Thursday, January 7, 2021

आजपासून कराड येथील वेणूताई चव्हाण रुग्णालयात कोविड लस ड्राय रन झाला...

कराड
 येथील वेणूताई चव्हाण उपविभागीय रुग्णालय येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील  व जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या उपस्थितीत  कोविड लस ड्राय रन  झाला. क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कराड उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मल्हारपेठ ता. पाटण या तीन ठिकाणी ही प्रक्रिया पार पडणार आहे.
 आजच्या कराड येथे झालेल्या या प्रकियेदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनयकुमार गौड, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. सुभाष चव्हाण, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यावेळी उपस्थित होते.

कोविड लसीकरण ; जिल्ह्यात तीन ठिकाणी नियोजन

सातारा दि. 7 (जिमाका):  जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी झाली असून उद्या शुक्रवार दि. 8 जानेवारी 2021 रोजी क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कराड उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मल्हारपेठ ता. पाटण या तीन ठिकाणी कोविड लसीकरणाबाबतची ड्राय रन  होणार असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी माहिती दिली.
  या तिन्ही ठिकाणी ड्राय रन  करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी सांगितले

आमदार आसगावकर यांचा विजय आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच - आ पृथ्वीराज चव्हाण

कराड:एस जी एम महाविद्यालय येथे आज पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार प्रा जयंत आसगावकर यांचा सत्कार माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे ट्रस्टी ऍडव्होकेट रवींद्र पवार, एसजीएम महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सैदापुरचे सचिन पाटील, नाना जाधव, उदय थोरात, इंद्रजित चव्हाण यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व सेवक वर्ग उपस्थित होते. 

 *माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* यावेळची पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक हि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आल्याने आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येणे शक्य झाले. आजपर्यंत शिक्षक मतदारसंघातून लोकप्रतिनिधी जे निवडून जात होते त्यांच्यापेक्षा चांगले काम प्रा आसगावकर यांच्याकडून होईल याची मला खात्री आहे याचे मुख्य कारण काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून त्यांच्या मागे पक्ष उभा असेल व यामुळे सभागृहात शिक्षकांचे प्रश्न मांडताना ते मार्गी लावण्यासाठी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी असेल व हि ताकद महत्वाची आहे. यावेळी पहिल्यांदाच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक हि पक्षाच्या पाठिंब्याने लढविली गेली. याचे मुख्य कारण जे मागील काही वर्षात चुकीची प्रवृत्ती पसरत होती. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविताना विचार जपण्याचं काम केलं. माझा विश्वास आहे कि, शिक्षकांचे प्रश्न प्रा आसगावकर सभागृहात मांडतील व ते तडीस सुद्धा नेतील.महाविकास आघाडीचा एकत्रित यशस्वी प्रयोग राज्यभर या शिक्षक व पदवीधर निवडणुकीत पाहायला मिळाला. व या एकीमुळेच राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत २ शिक्षक व ३ पदवीधर मतदारसंघात ३ पदवीधर व १ शिक्षक महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले.

----------

जिल्ह्यात 56 जण बाधित

 सातारा दि.7 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 56 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 1, कोडोली 1, गोडोली 1, रामनगर 1, देशमुख कॉलनी 1, बोरगाव 1,  कारी 1, पाडळी 1.
*कराड तालुक्यातील* विद्यानगर 1, रेठरे बु 1.
 *फलटण तालुक्यातील* फलटण 1, लक्ष्मीनगर 1, फरांदवाडी 1, गिरवी 1, पिंप्रद 1, 
*खटाव तालुक्यातील* मांडवे 1, अंबवडे 1. 
*माण तालुक्यातील* कासारवाडी 1, म्हसवड 1, गोंदवले बु 1.
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, शालनगाव 1, निढळ 1, वाठार स्टेशन 2. आसनगाव 3,देऊर 1, अंबवडे 1, चिलेवाडी 1. 
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 3, शिरवळ 1. 
*पाटण तालुक्यातील*  ढेबेवाडी 1, केरल 3,रामपूर 1. 
*वाई तालुक्यातील*  वाई 3, गुळुंब 1, भिमनगर 1, दरेवाडी 1, मयूरेश्वर 1. 
*जावली तालुक्यातील* कुडाळ 3, मेढा 1, सर्जापूर 3, पानस 2. 

*एकूण नमुने -291620*
*एकूण बाधित -55002*  
*घरी सोडण्यात आलेले -52454*  
*मृत्यू -1797* 
*उपचारार्थ रुग्ण-751* 
0000

