अभिनेते व पूर्व मुखमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव रितेश देशमुख यांनी माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचे चिरंजीव उदयसिह पाटील यांचे त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासरावजी देशमुख व माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे राजकारणा व्यतिरिक्त घनिष्ठ संबंध होते. अनेक वेळा विलासकाका विलासराव देशमुख यांच्या घरी उपस्थित असत. याच ठिकाणी विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख यांची व विलास काका यांची ओळख घट्ट होत गेली. दोन दिवसापासून कराडमधील भोसले कुटुंबीयांकडे पाहुणे म्हणून आलेल्या रितेश देशमुख यांना विलास काका यांच्या निधनाची बातमी समजताच ते विलास काकांच्या अंतिम दर्शनासाठी आले होते. त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती सुरेश बाबा भोसले हे उपस्थित होते. अंतिम दर्शनानंतर अभिनेते रितेश देशमुख यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र, विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव ऍड. उदयसिंह पाटील यांचे सांत्वन करून काकांचे अंतिम दर्शन घेतले
No comments:
Post a Comment