबी या गावचा लागला आहे. खुबी गावात भाजपचे अतुल भोसले यांच्या पॅनले दणदणीत विजय मिळवला आहे. अतुल भोसले यांच्या पॅनलनं विरोधकांचा 9 विरुद्ध 0 अशा मोठ्या फरकानं दारुण पराभव केला आहे.

कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटलांचं वर्चस्व

विधानसभेच्या प्रतिष्ठित कराड उत्तर मतदारसंघातील पहिला ग्रामपंचायत निकाल हाती आला आहे. निगडी गावात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झालाय. 8 विरुद्ध 1 अशा मोठ्या फरकानं बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे. पाटील यांच्या पॅनलपुठे विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कराड उत्तरमधील निगडी गावात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा
निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
एकूण प्रभाग- 46,921
एकूण जागा- 1,25,709
प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

Sunday, January 17, 2021

आज जिल्ह्यात 72 जण बाधित

सातारा दि.17 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 72 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
         *सातारा तालुक्यातील*सातारा 6,करंजे पेठ 2,कुडाळ 1,शनिवार पेठ 2,शाहुनगर 3,गोडोली 1,खिंडवाडी 1,कोंडवे 1,बुधवार नाका 1,
*कराड तालुक्यातील*कराड 1, कार्वे नाका 2,
*पाटण तालुक्यातील* मालदन 3,
             *फलटण तालुक्यातील*फलटण 1,साखरवाडी 1,खुंटे 3,शिंदेवाडी 4,लक्ष्मीनगर 1, 
*खटाव तालुक्यातील*खटाव 2,कलेढोण 1,
*माण तालुक्यातील*माण2, द‍हिवडी 3, गोंदावले 1,हस्तिनापूर 1,
*कोरेगाव तालुक्यातील*कोरेगाव 3,रहिमतपूर 9,
*महाबळेश्वर तालुक्यातील, भिलार 1,पाचगणी 1,भोसे 1,
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा1, शिरवळ 2,
*वाई तालुक्यातील*कवठे 1,
          *जावली तालुक्यातील*जावली 3, कुडाळ 3,
*इतर* 3,जानकर कॉलनी 1,
  *1 बाधितचा मृत्यु* 
               जिल्ह्यातील विविध खाजगी   हॉस्पीटलमध्ये तकरारवाडी ता. इदांपूर जि.पुणे  येथील 69, वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

            *एकूण नमुने -301926*
        *एकूण बाधित -55550*  
        *घरी सोडण्यात आलेले -52946*  
        *मृत्यू -1805* 
         *उपचारार्थ रुग्ण-799* 

0000

Saturday, January 16, 2021

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ लसीकरणास उत्साहात प्रारंभ...

कराड, ता. १६ : संपूर्ण जगाच्या दृष्टीने २०२० हे वर्ष अत्यंत वाईट गेले. कोविड – १९ नामक विषाणूने जगभर घातलेल्या थैमानामुळे संपूर्ण जगाची नाकेबंदी झाली होती. भारतातही लाखो लोक कोरोनाग्रस्त झाले. एकूणच लॉकडाऊनच्या स्थितीत आणि भयग्रस्त वातावरणात २०२० हे वर्ष सरले. पण नव्या वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये मात्र कोरोना लसीच्या निमित्ताने एक आशेचा किरण जगासमोर निर्माण झाला आणि आज खऱ्या अर्थाने लाखो लोक ज्याची गेले वर्षभर वाट पाहत होते; त्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाला उत्साहात प्रारंभ झाला. कोरोना काळात पश्चिम महाराष्ट्रासाठी आरोग्य संजीवनी ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आजपासून लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.

भारत सरकारच्यावतीने आजपासून देशभर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या 'कोविशिल्ड' या लसीचे ५५० डोस कृष्णा हॉस्पिटलला उपलब्ध झाले असून, पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र केंद्र उभारण्यात आले असून, या केंद्राचे उद्घाटन कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कृष्णा हॉस्पिटलमधील डॉ. विश्वास पाटील यांना पहिली लस देण्यात आली. 

याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. टी. मोहिते, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंगच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की कृष्णा हॉस्पिटल हे कोरोनामुक्तीचे महत्वाचे केंद्र असून, आत्तापर्यंत याठिकाणी ३३५८ कोरोनाग्रस्त रूग्णांनी उपचार घेतले आहे.  त्यापैकी ३२०० हून अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कृष्णा हॉस्पिटल हे 'कोविशिल्ड' या लसीसाठीच्या संशोधनासाठीचेही एक महत्वाचे केंद्र राहिले आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. कृष्णा हॉस्पिटलमध्ये लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले असून, लसीकरणानंतर लाभार्थाला ३० मिनिटे वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्पात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असून, त्यासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या ३००० जणांची नोंदणी करण्यात आली आहे. याठिकाणी दररोज १०० जणांना लस दिली जाणार आहे. 

यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
***

आज 43 जण बाधित; जिल्ह्यात आजपासूनच लसीकरणाला सुरुवात ...

