Wednesday, December 16, 2020

नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकर यांना टिळक हायस्कुलचा समाजभूषण पुरस्कार जाहीर... अनेक मान्यवरांनी केले अभिनंदन...

अजिंक्य गोवेकर
कराड-
येथील नगरसेवक व नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांना येथील टिळक हायस्कुलच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने दिला जाणारा     समाजभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे सम्पूर्ण शहरासह जिल्ह्यातून कौतुक होत आहे.अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे....
 शहराच्या स्वच्छतेसह अनेक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेणारे मेहेरबान वाटेगावकर यांनी शहरातून होणाऱ्या प्रत्येक सामाजिक उपक्रमामधून आपला सहभाग नोंदवत आपले समाज्याप्रति असणारे कर्तव्य वेळोवेळी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. नियमित नगरपालिकेत उपस्थित राहून कोणत्याही प्रभागातील लोकांना कधीही,काहीही अडचण आल्यास पुढे होऊन ती सोडवताना त्यांना अनेकांनी पाहिलंय. विशेष म्हणजे शहरातील असणाऱ्या प्रत्येक राजकीय पार्टीमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. ते  या राजकीय पार्ट्यांमधील सदस्यामध्ये असे काहीवेळा मिक्स झालेले दिसतात,जणू त्याच पार्टीचे सदस्य वाटू लागतात,असे त्यांचे वैशिष्ठय आहे... अजातशत्रू म्हणून त्यांची शहरात ओळख आहे. टिळक हायस्कुल चे ते माजी विद्यार्थी आहेत.बांधकाम व्यवसायिक म्हणूनदेखील त्यांची ओळख आहे.नियमित नगरपालिकेत येऊन लोकांची कामे करणारे लोकसेवक म्हणून त्यांना ओळखतात. साधे मात्र काम करणारे राजकीय व्यक्तिमत्व अशीही त्यांची ओळख आहे. आपला वाढदिवस नुकताच त्यांनी सामाजिक बांधिलकी समजून मुख्यमंत्री निधी साठी 11000 रुपयांचा पालकमंत्र्यांकडे चेक देत साधेपणाने मात्र सामाजिक उपयोगाचे उपक्रम राबवत साजरा केला होता आणि आपल्या कर्तव्यभावनेचे त्यातून दर्शन दिले होते. येथील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांनी कोरोना काळात हॅन्डफ्रि वॉश बेसिन भेट दिले होते. पोलिसांना कोरोनाच्या विळख्यात काम करताना याचा उपयोग झाला. उदात्त हेतूने त्यांनी केलेले हे साहाय्य खरोखरच अनेकांच्या कौतुकाचा त्यावेळी विषय ठरले. गरजूंना शिवभोजनाचे मोफत वाटप करत त्यांनी सर्व जेवणाचे सर्वांचे पैसे स्वतः भरून आपली संवेदनशीलता दाखवली होती . त्यांनी मधल्या लॉक डाऊन काळातदेखील जीवनावश्यक वस्तूंचे समाजातील गोरगरिबांना वाटप केले होते. हे करताना प्रसिद्धीपासून लांब राहून आपले कर्तव्य म्हणून हे आपल्याला केले पाहिजे या भावनेने त्यांनी हे काम केले आहे .लॉक डाऊन सुरू असताना गरिबांच्या भावना ओळखून वाटेगावकर यांनी दिलेल्या या योगदानाचे सर्वत्र कौतुक झाले . त्यांच्या सामाजिक कामांची लिस्ट मोठी आहे.याठिकाणी त्या सगळ्या कामाचा उल्लेख करणे शक्य नसले,तरी, त्यांच्या एकूणच सार्वजनिक जीवनातील कामाची पद्धत, त्या कामाचे शहराच्या लोकांसाठीचे योगदान वाखाणण्यासारखे असून ते कौतुकास्पद व आदर्शवत देखील आहे. आज येथील टिळक हायस्कुल च्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा सामाजिक पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.शहरातून नगरसेवक वाटेगावकर यांचे अभिनंदन होताना दिसतय...

