“गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!” या गजरात गणेशोत्सवाचा उत्साह कराड शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ओसंडून वाहतो आहे. परंतु गणेश मूर्ती घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याची तसंच वाहतुकीची समस्या अनेक भक्तांसमोर उभी राहत होती. याच पार्श्वभूमीवर कराड शहराचे माजी नगरसेवक माननीय सुहास शिवाजीराव जगताप (भैय्या) यांनी पुढाकार घेत भक्तांसाठी एक भक्तिभावाने सेवाभावी उपक्रम राबवला.
जगताप यांनी तब्बल ३० ते ४० रिक्षांची मोफत व्यवस्था करून गणेश भक्तांना मूर्ती घरापर्यंत नेण्याची सोय उपलब्ध करून दिली. यामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचणीशिवाय भक्तांनी आपल्या गणरायाला हर्षोल्हासात घरी आणले. रस्त्यांवर भक्तिगीतांच्या तालावर दणदणाट होत असताना, रिक्षांची ही सेवा मिळाल्याने भक्तांमध्ये समाधान, कृतज्ञता आणि आनंदाचे वातावरण होते.
या उपक्रमाचा शुभारंभ भाजप शहराध्यक्ष सुषमा लोखंडे, माजी नगरसेवक आप्पा माने, विनायक कदम, प्रशांत कुलकर्णी, दिलीप पाटील, हनमंत पाटील, वैभव माने, आबा कोळी, महेश कांबळे, सुधीर झेंडे, परेश काटवे दिलीप जाधव यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने श्रीफळ फोडून करण्यात आला. या वेळी शहरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
भक्तगणांच्या प्रतिक्रिया...
> “गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, पण त्यांच्या सेवेतून विघ्न टाळण्याचे काम सुहास भैय्या यांनी केले. अशा उपक्रमामुळे खरी समाजसेवा आणि भक्तीभाव अनुभवायला मिळतो.”
No comments:
Post a Comment