 सातारा दि.16 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 43 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.दरम्यान आजपासून जिल्ह्यात लसीकर्णाला सुरुवात झाली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
           *सातारा तालुक्यातील*सातारा 5, यादोगोपाळ पेठ 1,सदर बाजार 4,संभाजी नगर 1,   
           राधिका रोड 1,दुर्गा पेठ 1,
*कराड तालुक्यातील* कराड 1, कार्वे नाका 1,मलकापुर 1,
*पाटण तालुक्यातील* पाटण 1,व्रजरोशी 3,  
             *फलटण तालुक्यातील* कोळकी 1,साखरवाडी 1,पडेगाव 1, सांगवी 1,
*खटाव तालुक्यातील* खटाव 2, पुसेसावळी 2, वडुज 1,
*माण तालुक्यातील*माण् 1 , 
*कोरेगाव तालुक्यातील*किरोली वाठार 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, पाचगणी 1,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1,
*वाई तालुक्यातील* पाचवड 2,
*इतर* 3,कढाणे 1,मेंढोशी 1,खानापूर 1,भैरववाडी 1, 
            *एकूण नमुने -300814*
        *एकूण बाधित -55480*  
        *घरी सोडण्यात आलेले -52906*  
        *मृत्यू -1804* 
         *उपचारार्थ रुग्ण-770* 
0000

Friday, January 15, 2021

धनंजय मुंडे प्रकरणाला नवे वळण...तक्रारदार महिलाच म्हणते की...

कराड
 राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या महिलेवर भाजप  आणि मनसेच्या  पदाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली आहे. आपल्याला या महिलेने गळ घातल्याची तक्रार या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात केली आहे. त्यानंतर मुंडेंवर आरोप करणारी महिला रेणू शर्मा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना या प्रकरणातून माघार घेण्याबाबत भूमिका मांडणारे ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये म्हणतात, 'एक काम करा, तुम्ही सर्वांनीच निर्णय घायावा, कोणतीही माहिती करून न घेता जर तुम्ही आणि जे मला ओळखतात ते सुद्धा चुकीचे आरोप लावत असतील तर तुम्ही सर्वांनी मिळूनच निर्णय घ्या, मीच मागे हटते जसे तुम्हा सर्वांना हवे आहे.' 

रेणू शर्मा पुढे म्हणतात, 'जर मी चुकीची असेन तर मग इतके सारे लोक आतापर्यंत पुढे का येऊ शकले नाहीत. मी माघार घेतली तरी देखील माझा मला स्वत:ला अभिमान असणार आहे. याचे कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होते. तसे पाहिले तर मी कोणत्याही पक्षाचे नाव घेतलेले नाही आणि आता मला हटवण्यासाठी आणि खाली पाडण्यासाठी इतक्या लोकांना यावे लागत आहे. आता तुम्हाला जे काही लिहायचे आहे ते लिहा.

या महिलेने आम्हालाही गळ घातल्याची तक्रार भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत केली आहे. भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी देखील संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली आहे. हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप मनसेचे एक पदाधिकारी मनीष धुरी यांनीही केला आहे. या बरोबरच जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने या महिलेबाबत अशाच प्रकारची तक्रार केली आहे.

धनंजय मुंडेंसाठी पवारांकडून भाजपची कोंडी... मुंडेंचा राजीनामा घेणार नाही...

मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्कारासारख्या गंभीर आरोपानंतर सूचक इशारा देणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता आपल्या भूमिकेत बदल केल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, रेणू शर्मा यांच्या विरोधातील काही बाजू भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी समोर आणली आहे. त्यानंतर पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत आता नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे शरद पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे हे स्वत: राजीनामा देतील किंवा खुद्द शरद पवार त्यांचा राजीनामा घेतील असं चंद्रकांत पाटील गुरुवारी म्हणाले. तर भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि माजी खासदार किरिट सोमय्या यांनी थेट निवडणूक आयोगाकडेच तक्रार करत मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, भाजपचेच नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट राजीनाम्याची मागणी न करता, प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, अशी भूमिका फडणवीस यांनी गुरुवारी मांडली आहे.
फडणवीसांच्या याच भूमिकेचा आधार घेत शरद पवार यांनी भाजप नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. “भाजपच्या एका नेत्यानं काळजीपूर्वक चौकशी करावी असं सांगितलं आहे. लगेच राजीनामा घेऊ नये असं त्यांनी म्हटलं. ते राज्याचे प्रमुख होते. संयमाने हे प्रकरण हाताळावं असं त्यांनी म्हटलं होतं”, अशा शब्दात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या विधानाचा दाखला दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा आधार घेत मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या भाजप नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत.

‘धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही’
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप प्रकरणा संबंधित सतत सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शरद पवार यांना धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.
राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी”, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

सदाभाऊ खोत व राजू शेट्टी निर्दोष ; कराड सत्र न्यायालयाचा निकाल...सभ्य प्रिथ्वीराजबाबा सत्तेत असताना मात्र अन्यायकारक... सदाभाऊ खोतांंचा घणाघात...