आज जिल्ह्यात 100 जण बाधित

सातारा दि.16 (जिमाका): जिल्ह्यात काल  मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  100 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 2, शुक्रवार पेठ 1, तामजाईनगर 1, अजिंक्य कॉलनी सातारा 1, जगतापवाडी 1,  अतित 2, अंगापूर 1, कोंडवे 1, नेले 1, फडतरवाडी 1, शिवथर 2, नरवडे 1, लावंगर 1,  
*कराड तालुक्यातील* कराड 2, मंगळवार पेठ 2, उंब्रज 1, रेठरे बु 1, अटके 1, सैदापूर 1, पोटळे 1, नंदलापूर 1, पाडळी 1, मसूर 4,  
*पाटण तालुक्यातील* सोनाचीवाडी 2, तारळे 1, मल्हार पेठ 1,  
*फलटण तालुक्यातील* पवारवाडी 1, मलटण 1, उपळवे 1, ताथवडा 2, वाखरे 1, वाठार निंबाळकर 1,  होळ 2,
*खटाव तालुक्यातील* निमसोड 2, वडूज 1, पुसेगाव 2,   
*माण  तालुक्यातील* गोंदवले 1, कुकुडवाड 1, किरकसाल 3, राणंद 1, दहिवडी 3, बालवडी 1,   
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, फडतरवाडी 1,  कटापूर 1, भाडळे 1, पळशी 1, 
 *जावली तालुक्यातील* सायगाव 1, बहीवडी 1, सरताळे 6,  
*वाई तालुक्यातील* दत्तनगर वाई 1, हातेघर 1, 
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 3, शिरवळ 3, पाडळी 1, बावडा 5,  
*महाबळेश्वर तालुक्यातील* माचतुर 2, मेटगुटाड 1, पाचगणी 1, देवळाली 1, 
इतर 4, एकंबे 1, तडवळे 3, सैदापूर 1,
बाहेरील जिल्ह्यातील 
*4 बाधितांचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येथील करंजे पेठ येथील 65 वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कृष्णानगर ता. सातारा येथील 81 वर्षीय पुरुष, खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, बोरखळ ता. सातारा येथील 77 वर्षीय पुरुष  अशा एकूण 4  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -269840*
*एकूण बाधित -53744*  
*घरी सोडण्यात आलेले -50506*  
*मृत्यू -1779* 
*उपचारार्थ रुग्ण-1459* 
0000

Tuesday, December 15, 2020

आज जिल्ह्यातील 67 जण बाधित

सातारा दि.15 (जिमाका): जिल्ह्यात काल  सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील*  सातारा 5, गुरुवार पेठ 1, सदरबझार 3, प्रतापसिंहनगर 1, सैदापूर 1, भोसे 1, मार्डे 1, लिंब 1, नेले 2, मरडे 1, शिवथर 1,
*कराड तालुक्यातील* रविवार पेठ 1, बुधवार पेठ 1, कोयना वसाहत 1, कपील 1, येळगाव 1, मलकापूर 1, आटके 1,   
*पाटण तालुक्यातील* 
*फलटण तालुक्यातील* फलटण 2, फडतरवाडी 1, साखरवाडी 1,निंभोरे 1, धुळदेव 1, वाखरी 1, सासवड 2, अलगुडेवाडी 4,     
*खटाव तालुक्यातील* वडूज 3, खटाव 1, 
*माण  तालुक्यातील* धामणी 1, पर्यंतीर 1, गोंदवले 1, म्हसवड 4, दहिवडी 2,  
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 3, भाडळे 4, आर्वी 1, वाठार किरोली 1, 
 *जावली तालुक्यातील* सोनगाव 1, 
*वाई तालुक्यातील* वाई 1, बावधन 1, 
*खंडाळा तालुक्यातील* 
*महाबळेश्वर तालुक्यातील* 
इतर 1,  तांबवे 1, देवली मुरा 1, सरताळे 1, 
बाहेरील जिल्ह्यातील 
*4 बाधितांचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येथील साखरवाडी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये गोटे ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, शिवथर ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष 4  अशा एकूण  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -268544*
*एकूण बाधित -53644*  
*घरी सोडण्यात आलेले -50305*  
*मृत्यू -1775* 
*उपचारार्थ रुग्ण-1564* 
0000

