वेध माझा ऑनलाइन।
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी नेहमीच ओळखले जातात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ते चांगलेच फटकरताना अनेकदा पाहायला मिळाले आहेत. मग त्यामध्ये सामान्य माणून असो किंवा अधिकारी अजित पवार हे नियमावर बोट ठेवून शिस्तीचे पालन करण्यास सांगत असतात. तसेच अजित पवार कार्यकर्ते असतील किंवा ठेकेदार त्यांनाही अनेकदा झापताना दिसतात. आजही बीडमध्ये अजित पवारांनी एका समर्थकाची चांगलीच कानउघडणी केल्याचं समोर आलं.
एक समर्थक अर्ज घेऊन अजित पवारांकडे आला. यावेळी अजित पवारांनी तो अर्ज घेताच समर्थक काहीतरी बोलू लागला. यानंतर एक मिनिट ऐकायला शिक...कागद दिलंय ना...आम्ही तीन पक्षाचे सरकार आहे. महामंडळाचे वाटप अद्याप झालेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कोणती महामंडळ हे ठरेल...आमच्या वाट्याला महामंडळ आलं तर आम्ही विचार करू...नाही आलं तर ज्यांच्या वाट्याला येईल त्यांना जाऊन भेटा, असं म्हणत एका सराफा असोसिएशनच्या अध्यक्षाला चांगलंच फैलावर घेतलं. या समर्थकाची कान उघडणे केल्यानंतर इतर समर्थकांनी मात्र काढता पाय घेतला.
No comments:
Post a Comment