कराड
सध्या केंद्रसरकार आणि शेतकरी यांच्या संघर्षाचे पडसाद देशभर उमटत असताना शेतकरी कायद्याला होणारा विरोध हा केवळ राजकारणासाठी केलेला स्टंट आहे असे सांगत.जर शरद पवार साहेबांचे पुस्तक केंद्र सरकारने कृषी नीती म्हणून उपयोगात आणले तर शेतकऱ्यांनाचे प्रश्न सुटतील असा खोचक्र टोला सदाभाऊ खोत यांनी आज येथे लगावला 
येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते दरम्यान सभ्य प्रिथ्वीराजबाबा सत्तेत असताना मात्र अन्यायकारक आहेत असे सांगत त्यांनी आपला निशाणा साधला

दरम्यान 2012 - 2013 साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या उसदरवाढी च्या आंदोलनाच्या निमित्ताने राजू शेट्टी सदाभाऊ यांच्यावर 47 केसेस दाखल केला होत्या त्यातून या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली व त्यांना दोषमुक्त करण्यात आले,त्याबाबत माहिती देण्याकरिता या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आली होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, उपाध्यक्ष मुसद्दीक आंबेकरी
कराड तालुकाध्यक्ष अशोक लोहार,बजरंग भोसले,आरिफ मुल्ला आदी उपस्थित होते.
 खोत पुढे म्हणाले, ज्यांना सभ्य म्हटले जाते ते सत्तेत आल्यानंतर अन्याय कसे करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे पृथ्वीराज बाबा यांच्या सत्तेचा कालावधी असे म्हणावे लागेल.ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे भले होईल अशी अपेक्षा होती मात्र अपेक्षा भग झाला. आम्ही त्याठीकाणी हजर नसतानादेखील आम्हाला केसेस ना सामोरे जावे लागले.2012 - 2013 साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या उसदरवाढी च्या आंदोलनाच्या निमित्ताने आमच्यावर 47 केसेस दाखल केल्या गेल्या.सभ्य म्हणून ओळख असणारे सत्तेत असल्यावर असा अन्याय करतात हे राज्याला माहिती झाले.
दरम्यान,ज्यांना शेतीतली काही अक्कल नाही ,ज्यांचा शेती आणि शेतकरी यांचा काही सम्बन्ध नाही अशा प्रवरुत्ती शेतकरी कायद्याला विरोध करत आहेत आणि हे बरोबर नाही,केवळ मोदी ना विरोध हा या कायद्याला विरोध करणार्याचा हेतू असल्याने केंद्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शेतकरी हितासाठी आपले प्रयत्न चालूच ठेवावे. शरद पवार साहेबांचे शेती विषयक असणारे जे पुस्तक आहे त्याचा कृषी नीती म्हणून या प्रश्नी सरकारने उपयोग करून घ्यावा म्हणजे सगळे प्रश्न सुटतील असा टोलाही खोत यांनी यावेळी लगावला.

आज जिल्ह्यात 51 जण बाधित

 सातारा दि.14 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 51 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 5, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 1,अजिंक्य कॉलनी 3, शनिवार पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, जकातवाडी 1, निगडी 1, मलवडी 1, शिवथर 1, कोडोली 1, मानेवाडी 1, शेंद्रे 1, ठोसेघर 1,  रेवंडे 1, 
*कराड तालुक्यातील* कराड 1,गोवारे 1, कर्वे नाका 1, मुंढे 1, 
*पाटण तालुक्यातील*मारुल हवेली 2,
*फलटण तालुक्यातील* काळज 1, तरडगाव 1, तामखेडा 2, खुंटे 1, सोमथळी 1,
*खटाव तालुक्यातील* भांडेवाडी 1, वडूज 1,   
*माण तालुक्यातील* पळशी 2,  
*कोरेगाव तालुक्यातील* रहिमतपूर 2,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 3, वडगाव 1, 
*वाई तालुक्यातील* वाई 1,एकसर 1, सिद्धनाथवाडी 1,     
*इतर*2, काळगाव 1,
बाहेरील जिल्ह्यातील वीटा 1, मिरज 1,
*एकूण नमुने -299438*
*एकूण बाधित -55437*  
*घरी सोडण्यात आलेले -52815*  
*मृत्यू -1804* 
*उपचारार्थ रुग्ण-818* 
0000

Thursday, January 14, 2021

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर... त्यांच्याबाबत पक्ष म्हणून विचार करावा लागेल : शरद पवार यांचे कारवाईचे संकेत...

कराड
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्यावरील आरोपांसंदर्भात सविस्तरपणे भाष्य केले. धनंजय मुंडे हे बुधवारी मला भेटले. मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला सविस्तर माहिती दिली. त्यानुसार धनंजय मुंडे यांचे काही व्यक्तींशी संंबंध होते. त्यावरुन मुंडे यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल, याची कल्पना धनंजय मुंडे यांना होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे आता याप्रकरणात फारसे बोलण्यासारखे काहीही नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
आता धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत बोलायेच झाल्यास ते गंभीर स्वरुपाचे आहेत. एक पक्ष म्हणून या सगळ्याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. पक्षातील प्रमुख सहकाऱ्यांशी माझं अद्याप बोलणं झालेलं नाही. मात्र, मी त्यांना विश्वासात घेऊन धनंजय मुंडे यांनी मला दिलेली माहिती त्यांच्यापुढे मांडणार आहे. त्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेऊ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यासाठी फार वेळ लागणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तातडीने निर्णय घेईल, असेही शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचा निर्णय पक्षावर सोडून दिला असला तरी मंत्री नवाब मलिक यांची ठामपणे पाठराखण केली. नवाब मलिक हे राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक आहेत. 25 वर्षांहून अधिक काळ ते विधिमंडळात आहेत. या काळात त्यांच्यावर एकदाही  कोणतेही वैयक्तिक स्वरुपाचे आरोप झालेले  नाहीत. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाले आहेत. त्या नातेवाईकाला संबंधित यंत्रणेने अटक केली आहे.या प्रकरणात आम्ही संबंधित यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करत आहे. आता एनसीबीने वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे. तेव्हा आता एनसीबी योग्यप्रकारे काम करेल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

