येथील बुधवार पेठेत छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या मुलांना अभ्यासासाठी शिवसेना नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नगरपालिकेच्या जागेत पंचशील अभ्यासिका बांधण्यात आली आहे. या अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राजेंद्रसिंह यादव यांनी शहराची वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी जिथे जागा मिळेल तिथे आणखी अभ्यासिका बांधण्याची घोषणा केली.
बुधवार पेठेतील नागरिक आणि पालकांनी या अभ्यासिका उभारणीबद्धल यादव यांचे कौतुक केले आहे. या अभ्यासिकेसाठी २५ लाख १७ हजार ८८४ रुपये खर्च आला आहे.
मा. नगरसेवक निशांत ढेकळे, माजी सभापती विजय वाटेगावकर, सौ. स्मिता हुलवान, विनोद भोसले, प्रीतम यादव,राहुल खराडे, राजाभाऊ डुबल,शांताराम थोरवडे, किशोर आठवले, राजकुमार लादे सर, राहुल भोसले, प्रभाकर थोरवडे, सुरेश लादे,सुरेश लादे, राहुल भोसले, विजय काटरे, गौतम लादे, मिलींद कांबळे, विजय लादे, दिलीप काटरे, योगेश लादे, प्रवीण लादे,आप्पासाहेब गायकवाड, युवा नेते संदीप पवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुलोचना पवार व शिवसेना शहर शाखेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका आणि संघटित व्हा, असा मंत्र दिला. शिक्षण हेच माणसाच्या परिवर्तनाचे प्रमुख शस्त्र आहे. गोरगरीब मुलांना शिक्षण घेताना अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण हवे असते. बुधवार पेठ दाट लोकवस्तीचा भाग आहे. येथील घरे छोटी आहेत. त्यामुळे मुलांना अभ्यासासाठी अभ्यासिका बांधली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडच्या विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी दिला. यापुढेही महायुतीच्या माध्यमातून आणखी शेकडो कोटी शहराच्या विकासासाठी येतील, असे राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.
कराड शहराच्या विकासाच्या फेज टू संकल्पने अंतर्गत अनेक विकासकामे प्रस्तावित आहेत. त्याची सुरुवात पंचशील अभ्यासिकेच्या लोकार्पणाने झाली आहे, असे यादव म्हणाले.
जनता यादव यांच्या पाठीशी ;
राजकुमार लादे यांची ग्वाही ;
बुधवार पेठ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सुशोभीकरण, महात्मा फुले पुतळा सुशोभीकरण, अण्णाभाऊ साठे समाजमंदिर, पंचशील अभ्यासिका अशी अनेक विकासकामे यादव यांनी मंजूर केली आहेत. या भागातील जनता गटतट विसरून त्यांच्या पाठीशी राहिल, अशी ग्वाही राजकुमार लादे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, बुधवार पेठेतील नगरपरिषद शाळा क्रमांक १० येथे ७ लाख ६९ हजार ६६४ रुपयेचे सिमेंट ब्लॉक बसवणे या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले.
No comments:
Post a Comment