Sunday, June 14, 2020

जुलै पासून टप्याटप्याने शाळा सुरू होण्याची शक्यता


अजिंक्य गोवेकर
कराड
कोरोना प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या शाळांचे सत्र कधी आणि कसे सुरू होणार हा प्रश्न  पालक, विद्यार्थ्यांसह शिक्षण विभागालाही  पडला होता. पण शिक्षण विभागाने यावर टप्याटप्याने शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार केला असून मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे  पाठविला आहे.
         जुलैपासून ऑनलाईन शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभाग विचार करत असले तरी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून सूट देण्यात आली  आहे. आणि नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग फक्त जुलैमध्ये सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला असून, त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.
         *त्याचप्रमाणे शाळा सुरु करण्यापूर्वी एक महिना गावामध्ये किंवा परिसरामध्ये कोविड १९ चा रुग्ण आढळला नाही याची खात्री करून शाळा सुरु करण्यात येणार आहे*.      .
       यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला असून त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
      सर्वसाधारणपणे शाळा सुरु करण्यासंदर्भातील वेळापत्रक ठरविण्यात आले आहे, त्यानुसार
         नववी, दहावी, बारावी चे वर्ग जुलै  २०२० पासून
सहावी ते आठवी चे वर्ग  ऑगस्ट २०२० पासून ,
इयत्ता पहिली ते पाचवी चे वर्ग  सप्टेंबर २०२० पासून आणि
अकरावी चे वर्ग  दहावीच्या निकालावर आधारित  सर्व पूर्ततेनंतर  प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती  शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

Saturday, June 13, 2020

आज जिल्ह्यात एकूण 8 जण कोरोना बाधित

सातारा दि. 13 (जि. मा. का):  आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या 8 नागरिकांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा  शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये  *सातारा तालुक्यातील* कोडोली येथील 42 वर्षीय पुरुष,  वय 17 व 14 वर्षीय युवती.
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद (आनंदगाव) येथील 38 वर्षीय महिला.
*वाई तालुक्यातील* शेलारवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, बावधन नाका वाई येथील 25 वर्षीय पुरुष.
*कराड तालुक्यातील* तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष
*महाबळेश्वर तालुक्यातील* बेल एयर हॉस्पीटलमध्ये मुळचा चेंबूर मुंबई येथील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 726 झाली असून कोरोनातून 499 ब-या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 196 इतकी झाली आहे तर  31 जणांचा मृत्यु झालेला आहे.

Thursday, June 11, 2020

जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचा दणका ; आणखी 13 जण सापडले पॉझिटिव्ह

सातारा दि. 11  (जिमाका) :  महाबळेवर तालुक्यातील कुरोशी येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तसेच खटाव तालुक्यातील निढळ येथील 20 वर्षीय गरोदर स्त्रीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
बाधित रुग्णांमध्ये *फलटण तालुक्यातील* वडाळे येथील 40 वर्षीय महिला, 12  वर्षीय मुलगा, 1 वर्षीय बालक, 89 व 30 वर्षीय पुरुष, बरड येथील 23 व 26 वर्षीय पुरुष.
*खटाव तालुक्यातील* निढळ येथील 20 वर्षीय महिला.
*महाबळेश्वर तालुक्यातील* कुरोशी येथील 55 वर्षीय पुरुष (मृत) या व्यक्तिने गळपास घेवून काल आत्महत्या केलेली होती. मृत्यू पश्चात त्याच्या स्त्रावाचे नमुने घेतले होते त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
*वाई तालुक्यातील* आसरे येथील 55 वर्षीय पुरुष
*जावली तालुक्यातील* ओझरे येथील 5 वर्षाची मुलगी, 34 वर्षीय पुरुष व 25 वर्षाची महिला यांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 703 रुग्ण आढळले आहेत. 448 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये 223 जणांवर उपचार सुरु असून  30 जणांचा मृत्यु झालेला आहे.
0000

कराडात " आरोग्यम ' उपक्रमाचा संकल्प ; चंद्रकांतदादाच्या आवाहनाला प्रतिसाद ; यशवंत बँकेचाही सहभाग

कराड
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री चंद्रकांतदादा_पाटील यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे यंदाच्या वर्षी "आरोग्यम्' हा उपक्रम संकल्पित करण्यात आला.या उपक्रमास प्रतिसाद म्हणुन आज शेखरजी चरेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय_जनता_पार्टी व यशवंत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत भवन येथे कराड शहरातील विविध  धार्मिक स्थळांना सॅनिटायजरचे  स्टॅन्डसहित वाटप करण्यात आले.

यावेळीलोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.रोहिणीताई उमेश शिंदे , उद्योजक श्री.मुकुंददादा चरेगांवकर, मा.नगरसेवक श्री.घनश्याम पेंढारकर (काका),उद्योजक श्री ज्ञानदेव राजापुरे साहेब ,श्री.नितीन वास्के , भाजपा कराड शहर उपाध्यक्ष श्री.उमेश शिंदे ,भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाअध्यक्ष सातारा श्री.रुपेश मुळे , श्री. किरण मुळे, श्री.समाधान चव्हाण,श्री.साबीरमिया मुल्ला,अंकुश खैरमोडे, श्री.विजय काटवटे, विनोद पवार , सौरभ शहा व यशवंत बँकचे CEO धनंजय डोईफोडे ,सौ.वैशाली मोकाशी , श्री.रुपेश कुंभार, सौ.श्रध्दा जोशी व पदाधिकारी उपस्थित होते.
  

छ.शिवाजी स्टेडियम परिसरात आयुर्वेदिक काढ्याचे मोफत वाटप


कराड,दि.11(प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, सुखायु फाऊंडेशन आणि ध्यास मंच कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रोग प्रतिकार शक्ती वाढविणार्‍या आयुर्वेदिक़ काढ्यांचे मोफत वाटप येथील छ.शिवाजी स्टेडियम परिसरात व्यायामासाठी येणार्‍या नागरीकांना करण्यात आले. नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविणे हा या जनजागृती अभियानामागचा प्रमुख उद्देश आहे.

आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या या आयुर्वेदीक काढ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती व सुखायु फाऊंडेशनच्या माध्यमातून कराड शहरात ठिकठिकाणी कोरोनाच्या लढाईत सक्रिय असणार्‍यांना मोफत वाटप केले जात आहे. हे अभियान गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. येथील छ.शिवाजी स्टेडियम परिसरात सकाळी व्यायामासाठी येणार्‍या नागरिकांना गेल्या एक आठवड्यापासून मोफत आयुर्वेदीक काढ्याचे वाटप केले जात आहे. या काढा वितरणाचा शुभारंभ मुळचे कराडचे व सध्या गडचिरोली येथे कार्यरत असलेले जिल्हा पोलिस उपअधिक्षक संकेत गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत छ.शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

यावेळी सुखायु फाऊंडेशनचे अध्यक्ष वैद्य नचिकेत वाचासुंदर,  रा.स्व.संघाचे जिल्हा बौद्धिक प्रमुख राजेंद्र आलोणे, जिल्हा कार्यवाह श्रीकांत एकांडे, सहकार्यवाह गणेश गिजरे, दादासो मानकर, सचिन जोशी व संघाचे स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी आरोग्यप्रेमी नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग ठेऊन या काढ्याचा लाभ घेतला. या उपक्रमाचे नियोजन ध्यास मंच कराडचे दीपक खटावकर व त्यांच्या सहकार्‍यांनी केले.

Wednesday, June 10, 2020

आत्ताचा रिपोर्ट ; 17 जण सापडले बाधित ; जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक

सातारा (जि मा का) आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात 17 जण कोरोना बाधित सापडले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

*सविस्तर माहिती थोडा वेळात*

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने लोक भयभीत झाले असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. प्रशासनाची तारांबळ उडाली असून कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस जिल्ह्याभोवती घट्ट होत चालला असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात कशी येणार याच प्रश्नाने प्रशासनाची झोप आता उडाल्याचे दिसते आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात...



Tuesday, June 9, 2020

धक्कादायक ; जिल्ह्यातील आणखी 20 जण सापडले पॉझिटिव्ह

सातारा दि. 10  (जिमाका) : रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कराड तालुका - 12, वाई तालुका - 3, सातारा तालुका - 3, जावली तालुका - 1, फलटण तालुका - 1 असे एकूण 20 जणांचे रिपोर्ट कोरोना बाधित आल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
बाधित रुग्णांमध्ये   *फलटण तालुक्यातील* तांबवे येथील 25 वर्षीय पुरुष.
*जावळी तालुक्यातील*  ओझरे येथील 75 वर्षीय पुरुष.
*कराड तालुक्यातील*  तुळसण येथील 26, 60, 51 वर्षीय पुरुष, 28, 40 वर्षीय महिला, केसे येथील 50,42,64,20 व 60 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष. शिंदेवाडी येथील 42 वर्षीय् महिला.
*वाई तालुक्यातील* वेरुळी  येथील 46 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा , 26 वर्षीय महिला.
*सातारा तालुक्यातील* कुसवडे येथील 19 व 47 वर्षीय महिला, देगांव येथील 55 वर्षीय पुरुष.