येथील पालिकेत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभांची चर्चा चौक चौकात आहे.या सभेमधून कोण काय बोललं हा चर्चेचा विषय सध्या सगळीकडे चघळला जात असला तरी, या सभांमधून झालेल्या हमरी तुंमरीचे औच्चूक्य अधिक दिसते आहे. दुसरीकडे मात्र शहराचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी या सभांमधून आपले मौन बाळगून सर्वानाच विचार करायला लावले आहे.त्यांच्या गप्प बसण्यामागे नेमके काय राजकारण दडलंय हे समजून घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे.
येथील पालिकेत नुकतीच सर्वसाधारण सभांची मालिकाच जणू पार पडली. एकूण दिडशेच्या आसपास शहरातील विषय या सभांमधून चर्चेत आले.या विषयाच्या वाचन करण्यावरुन सुरुवातीलाच मोठे वादंग पाहायला मिळाले. विषयाचे वाचन करण्याने काहींची झालेली दमछाक पहायला मिळाली तर काहीं जणांनी प्रशासनाला धारेवर धरत कामाचा आग्रह केल्याचे दिसून आले.एकूण तीन सभा टप्या टप्याने पार पडल्या आणि ही सभांची मालिका संपली. उपनगराध्यक्ष जयवंतदादा या सभांमधून पहिल्यापासून मात्र गप्पच दिसले, त्यामुळे या सभेमधून इतर कोण काय बोलले यापेक्षा दादा गप्प का आहेत? याचीच चर्चा झाली. त्यांच्या मौनामागचे कारण काय ? असे प्रश्न आजही लोकांसमोर आहेत.
उपनगराध्यक्ष जयवंत पाटील हे अभ्यासू व शहराच्या प्रश्नांची जाण व माहिती असणारे उपनगराध्यक्ष म्हणून परिचित आहेत. अनेकवेळा रोखठोक व स्पष्टपणे मते मांडून आपल्या कामाचा आवाका दाखवत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्याचे अनेकानी पाहिले आहे. चर्चेत भाग घेऊन उगाचच स्टंट करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. योग्य विषयावर चर्चा घडवून आणण्यात ते नेहमी अग्रेसर असतात. वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळो न मिळो, दररोज पालिकेत हजर राहून लोकांची कामे करताना ते नेहमीच दिसतात.येथील पालिका निवडणुकीला आता काहीकाळ बाकी आहे.त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द चोख बजावली आहे. येथील नगरपालिकेतून उचलबांगडी झालेले यापूर्वीचे वादग्रस्त मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या अनेक भानगडी लोकांसमोर आणत त्यांनी प्रशासनाचा चेहरा वेळोवेळी उघडा पाडला आहे. डांगे यांचे कारनामे शहराच्या राजकारणात कसे व किती घातक आहेत यावर ते वारंवार रोखठोक बोललेही आहेत. शहराच्या प्रश्नांवर भरभरून बोलणारे व प्रशासनाला वेळप्रसंगी धारेवर धरणारे जयवंतदादा यावेळी झालेल्या पालिका सभेमधून मात्र गप्प का राहिले ? याचा विचार झाला पाहिजे......
जनशक्ती आघाडीतील धुसफूस सर्वानाच माहीत आहे.स्वच्छ सर्वेक्षण विषयासंदर्भात सी ओ डाके यांनी काही दिवसांपूर्वी येथील लोकप्रतिनिधींशी "एक' पत्रव्यवहार केल्यानंतर आघाडीच्या वतीने आणि नगराध्यक्षांच्या बाजूने याबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी पत्रकार परिषदा घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी दादां आघाडीच्या पत्रकार परिषदेस उपस्थित दिसले नाहीत तर ते नगराध्यक्षांच्या बाजूने बोलताना दिसले.त्यावेळी त्यांनी यापूर्वीचे वादग्रस्त मुख्याधिकारी डांगे यांच्यावर टीकेची झोड उठवत आघाडीलाही अप्रत्यक्ष घरचा आहेर दिला होता.डांगे आपली कामे ऐकत नाहीत, त्यामागे आघाडी अंतर्गत राजकारण होत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सुचवले होते. त्यानंतर मात्र त्यांचा पार्टी अंतर्गत एकत्र काम करण्यात इंटरेस्ट फारसा दिसला नाही.त्यांनी आपल्याला बसण्यासाठी पालिकेत स्वतंत्र बैठक व्यवस्था व्हावी अशी मागणी देखील केली होती.त्याचवेळी आघाडीत बिघडी झाल्याची चर्चा सुरू झाली. आत्तादेखील त्यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाही आणि त्यातच पालिकेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे त्यामुळे आघाडीशी पुन्हा जुळवून घेण्याच्या मानसिकतेत जयवंतदादा दिसत नाहीत.म्हणून नुकत्याच झालेल्या पालिका सभांमधून सगळे एकत्र दिसले खरे... मात्र सभेसाठी उपस्थित राहून अधूनमधून.फक्त हसत आणि गप्प राहूनच दादानी आपली प्रतिक्रिया देणे पसंत केले. चर्चेत फारसे सहभागी झालेले दिसले नाहीत.
एकूणच सगळ्या घडामोडी पाहता दादांचा
जनशक्ती अंतर्गत काडीमोड आता निश्चित आहे त्यामुळे होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी ते आपली कोणती खेळी नव्याने खेळणार आणि कोणते नवे राजकीय समीकरण जुळवून आणणार? हेच आता पहायचे आहे...
No comments:
Post a Comment