Friday, December 11, 2020

कराडच्या स्टॅण्ड परिसरात बेवारस बॅग आली आढळून...बॉम्ब शोध पथक झाले दाखल...


कराड- येथील बसस्थानक परिसरात बेवारस बॅग सापडल्याने कराडात एकच खळबळ उडाली. शुक्रवारी 11 रोजी सायंकाळी ही घटना घडली. याबाबत शहर पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी खबरदारी  घेत श्वान पथकाला पाचारण केले. रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडून सदर बॅगची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. 

         याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळपासून कराड बसस्थानकासमोर एक बेवारस प्रवासी बॅग पडली होती. सदर बॅग  सायंकाळपर्यंत कोणीही न उचलल्याने याची कल्पना शहर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी सदर बॅगची तपासणी करण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केले.  याप्रकरणी पोलिसांचे तपास करण्याचे काम सुरू आहे

No comments:

Post a Comment