आज जिल्ह्यात 53 जण बाधित

लसातारा दि.14 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील*सातारा 2, सदरबझार 1,गुरुवार पेठ 2, बुधवार पेठ 2, कामाटीपुरा 1,कोंडवे 1, 
*पाटण तालुक्यातील* मारुल हवेली 5,
*फलटण तालुक्यातील* खुंटे 2, तरडफ 1, गिरवी 1,
*खटाव तालुक्यातील* विखळे 1, कलेढोण 1, कळंबे 1, औंध 1,वडूज 3,
*माण तालुक्यातील* लोधावडे 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 4,चांदवडी 1,रहिमतपूर 3,साप 1, सुर्ली 1, अपशिंगे 2, जाधवाडी 1,तडवळे 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील*पाचगणी 1, महाबळेश्वर 2,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1,
*वाई तालुक्यातील* धोम कॉलनी 2, धोमबलकवडी 1,
*इतर* मस्करवाडी 3, शेरेचीवाडी 1, गवंडी 2
*1 बाधितचा मृत्यु*
खासगी हॉस्पीटलमध्ये फरांदवाडी ता. फलटण येथील 84 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -298970*
*एकूण बाधित -55390*  
*घरी सोडण्यात आलेले -52786*  
*मृत्यू -1804* 
*उपचारार्थ रुग्ण-800* 
0000

कराडात येत्या 16 जानेवारी पासून दिली जाणार कोरोनाची लस; जिल्ह्यातील अन्य काही ठिकाणी देखील लस देण्याची सुविधा..

सातारा दि.14 (जिमाका): कोविड संसर्गावरील लस उपलब्ध झाली असून पहिल्या टप्पा 16 जानेवारी पासून सुरुवात होणार असून पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य संस्था अंतर्गत कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभाग, सैन्य दल, हवाई दल व तिसऱ्या टप्प्यात सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे.ही लस स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, कराड, उपजिल्हा रुग्णालय, फलटण, ग्रामीण रुग्णालय पाटण, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव, ग्रामीण रुग्णालय माण, ग्रामीण रुग्णालय खंडाळा, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड, मिशन हॉस्पीटल वाई या ठिकाणी लस देण्यात येणार आहे.  लस घेतल्यानंतरही नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केले.

      जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोरोना लसीबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या पत्रकार परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

 पहिल्या टप्प्यासाठी 24 हजार 410 आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीसाठी नोंदणी करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील 3 आरोग्य संस्थांमध्ये ड्राय-रन (रंगीत तालीम घेण्यात आली) लसीकरणाच्या सत्राच्या ठिकाणी 3 खोल्या तयार करण्यात आलेल्या आहेत. यावेळी सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर केला जाणार आहे. लसीकरणानंतर लाभार्थ्याची 30 मिनिटे पाहणी करण्याकरिता रुममध्ये ठेवण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेसाठी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, तालुका पर्यवेक्ष, सर्व आरोग्य सहायक यांना व्हीसीद्वारे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
00000

Wednesday, January 13, 2021

अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या भेटीला

कराड
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  यांच्यावर एका गायक तरुणीने बलात्काराचे आरोप केल्याने धनंजय मुंडे संकटात सापडले आहेत अशातच त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज (बुधवार) सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली आहे. यावेळी पवार- धनंजय मुंडे यांच्यात अनेक मिनिटं गुफ्तगू झालं. 

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना भेटून त्यांची सविस्तर भूमिका पवारांसमोर मांडली. याअगोदर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची भूमिका महाराष्ट्रासमोर मांडली होती. त्यांच्या फेसबुक पोस्टनंतर किंबहुना खुलाशानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अखेर मुंडे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली. तसंच त्यांची भूमिका स्पष्ट केली.
रेणू शर्मा या गायक तरुणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. तसंच पोलिस तक्रारीची कॉपीही ट्विट केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांना खुलासा करावा लागला. रेणू शर्मा मला पैशाच्या कारणास्तव ब्लॅखमेलिंग करत आहेत. माझे रेणू यांच्या बहिण करुणा शर्मा यांच्याशी परस्पर सहमतीने संबंध आहेत. तसंच या संबंधातून आम्हाला दोन मुलेही आहेत, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं.

आज पवार यांना भेटून हेच स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलेलं असावं. कारण बुधावारी त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये माझ्या जवळच्या लोकांना आमचे संबंध माहिती आहेत तसंच कुटुंबाला देखील हे सगळं प्रकरण माहिती आहे, असं म्हटलं होतं. साहजिकच पक्षातील जवळच्या लोकांना धनंजय मुंडेंचं हे प्रकरण माहिती असावं, अशी अटकळ आता बांधली जात आहे.
धनंजय मुंडे यांनी पवारांची भेट घेतल्यावर पवारांनी त्यांना नेमका काय सल्ला दिला? किंवा धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणावर आता शरद पवार काय बोलणार? काय निर्णय घेणार, याची प्रतिक्षा आता राज्याला लागली आहे.
तत्पूर्वी, धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्ममंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. या बैठकीला धनंजय मुंडेही उपस्थित होते. मुंडे यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे.

धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाणार... ? सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ...

कराड- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची  बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे “करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाल सर्व माहिती आहे” असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

धनंजय मुंडेंच्या या फेसबुक पोस्टनंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. इतकंच नाही तर सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरही हल्ला चढवला. मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचे मंत्री बायको लपवते असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला.
धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचं दर्शन एव्हाना महाराष्ट्राला झालं आहे. कोरोना काळात त्यांनी दाखवलेला संयम आणि राज्याला दिलेला दिलासा सर्वांनी पाहिला आहे. शालीन आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळख असलेले मुख्यमंत्री आता धनंजय मुंडेंवर अॅक्शन घेणार का हा सवाल आहे. थेट महिलेने केलेले गंभीर आरोप, पोलिसांमध्ये दिलेली तक्रार असा नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या मुख्यमंत्र्यांवर दबाव असू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका कोणता पवित्रा घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं असताना, दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे ही पाहणं महत्त्वाचं आहे. शरद पवार यांचा शब्द हा फक्त राष्ट्रवादीतच नव्हे तर आता महाविकास आघाडीतही प्रमाण मानला जातो. जर शरद पवारांनी कडक भूमिका घेतली तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत. धनंजय मुंडेंना पायउतार होऊन येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल, जर निर्णय झालाच, तर चौकशीलाही सामारो जावं लागेल.
ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापनेच्या हालाचाली सुरु होत्या, त्यावेळी अभूतपूर्व चित्र पाहायला मिळालं होतं. सत्तेचं समीकरण जुळलं असताना अजित पवारांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन पहाटेच शपथविधी उरकला होता. त्यावेळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदार दिसले होते. मात्र पहाटेच्या शपथेनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता दिवसभर गायब होता, तो नेता म्हणजे धनंजय मुंडे. त्यावेळी धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी खासगीत जाब विचारल्याचं राजकीय जाणकारांनी सांगितलं होतं. धनंजय मुंडे त्यावेळी पक्षादेश झुगारुन अजित पवारांसोबत गेल्याने, शरद पवार संतापल्याचं चित्र होतं. तोच संताप जर आता निर्णयात बदलला तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत, हे पक्कं होईल.

आज 67 जण बाधित

सातारा दि.13 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 5, रविवार पेठ 1,गोडोली 1, शाहुपुरी 1, कोडोली 4, सदरबझार 1, संभाजीनगर 1, तामजाई नगर 4, भरतगाव 1, तोंडले 1, रामनगर 1,
*कराड तालुक्यातील* कराड 1,कोयना वसाहत 1,चरेगाव 1, खराडे 2, हेळगाव 1, नांदगिरी 1, जळगाव 1, देवूर 1,
*पाटण तालुक्यातील*साळवे 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 1,कोळकी 2, खुंटे 4, सांगवी 1, चौधरवाडी 1, फरांदेवाडी 2, पवारवाडी 3, खामगाव 1, 
*खटाव तालुक्यातील* वडूज 1, 
*माण तालुक्यातील* दहिवडी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* शिरंबे 1,रहिमतपूर 2,देवूर 1, खेड 1,
*जावली तालुक्यातील*पानस 1, मेढा 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1,तळदेव 1,
*वाई तालुक्यातील* सह्याद्रीनगर 1, जोशी विहिर 1,
*खंडाळा तालुक्यातील* बकालवाडी 1, शिरवळ 3,
*इतर*1
बाहेरील जिल्ह्यातील बोरगाव ता. वाळवा 1, 
*एकूण नमुने -297787*
*एकूण बाधित -55336*  
*घरी सोडण्यात आलेले -52759*  
*मृत्यू -1803* 
*उपचारार्थ रुग्ण-774* 
0000

Tuesday, January 12, 2021

अखेर...राज्यातील कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण...511 ठिकाणी लसीकरण केंद्राची उभारणी...

 मुंबई, दि. 12 : राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सिर्म इन्स्टिट्यूट कडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोसेस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोवीन पोर्टलवर ७ लाख ८४ हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून आज मंगळवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. राज्यात ३ हजार १३५ शितसाखळी केंद्र उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

          केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर " कोरोना लसीकरण तज्ज्ञांचा गट (NEGVAC) " स्थापन केला आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे.

          लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरविण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी (हेल्थ केअर वर्कर्स) यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.

          फ्रंट लाईन वर्कर्समध्ये राज्य व केंद्रीय पोलिस दल, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, म्युनिसिपल वर्कर्स इ.चा समावेश करण्यात आला आहे.

          तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील सर्व व्यक्ती व ज्यांना अन्य आजार व्याधी आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश आहे.

*७ लाख ८४ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी*

          कोवीन पोर्टलवर आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. सद्यस्थितीत लस टोचण्यासाठी १७ हजार ७४९ व्हॅक्सीनेटर्सची नोंदणी झाली आहे. ७ लाख ८४ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे दि. १२ जानेवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे.

*३ हजार १३५ शितसाखळी केंद्र*

          राज्यात शितगृहाची उपलब्धता असून राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर ३४, महानगरपालिकास्तरावर २७, असे शितगृह तयार असून ३ हजार १३५  शितसाखळी केंद्र उपलब्ध आहेत. वॉक इन कुलर - २१, वॉक इन फ्रिजर -४, आय एल.आर. ४१५३, डिप फ्रीजर- ३९३७ आहे.

          केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या १२०० व्हॅक्सिन कॅरियरचा पुरवठा जिल्हा व महापालिकांना करण्यात आला आहे. वरील वॉक इन कुलर, वॉक इन फिजर हे कोल्हापूर, ठाणे, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर, पुणे व नाशिक या विभागीयस्तरावर स्थापित करण्यात आले आहेत.

*एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण*

          आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यावरील विविध शासकीय आरोग्य संस्था स्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठीच्या पथकामध्ये ५ सदस्यांचा समावेश असणार आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

          *लसीकरणासाठी जिल्हानिहाय केंद्रांची संख्या अशी :* अहमदनगर-२१, अकोला-५, अमरावती-९, औरंगाबाद-१८, बीड-९, भंडारा-५, बुलडाणा-१०, चंद्रपूर-११, धुळे-७, गडचिरोली-७, गोंदिया-६, हिंगोली-४, जळगाव-१३, जालना-८, कोल्हापूर-२०, लातूर-११, मुंबई-७२, नागपूर-२२, नांदेड-९, नंदूरबार-७, नाशिक-२३, उस्मानाबाद-५, पालघर-८, परभणी-५, पुणे-५५, रायगड-७, रत्नागिरी-9, सांगली-१७, सातारा-१६, सिंधूदुर्ग-६, सोलापूर-१९, ठाणे-४२, वर्धा-११, वाशिम-५, यवतमाळ-९ असे एकूण ५११ केंद्र आहेत.

          हे ५११ केंद्र राज्यातील आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, महापालिका रुग्णालय याठिकाणी होणार असून त्यामध्ये ११९ ग्रामीण रुग्णालय, ८३ उपजिल्हा रुग्णालय, ६९ वैद्यकीय महाविद्यालय, ५९ नागरी आरोग्य केंद्र, ४३ महापालिका रुग्णालय, २३ प्राथमिक आरोग्य केंद्र, २३ खासगी रुग्णालय, २२ जिल्हा रुग्णालय, २२ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ८ सामान्य रुग्णालय, ७ महापालिका रुग्णालय, ४ महिला रुग्णालय अशाप्रकारे ५११ लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आली आहेत

आज 34 जण बाधित

 सातारा दि.12 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 34 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील*सातारा 2, बुधवार पेठ 3,प्रतापगंज पेठ 1, शाहुपुरी 1, पिंपोडे बु 1, देगाव 1, पिपुड 1 
*कराड तालुक्यातील*मलकापूर 1,
*पाटण तालुक्यातील* सांगवड 1, सोनाईचीवाडी 1, मारुल हवेली 1, 
*फलटण तालुक्यातील* फलटण 1, सांगवी 2,बुधवार पेठ 1, कोळकी 1,
*खटाव तालुक्यातील* वडूज 1, डिस्कळ 2,
*माण तालुक्यातील* भक्ती 1, 
*कोरेगाव तालुक्यातील* एकंबे 1, पिंपोडे बु 1,  
*जावली तालुक्यातील* पानस 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* कोळी अळी 1, 
*खंडाळा तालुक्यातील* अनुज 1,  शिरवळ 2, 
*इतर*1, सरताळे 1, भिलार 1, पिंपोडे 1,
*एकूण नमुने -296885*
*एकूण बाधित -55265*  
*घरी सोडण्यात आलेले -52614*  
*मृत्यू -1803* 
*उपचारार्थ रुग्ण-848* 
0000

Monday, January 11, 2021

कराडच्या स्टॅण्ड परिसरात आढळली बेवारस बॅग...पुन्हा बॉम्ब असल्याची अफवा...

कराड
आज येथील स्टॅण्ड परिसरात वेलनेस मेडिकल समोर बेवारस बॅग आढळून आली मात्र तपासाअंती त्यात केवळ कपडे असल्याचे निदर्शनास आले 
 हि केवळ अफवा असल्याचे समोर आले असले तरीही हा विषय शहरात मात्र चर्चेत रंगला.

मागील महिन्यात याच ठिकाणी अशीच एक बेवारस बॅग आढळून आल्याने खळबळ माजली होती.बॉम्ब शोध व नाश पथक त्या ठिकाणी बोलावून तपास करण्यात आला असता त्यात  बॉम्ब वगैरे काही नसल्याचे समोर आले होते. ती फक्त एक अफवा ठरली होती, तशीच आजही या सापडलेल्या बॅगेत केवळ कपडे असल्याचे दिसून आल्याने हीदेखील अफवाच असल्याचे समोर आले.  या विषयाची चर्चा रंगल्याचे मात्र दिसून आले. 

