एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे येथील संगणक अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. हर्षद नंदकुमार लोखंडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून "Electronics and Telecommunication Engineering" या शाखेत पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
"Object Identification and Tracking for Surveillance Applications" या विषयावर त्यांनी आपले संशोधन प्रबंध सादर केला होता. हे संशोधन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. संजय गणोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
या शैक्षणिक प्रवासात सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत लोखंडे यांचा मोलाचा सहभाग आहे, तसेच इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. एम. बी. माळी, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे, MIT ADT युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पूजेरी, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. गणेश पाठक, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. रमेश माळी यांचे सततचे प्रोत्साहन, सहकार्य आणि संस्थात्मक पाठबळ लाभले.
प्रा. डॉ. हर्षद लोखंडे यांनी आजपर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 20 संशोधन लेखांचे प्रकाशन केले असून, त्यांनी 5 आंतरराष्ट्रीय व १ राष्ट्रीय परिषदांमध्ये आपले संशोधन सादर केले आहे. तसेच, त्यांना १ जर्मन पेटंट आणि १ भारतीय पेटंट मंजूर झाले आहेत. त्यांच्या संशोधन कार्याचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.
प्रा. डॉ. हर्षद लोखंडे हे दैनिक ‘कर्मयोगी’ चे मालक व प्रकाशक प्रा. एन. डी. लोखंडे आणि संपादिका सौ. मंगलताई लोखंडे यांचे चिरंजीव असून, ते 15 वर्षांच्या अभियांत्रिकी अनुभवातून, MIT ADT युनिव्हर्सिटी, पुणे येथून गुणवत्तापूर्ण अध्यापन करीत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment