Saturday, August 30, 2025

फडणवीसांचं सरकार उलथवण्याचा डाव ! हाकेंचा गंभीर आरोप ; रोख अजितदादा पवार यांच्यावर ;

वेध माझा ऑनलाइन
मुंबईमध्ये जरांगेंच्या आंदोलन स्थळी येऊन विरोधी आमदार खासदारांसह सत्ताधारी आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केला आहे. फडणवीसांचं सरकार उलथवण्यासाठी अजित पवार यांचे आमदार सुद्धा सहभागी झाल्याचा आरोप हाकेंचा आहे. या आरोपांना किनार आहे, दादांच्या आमदारांच्या भेटीगाठी… जरांगेंच्या आंदोलन स्थळी सत्ताधारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेत पाठिंबा जाहीर केला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या चेहऱ्या आडून आमदार आणि खासदार यांचा सरकार बदलण्याचा प्रयत्न असल्याचा थेट आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. तर सर्वपक्षीय आमदार खासदारांचं मनोज जरांगे पाटील यांना चांगलंच समर्थन वाढतंय. जरांगे पाटील मुंबईत येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या आंदोलनाला कोणाचं पाठबळ आहे. हे सर्वांनाच माहिती आहे, असं म्हटलं होतं. त्यावरून फडणवीसांचा रोख नेमका कोणावर? यावरून तर्क वितर्कांना सुरूवात झाली आहे.

No comments:

Post a Comment