कराड:एस जी एम महाविद्यालय येथे आज पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार प्रा जयंत आसगावकर यांचा सत्कार माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे ट्रस्टी ऍडव्होकेट रवींद्र पवार, एसजीएम महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सैदापुरचे सचिन पाटील, नाना जाधव, उदय थोरात, इंद्रजित चव्हाण यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व सेवक वर्ग उपस्थित होते.
*माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* यावेळची पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक हि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आल्याने आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येणे शक्य झाले. आजपर्यंत शिक्षक मतदारसंघातून लोकप्रतिनिधी जे निवडून जात होते त्यांच्यापेक्षा चांगले काम प्रा आसगावकर यांच्याकडून होईल याची मला खात्री आहे याचे मुख्य कारण काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून त्यांच्या मागे पक्ष उभा असेल व यामुळे सभागृहात शिक्षकांचे प्रश्न मांडताना ते मार्गी लावण्यासाठी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी असेल व हि ताकद महत्वाची आहे. यावेळी पहिल्यांदाच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक हि पक्षाच्या पाठिंब्याने लढविली गेली. याचे मुख्य कारण जे मागील काही वर्षात चुकीची प्रवृत्ती पसरत होती. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविताना विचार जपण्याचं काम केलं. माझा विश्वास आहे कि, शिक्षकांचे प्रश्न प्रा आसगावकर सभागृहात मांडतील व ते तडीस सुद्धा नेतील.महाविकास आघाडीचा एकत्रित यशस्वी प्रयोग राज्यभर या शिक्षक व पदवीधर निवडणुकीत पाहायला मिळाला. व या एकीमुळेच राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत २ शिक्षक व ३ पदवीधर मतदारसंघात ३ पदवीधर व १ शिक्षक महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले.
----------
No comments:
Post a Comment