आज 24 जण बाधित

सातारा दि.11 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 24 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 2  बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 1, गोडोली 1, कडेगाव 1,
*कराड तालुक्यातील* कराड 1,  
*फलटण तालुक्यातील* फलटण 1,कसबा पेठ 1, शिंदेवाडी 1, साखरवाडी 1, खुंटे 1, फडतरवाडी 2,  
*माण तालुक्यातील* दहिवडी 1, मार्डी 2,   
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1,एकसळ 1, रहिमतपूर 2,त्रिपुटी 1, 
*वाई तालुक्यातील*  सोनगिरवाडी 1,  
*जावली तालुक्यातील* बामणोली 1, रायघर 1,  
*इतर* 1
*इतर जिल्हे* बारामती 1,
*2 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध हॉस्पीटलमध्ये सोनके ता. कारेगाव येथील 76 वर्षीय पुरुष व लोधावडे ता. माण येथील 62 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -295423*
*एकूण बाधित -55231*  
*घरी सोडण्यात आलेले -52584*  
*मृत्यू -1803* 
*उपचारार्थ रुग्ण-844* 
0000

Sunday, January 10, 2021

मी भाजप मध्येच राहणार- खडसे समर्थक आमदारांचे स्पष्टीकरण...माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपले समर्थक राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा केला होता


कराड
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना लवकरच भाजपमधील आपले समर्थक राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांचा हा दावा पोकळ ठरताना दिसत आहे. खडसे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार संजय सावकारेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. सावकारे यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त शहरात लावलेल्या पोस्टरवरील खडसेंच्या फोटोने या चर्चेला बळही मिळालं होतं. पण सावकारे यांनीच आपण भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

संजय सावकारे हे भुसावळचे आमदार आहेत. ते एकनाथ खडसे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सावकारे यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक भुसावळमध्ये लावण्यात आले आहेत. या फलकावर सावकारे आणि खडसेंचे फोटो होते. त्यामुळे सावकारे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर सावकारे यांनीही सारवासारव केलीय. वाढदिवासाचे फलक लावताना संबंधितांनी कुणाचा फोटो लावावा हे मी सांगू शकत नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे या विषयावर गैरसमज करणं चुकीचं आहे. मी भाजपातून निवडून आलो असून भाजपमध्येच राहणार असल्याची स्पष्टोक्ती सावकारे यांनी दिलीय.
सावकारे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने शहरात पोस्टर्स, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यावर फक्त खडसे आणि सावकारे यांचेच फोटो होते. भाजप नेते गिरीश महाजन यांचा फोटो या पोस्टरवरून गायब होता. विशेष म्हणजे सावकारे समर्थकांनी वर्तमानपत्रांनाही जाहिराती दिल्या आहेत. त्यातही खडसे आणि सावकारे यांचे फोटो होते, पण महाजन यांचा फोटो नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोस्टरवर फोटो देताना समर्थकांकडून चूक होऊ शकते, पण वर्तमानपत्रात जाहिरात देताना चूक कशी होऊ शकते? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंनी राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधल्यानंतर त्यांचे समर्थक असलेल्या भाजपातील पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. भुसावळचे आमदार सावकारे खडसेंचे निकटवर्तीय असल्याने त्यांचे नाव देखील या चर्चेत आघाडीवर होते. मात्र, आता सावकारे यांनीच त्यावर खुलासा केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न राष्ट्रवादीच्या "या' नेत्याच्या प्रतिक्रियेमुळे चिघळणार?

कराड
औरंगाबाद महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारमधून दोन भूमिका समोर आल्यामुळं हा वाद अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यानं नामांतराच्या मुद्द्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसनं ठाम विरोध केला आहे. तर, शिवसेनेनं नामांतराच्या हालचालीही सुरु केल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळं आघाडीत दोन गट पडले असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते प्रफु्ल्ल पटेल यांनीही भाष्य केलं आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय झाल्याशिवाय औरंगाबाद नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. औरंगाबादचे नामांतर ही शिवसेनेची भूमिका आहे सरकारची नाही,' प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.
समन्वय समितीत नामांतराच्या विषयावर एकमत झाल्याशिवाय हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. समन्वय समितीत चर्चा होऊन या वादावर तोडगा काढण्यात येईल. शिवसेनेचे नेते औरंगाबादला संभाजीनगर म्हणत असले तरी ती भूमिका सरकारची नाही,' असंही पटेल यांनी म्हटलं आहे,दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही नामांतराचा प्रस्ताव आमच्या अजेंडामध्ये नाहीये. नावं बदलून शहरांचा विकास होतो असं आम्ही मानत नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली होती.

आज 59 जण बाधित ; मलकापुरात दोन रुग्ण सापडले...

सातारा दि.10 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 59 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 1, शुक्रवार पेठ 1, सदर बझार 3, तामजाईनगर 1, शाहूपुरी 1,कन्हेरी 1, नागठाणे 1.
*कराड तालुक्यातील* मलकापूर 2, ढेबेवाडी 1, बनवडी 1,गोवारे 1, हेळगाव 1.
*फलटण तालुक्यातील* रविवार पेठ 1, तोंडले 1, डोंबाळेवाडी 2, खराडे 1.
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, बुध 1, पळसगाव 1, नेर 2, ललगुण 1, वर्धनगड 1,जांब 1,पुसेसावळी 1, ललगुण 1.
*माण तालुक्यातील* मलवडी 2,म्हसवड 1, पिंपरी 1. 
*कोरेगाव तालुक्यातील*  कोरेगाव 1, रहिमतपूर 3.
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 2, मोरवे 1, पळशी 1,शिरवळ 3, नायगाव 1.
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 3. 
*पाटण तालुक्यातील*  पाटण 1.
*वाई तालुक्यातील*  कडेगाव 1.
*जावली तालुक्यातील* मेढा 2.
*इतर* 2
*इतर जिल्हे* सांताक्रुझ (मुंबई) 1, मिरज 2.
*2 बाधितांचा मृत्यु*
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये नरवणे ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये महाबळेश्वर येथील 56 वर्षीय पुरुष अशा 2 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने - 294684*
*एकूण बाधित -55211*  
*घरी सोडण्यात आलेले - 52572*  
*मृत्यू -1801* 
*उपचारार्थ रुग्ण-838* 
0000

Saturday, January 9, 2021

आ पृथ्वीराजबाबा आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात कराडात कमराबन्द चर्चा...

