Tuesday, August 26, 2025

मी जाणारच… हायकोर्टाची मनाई तरी जरांगेंचा निर्धार कायम ;

वेध माझा ऑनलाइन
आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहोत आणि लोकशाही पद्धतीने करण्यात येणारं आंदोलन कधीही रोखता येत नाही. सरकारने गोर गरिबाच्या भावनांशी खेळू नये, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. तर नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं पण आझाद मैदानावर नाही, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे.  मुंबई हायकोर्टाने दिलेल्या या आदेशावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे ते असेही म्हणाले की, मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी नाकारली जाते आणि नवी मुंबई खारघर इथे परवानगी दिली जाते. मग आझाद मैदानावर काय प्रॉब्लेम आहे? न्यायालयाचा सन्मान करणारे लोकं आहोत. कायद्याच्या नियमात राहून अर्ज करून परवानगी मागितली आहे. त्यामुळे शंभर टक्के आम्हाला न्यायालयाकडून परवानगी मिळणार, असा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment