अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक युवा नेते विनायक कदम यांच्या प्रयत्नाने व कराड नगरपरिषद प्रशासनाच्या सहकार्याने वार्ड क्रमांक 2 मधील रस्त्यातील खड्याना बुजवण्याची मोहीम नुकतीच राबविण्यात आली विनायक कदम यांनी स्वतः त्याठिकाणी थांबून ही कामे त्यांनी करून घेतली त्यानिमित्ताने त्यांच्या वार्ड क्रमांक 2 मधील लोकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे
सामाजिक कार्यकर्ते विनायक कदम हे भाजप व आमदार डॉ अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जातात ते विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर दिसतात त्यांचा लोकसंपर्क मोठा आहे त्यांनी कोरोनात केलेल्या कामाची नेहमीच मोठी चर्चा होत असते नुकतेच त्यांनी वार्डातील नवमतदार नोंदणीचा यशस्वि कार्यक्रम घेत पक्ष नेतृत्वाकडून वाहवा मिळवली
त्यांनी वार्डातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी पालिकेत जाऊन मागच्या आठवड्यात निवेदन दिले होते त्यानंतर पालिकेने तत्काळ त्याठिकाणच्या कुत्र्यांची धरपकड करत त्यांची नसबंदि केली होती
नुकतीच त्यांनी वार्ड क्रमांक 2 मधील रस्त्यात असणारे खड्डे बुजवण्याची मोहीम राबवली आहे त्याठिकाणी असलेल्या खड्ड्यामुळे तेथिल लहान मुले महिला व वयस्कर लोकांना रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे व तेथील खड्यामुळे येता जाताना चांगलीच कसरत करावी लागत होती किरकोळ अपघात देखील त्याठिकाणी होत होते त्यामुळे वादविवादाला त्याठिकाणी अनेकांना तोंड द्यावे लागत होते
मात्र आज विनायक कदम यांनी त्याठिकाणी सुरू केलेल्या रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या मोहिमेमुळे तेथील रहिवाश्यानी समाधान व्यक्त केले आहे
No comments:
Post a Comment