Thursday, January 14, 2021

कराडात येत्या 16 जानेवारी पासून दिली जाणार कोरोनाची लस; जिल्ह्यातील अन्य काही ठिकाणी देखील लस देण्याची सुविधा..

सातारा दि.14 (जिमाका): कोविड संसर्गावरील लस उपलब्ध झाली असून पहिल्या टप्पा 16 जानेवारी पासून सुरुवात होणार असून पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य संस्था अंतर्गत कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभाग, सैन्य दल, हवाई दल व तिसऱ्या टप्प्यात सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे.ही लस स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, कराड, उपजिल्हा रुग्णालय, फलटण, ग्रामीण रुग्णालय पाटण, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव, ग्रामीण रुग्णालय माण, ग्रामीण रुग्णालय खंडाळा, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड, मिशन हॉस्पीटल वाई या ठिकाणी लस देण्यात येणार आहे.  लस घेतल्यानंतरही नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केले.

      जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोरोना लसीबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या पत्रकार परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

 पहिल्या टप्प्यासाठी 24 हजार 410 आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीसाठी नोंदणी करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील 3 आरोग्य संस्थांमध्ये ड्राय-रन (रंगीत तालीम घेण्यात आली) लसीकरणाच्या सत्राच्या ठिकाणी 3 खोल्या तयार करण्यात आलेल्या आहेत. यावेळी सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर केला जाणार आहे. लसीकरणानंतर लाभार्थ्याची 30 मिनिटे पाहणी करण्याकरिता रुममध्ये ठेवण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेसाठी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, तालुका पर्यवेक्ष, सर्व आरोग्य सहायक यांना व्हीसीद्वारे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
00000

No comments:

Post a Comment