Sunday, December 13, 2020

आज जिल्ह्यातील 86 जण बाधित

सातारा दि.14 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 86 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  3  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील*  रविवार पेठ 2, संभाजीनगर 1, शाहुपुरी 1, शुक्रवार पेठ 1, करंजे पेठ 2, मोळाचा ओढा 1, सोनगिरवाडी 1, कृष्णानगर 2, किडगाव 1, देगाव 1, निनाम पाडळी 1, जळगाव 1, कारंडवाडी 6, जांभे 2 
*कराड तालुक्यातील*  कराड 1, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 3, 
*पाटण तालुक्यातील* तारळे 2,   
*फलटण तालुक्यातील* फलटण 1, पवारवाडी 1, जिंती नाका 1, साखरवाडी 2, गुणवरे 1, होळ 2, मलटण 1, मुरुम 2,धुळदेव 1, सांगवी 1, वाठार निंबाळकर 1,    
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, पुसेगाव 4, कातरखटाव 2, भुरकरवाडी 1, वडूज 2, विसापूर 1,    
*माण  तालुक्यातील* मलवडी 1, शेवरी 1, दहिवडी 1, गोंदवले बु 1, म्हसवड 1, दिवड 1, गाटेवाडी 1, ढाकणी 1,  
*कोरेगाव तालुक्यातील* वाठार स्टेशन 1,   
 *जावली तालुक्यातील* सोनगाव 1, ओझरे 1,  
*वाई तालुक्यातील* वाई 1, जांभ 1,भुईंज 1, बावधन 1,  
*खंडाळा तालुक्यातील* भादे 1, लोणंद 1, शिरवळ 1, बावडा 2,    
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, मेटगुटाड 1, पागचणी 1,  
इतर 3, कारंडेवाडी 1, पापर्डे खु 2, 
बाहेरील जिल्ह्यातील ठाणे 1, 
*3 बाधितांचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात कोरेगाव येथील चिमणगाव ता. कोरेगाव येथील 74 वर्षीय महिला, शिरढोण ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये वारोशी ता. जावली येथील 77 वर्षीय पुरुष  अशा एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -267462*
*एकूण बाधित -53577*  
*घरी सोडण्यात आलेले -50177*  
*मृत्यू -1771* 
*उपचारार्थ रुग्ण-1629* 
0000

Saturday, December 12, 2020

अआज जिल्ह्यात 88 जण बाधीत

सातारा दि.13 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 2, सदर बझार 1, शाहुपुरी 1, करंजे 1, सैदापूर 1, गेाडामाळ 1,  तामजाईनगर 1, दौलतनगर 1, यशवंत कॉलनी 1,  यादोगोपाळ पेठ 1,  वाढे फाट 1, देगाव 1, शिवथर 2, आसले 1.
*कराड तालुक्यातील* कराड 1,  बुधवार पेठ 1, गजानन हौसिंग सोसायटी 2, ढेबेवाडी फाटा 1, मसूर 3, आगाशिवनगर 3, केसे 1, उंडाळे 1, कासेगाव 1, येणपे 1. 
          *फलटण तालुक्यातील* फलटण 1, मंगळवार पेठ 1, स्वामी विवेकानंद नगर 1, साठे फाटा 1, जिंती नाका 1, जाधावाडी 1, मुरुम 6, कोळकी 2, दुधेबावी 1, रहाटणी 1, तरडगाव 1, खराडेवाडी 1. 
          *खटाव तालुक्यातील*  खातगुण 1, पुसेगाव 2.
          *माण  तालुक्यातील* मलवडी 4, म्हसवड 2, रांजणी 1, कालचौंडी 1, बंगेवाडी 1, गावठाण देवापूर 1,गोंदवले खु 1. 
           *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 3, शिरढोण 1,  वाठार किरोली 1, पाडळी 1, टळीये 1.
*पाटण तालुक्यातील* उंडावणे 1. 
          *जावली तालुक्यातील* कारंडी 2, म्हसवे 2, कुडाळ 3.  
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, माचुतर 3. 
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 2,  शिरवळ 2. 
*बाहेरील जिल्ह्यातील* अंधेरी (मंबई) 1.
  *1 बाधिताचा मृत्यु*
               जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बिदाल ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष या एका कोविड बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 *एकूण नमुने - 266682*
*एकूण बाधित -53491*  
*घरी सोडण्यात आलेले -50176*  
*मृत्यू -1768* 
*उपचारार्थ रुग्ण-1547* 
0000

