Monday, January 18, 2021

ग्रामपंचायत निकाल ; महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर

कराड
 माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का बसल्याचं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. कराडमधील महत्वाच्या अशा दोन ग्रामपंचायतींवर भाजपच्या पॅनेलने विजय मिळवला आहे. शेणोली शेरे आणि कार्वे गावात भाजपप्रणित पॅनेलनं विजय मिळवला आहे. हा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कार्वे गावात अतुल भोसले यांचे पॅनेल विजयी झाले आहे. कार्वे ग्रामपंचायतीच्या 17 जांगांपैकी 10 जागांवर भाजपच्या पॅनेलनं विजय मिळवला आहे. तर पृथ्वीराज चव्हाण समर्थकांच्या गटानं 7 जागांवर विजय मिळवला. ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला अपयश आलं आहे.

शेणोली शेरेमध्ये अतुल भोसलेंच्या पॅनेलचा विजय
कराड तालुक्यातील शेणोली शेरे गावात पृथ्वीराज चव्हाणांना धक्का बसला असून भाजपच्या अतुल भोसले यांच्या पॅनेलनं एकतर्फी विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे कार्वे गावातही भाजप समर्थित पॅनेलनं विजय मिळवला आहे.

खुबीमध्येही अतुल भोसलेंची विजयी सलामी

दुसरीकडे कराड तालुक्यातील पहिला निकाल खुबी या गावचा लागला आहे. खुबी गावात भाजपचे अतुल भोसले यांच्या पॅनले दणदणीत विजय मिळवला आहे. अतुल भोसले यांच्या पॅनलनं विरोधकांचा 9 विरुद्ध 0 अशा मोठ्या फरकानं दारुण पराभव केला आहे.

कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटलांचं वर्चस्व

विधानसभेच्या प्रतिष्ठित कराड उत्तर मतदारसंघातील पहिला ग्रामपंचायत निकाल हाती आला आहे. निगडी गावात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झालाय. 8 विरुद्ध 1 अशा मोठ्या फरकानं बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे. पाटील यांच्या पॅनलपुठे विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कराड उत्तरमधील निगडी गावात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा
निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
एकूण प्रभाग- 46,921
एकूण जागा- 1,25,709
प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

No comments:

Post a Comment