कराड
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कराड येथे कमरे बंद चर्चा झाली. यावेळी या दोघांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनानंतर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज कराड येथे आले होते. उंडाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन थोरात हे कराड येथे आले. यानंतर त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास येथील सर्किट हाऊसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी थोरात अन् चव्हाण यांच्यामध्ये सुमारे अर्धातास कमरबंद चर्चा झाली.
या चर्चेमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या हालचालींसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. चर्चा संपल्यानंतर बाळासाहेब थोरात यांंनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. कमरा बंद चर्चेवेळी त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना बोलावून काही महत्त्वाच्या सूचना केल्या तसेच त्यांच्याकडून जिल्ह्याचा आढावा घेतला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, मनोहर शिंदे, शिवराज मोरे, इंद्रजीत चव्हाण, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहतसिलदार अमरदीप वाकडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आज 91 बाधित...

 सातारा दि.9 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 91 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 3, केसरकर पेठ 1, शाहुपुरी 1, कामेरी 1, अंबवडे 2, भिवडी 1, क्षेत्रमाहुली 1, चिंचणेर वंदन 1, 
*कराड तालुक्यातील* आगाशिवनगर 1, चरेगाव 1, उंब्रज 1
 *फलटण तालुक्यातील* फलटण 3, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, सोनगाव 1, गोळीबार मैदान 1, जाधाववाडी 1, पिंप्रद 1, फरांदवाडी 8, तडवळे 1, बरड 1,मुंजवडी 1
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, वडूज 6,डिस्कळ 1, निमसोड 1.
*माण तालुक्यातील* बिदाल 1, मांढवे 1,
*कोरेगाव तालुक्यातील*  देऊर 1, करंजखोप 2, 
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 9, नायगाव 4, लोणंद 4, पाडेगाव 1, शिंदेवाडी 1, शिरवळ 1, असावली 1,
*पाटण तालुक्यातील*  कोयनानगर 1, भोसेगाव 1, मालदन 1, सुळेवाडी 1, बेलवडे 1, गव्हाणवाडी 5, दुसळे 1
*वाई तालुक्यातील*  दत्तनगर 2, सह्याद्रीनगर 1, 
*जावली तालुक्यातील* पनस 1, बामणोली 1, कुडाळ 1,
*इतर* 3
*इतर जिल्हे* कडेगाव 1,वाळवा 1
*एकूण नमुने - 293857*
*एकूण बाधित -55150*  
*घरी सोडण्यात आलेले -52535*  
*मृत्यू -1799* 
*उपचारार्थ रुग्ण-816*

Friday, January 8, 2021

आज 50 जण बाधित

 सातारा दि. 8 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 50 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 2  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 3, सदर बझार 1,  कोडोली 1, सोनगाव 2, धनवडेवाडी 1, वळसे 2, ठोसेघर 1, 
*कराड तालुक्यातील* कराड 3, आगाशिवनगर 1, कराड 1, मार्डी 1, मुंढे 1, 
*फलटण तालुक्यातील* फलटण 2, बुधवार पेठ 1, स्वामी विवेकानंद नगर 1, जाधववाडी 1, ठाकुरकी 2, सांगवी 1, कारंडवाडी 1, 
*खटाव तालुक्यातील* मांडवे 1, 
*माण तालुक्यातील* ढाकणी 1, पनवण 1, गोंदवले खु 1, 
*कोरेगाव तालुक्यातील* देऊर 1, रहिमतपूर 1, 
*पाटण तालुक्यातील*  बोसगाव 1,मेंध 1,
*वाई तालुक्यातील*  गंगापुरी 1, 
*जावली तालुक्यातील* मेढा 1, सर्जापूर 3,
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1, 
इतर 2
बाहेरील जिल्ह्यातील भोर (पुणे) 1, कुंडल 1, बारामती 1, कोल्हापूर 1, 
एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या पिरवाडी, ता. सातारा  येथील 80 वर्षीय पुरुष, दहिवडी ता. माण येथील 65 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

*एकूण नमुने -292859*
*एकूण बाधित -55055*  
*घरी सोडण्यात आलेले -52476*  
*मृत्यू -1799* 
*उपचारार्थ रुग्ण-780*

Thursday, January 7, 2021

आजपासून कराड येथील वेणूताई चव्हाण रुग्णालयात कोविड लस ड्राय रन झाला...

कराड
 येथील वेणूताई चव्हाण उपविभागीय रुग्णालय येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील  व जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या उपस्थितीत  कोविड लस ड्राय रन  झाला. क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कराड उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मल्हारपेठ ता. पाटण या तीन ठिकाणी ही प्रक्रिया पार पडणार आहे.
 आजच्या कराड येथे झालेल्या या प्रकियेदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनयकुमार गौड, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. सुभाष चव्हाण, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यावेळी उपस्थित होते.