आज जिल्ह्यात 84 जण बाधित

सातारा दि.12 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 84 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील*  सातारा 7,  भवानी पेठ 1, करंजे 2, शाहुनगर 1, कृष्णानगर 1, सदरबझार 1, गोडोली 1, वर्ये 1, अंगापूर 1, खंडोबाचीवाडी 1, कारंडी 1, मांडवे 1, मत्यापूर 1, कोपर्डे 2, वळसे.
*कराड तालुक्यातील* कराड 3, रविवार पेठ 1, नांदगाव 1,  आगाशिवनगर 1, ओगलेवाडी 1, चिखली 1.
          *फलटण तालुक्यातील* मलठण 1, बोरावकेवस्ती 1, फरांदवाडी 1, राजाळे 2, कुरवली 1, जिंती 1, दुधेबावी 1, अलगुडेवाडी 1, बिबी 3.
          *खटाव तालुक्यातील* खटाव 1,  हिंगणे 1, बनपुरी 2, डिस्कळ 2, बुध 2. 
          *माण  तालुक्यातील* पळशी 1, म्हसवड 2, बिदाल 1. 
           *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 2, आसरे 1,  काळोशी 1, जळगाव 1, निमसोड 1. 
*पाटण तालुक्यातील* तारळे 2, आवंडे 1, 
          *जावली तालुक्यातील* ओझरे 1, कुडाळ 1, भिवडी 1, भोगावली 2. 
*वाई तालुक्यातील* आसवले 1, सुरुर 2. 
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1. 
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 2, लोणंद 3, नायगाव 1, बावडा 1, 
*बाहेरील जिल्ह्यातील* कडेपूर (सांगली) 1, भाळवणी (सोलापूर) 1
*इतर* 1,
  * 7 बाधितांचा मृत्यु*
               क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात म्हसवड ता. माण येथील 65 वर्षीय महिला, मल्हार पेठ ता. सातारा येथील 92 वर्षीय पुरुष, वळई ता. माण येथील 50 वर्षीय महिला, ईकसाळ  ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खजगी हॉस्पिटलमध्ये खटाव येथील 56 वर्षीय पुरुष, आर्वी ता. कोरेगाव येथील 74 वर्षीय पुरुष, महाडा कॉलनी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 *एकूण नमुने -265289*
*एकूण बाधित -53403*  
*घरी सोडण्यात आलेले -50174*  
*मृत्यू -1767* 
*उपचारार्थ रुग्ण-1462* 
0000

Friday, December 11, 2020

कराडच्या स्टॅण्ड परिसरात बेवारस बॅग आली आढळून...बॉम्ब शोध पथक झाले दाखल...


कराड- येथील बसस्थानक परिसरात बेवारस बॅग सापडल्याने कराडात एकच खळबळ उडाली. शुक्रवारी 11 रोजी सायंकाळी ही घटना घडली. याबाबत शहर पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी खबरदारी  घेत श्वान पथकाला पाचारण केले. रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडून सदर बॅगची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. 

         याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळपासून कराड बसस्थानकासमोर एक बेवारस प्रवासी बॅग पडली होती. सदर बॅग  सायंकाळपर्यंत कोणीही न उचलल्याने याची कल्पना शहर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी सदर बॅगची तपासणी करण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केले.  याप्रकरणी पोलिसांचे तपास करण्याचे काम सुरू आहे