Thursday, August 14, 2025

कराड शहरातील मतदार यादीत बाहेरील भागातील नावे समाविष्ठ झाल्याचे निष्पन्न - याबाबत योग्य ती कारवाई करा: सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पेंढारकर, दीपक पाटील,अजय उंडाळकर व विक्रम जाधव यांची मागणी ; प्रांतांना निवेदन सादर ;

वेध माझा ऑनलाईन
परगावातील परजिल्ह्यातील तसेच शहर भागातील दुसऱ्या पेठेतील मतदारांची नावे कराड दक्षिण मतदार संघांतर्गत असणाऱ्या कराड शहरातील मतदार यादीत समाविष्ठ झाल्याचे निदर्शनास आले असल्याने याबाबतची योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील व अजय उंडाळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे

निवेदनात म्हटले आहे की चुकीच्या भागात नोंद झालेली नावे त्याठिकाणहून वगळून योग्य त्या ठिकाणी नोंद व्हावीत जेणेकरून त्याही लोकांचा मतदान हक्क अभाधित राहील 
तसेच काही स्थलांतरित मतदारांसह दुबार व मयत मतदारांची  नावे देखील
संबंधित यादीत आहेत याबाबत देखील योग्य तो बदल व्हावा
ऑनलाइन नोंदणीमुळे चेकलिस्टला पडणारी नावे चेक करून त्यानंतर नावे संबंधित लिस्टमध्ये समाविष्ट करावी
बाहेरील नावे अजूनही लिस्ट मध्ये नोंद होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे
संबंधित मतदार यादीत 30 ऑक्टोबर  2006 पूर्वी जन्म झालेल्यांची नावे नोंद होताना दिसत आहेत मात्र 1 नोव्हेम्बर  नंतर जन्म झालेल्याची नावे या यादीत नोंद होत नाहीत तसेच 18 वर्षे पूर्ण झालेल्यांची नावे देखील या मतदार यादीत नोंद होत नाहीत  याकडे लक्ष देऊन संबंधित प्रशासनाने यावर तोडगा काढावा अशीही मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे
दरम्यान सदर मागण्यांचे निवेदन माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, अजय उंडाळकर व विक्रम जाधव यांनी कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे  याना आज दिले

No comments:

Post a Comment