Wednesday, January 6, 2021

आज जिल्ह्यात 83 जण बाधीत

सातारा दि.6 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 83 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 2  बाधिताचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 2, सदरबझार, गोडोली 2, तामाजाई नगर 1, शाहुनगर 3,शाहुपुरी रोड 1, शाहुपुरी 2, गोरखपूर पिरवाडी 2, कोडोली 1, मांढरे 1, शेंद्रे 1, कासारवाडी 1, देगाव 1, नांदगाव 1, अंबवडे बु 1,
*कराड तालुक्यातील*कराड 1, जिंती 1,  वाडळी निलेश्वर 1, हणबरवाडी 1, विद्यानगर 1, हिंगोळे 1, 
*पाटण तालुक्यातील* शेनगेवाडी 1, बनपुरी 2, मद्रुळ कोळे 1, मरळी 2,
*फलटण तालुक्यातील* लक्ष्मीनगर 1, पवारवाडी 2, पिप्रद 1, तरडगाव 1, खुंटे 1, फडतरवाडी 5, फरांदवाडी 1, गिरवी 1, 
*खटाव तालुक्यातील* हनुमाननगर 1, 
*माण तालुक्यातील* मोगराळे 1, बिदाल 1, बाचेरी 1, मार्डी 3, गोंदवले खु 1, म्हसवड 1, जांभुळणी 1,  
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 7,शेदुरजणे 1, देऊर 4,
*खंडाळा तालुक्यातील* वेलेवाडी 1, नायगाव 2, 
*वाई तालुक्यातील* सुरुर 2, 
*जावली तालुक्यातील* बामणोली 3, भोगावली 1,  
*महाबळेश्वर तालुक्यातील* भिलार 1, 
 बाहेरील जिल्ह्यातील शिरटे ता. वाळवा 1, पुणे 1, बारामती 1, 
*2 बाधिताचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या सुर्याचीवाडी ता. खटाव येथील 57 वर्षीय महिला, खासगी हॉस्पीटलमध्ये कासरवाडी ता. माण येथील 71 वर्षीय पुरुष अशा 2 कोविड बाधितांचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

*एकूण नमुने -290741*
*एकूण बाधित -54942*  
*घरी सोडण्यात आलेले -52411*  
*मृत्यू -1797* 
*उपचारार्थ रुग्ण-734* 
0000

Tuesday, January 5, 2021

माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला कोल्हापूर नाका येथील नवीन उड्डाण पुलाचा आढावा

कराड 
पुणे बंगळूर आशियाई महामार्गाच्या कराड येथील कोल्हापूर नाक्यावर वाहनांचे वाढते ट्राफिक, शहरात येणारी-बाहेर पडणारी वाहने एकाच मार्गाने ये-जा करत असल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा या ठिकाणी नागरिकांना जीव देखील गमवावा लागला आहे. कोल्हापूर नाका येथे नवीन उड्डाण पूल व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आज पृथ्वीराज बाबांनी कोल्हापूर नाका येथे अपघात ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली. यावेळी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, डीवायएसपी डॉ रणजित पाटील, राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी श्री वसंत पंधरकर, शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील, वाहतूक शाखेच्या पाटील मॅडम तसेच मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते. 

या भेटीनंतर माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर नाका येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचा आराखडा आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सादर केला. हा उड्डाण पूल ३.५ किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा सातारा - कागल या राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात अधिक लांबीचा पूल असणार आहे. या पुलाची माहिती देताना वसंत पंधरकर म्हणाले कि, हा पूल सिंगल पिलर रचनेवर उभारला जाणार आहे तर हा पूल वाहतुकीसाठी सहा पदरी असणार आहे. तसेच या उड्डाण पुलाखालील सर्व्हिस रोड हा चौपदरी असणार आहे. हा पूल हॉटेल पंकज येथून ते एन.पी.मोटर्स इथपर्यंत असणार आहे. या ३.५ किलोमीटर लांबीच्या पुलामुळे कराड व मलकापूर शहराचे ट्राफिक नियंत्रण करता येणार आहे तसेच या दोन शहराच्या वाहतुकीमुळे महामार्गावरील होणारे अपघात टाळता येऊ शकतील. 

या बैठकीवेळी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, कोल्हापूर नाका येथील वाढते अपघात व वाहतूक कोंडी यावर नवीन उड्डाण पूल होईपर्यंत तात्काळ पर्यायी वाहतूक व्यवस्था होणेसाठी सूचना व आराखडा तयार करावा व या सर्व विभागांची पुढील १० दिवसात पुन्हा एकदा बैठक घेऊन पर्यायी व्यवस्थेचा निर्णय घेतला जाईल. तसेच नवीन उड्डाण पुलाबाबत केंद्रीय मंत्री व सचिवांसोबत बैठक घेऊन पाठपुरावा करणार आहे तसेच कराड शहराच्या व  नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असणारा नवीन पूल लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. 
------------------------------------------------------------

अद्याप मी राजीनामा दिला नाही,मात्र तरुणांना संधी दिल्यास पाठिंबा देऊ - बाळासाहेब थोरात

कराड
पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काल बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, पण जर तरुणांना संधी मिळणार असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहिन, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीवारीनंतर एका वृत्त वहिनीला  दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिली आहे.

मी राजीनामा देण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो, दर महिन्याचे काही विषय असतात त्यावर चर्चा करण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. परंतु, ही बातमी मलाही दिल्लीला समजली. ज्यावेळी निवडणूक झाली, मंत्रिमंडळाचं गठन झालं. त्यावेळीच मी दिल्लीमध्ये जाऊन सांगितलं होतं की, मी प्रदेशाध्यक्ष आहे, महसुल मंत्री आहे, विधिमंडळ काँग्रेसचा नेताही आहे. माझ्याकडे यासर्व जबाबदाऱ्या आहेत. मी उत्तमरित्या सांभाळीन, परंतु, तुम्हाला कधी वाटलं की, यापैकी काही जबाबदाऱ्या इतर कोणाकडे सोपवायच्या आहेत, तर माझी त्याला हरकत नाही." पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, "ऑक्टोबर महिन्यातही काही चर्चा सुरु झाल्या त्यावेळी मी स्वतःहून सांगितलं होतं की, तुम्हाला जर जबाबदाऱ्यांचं विभाजन करायचं असेल तर माझी हरकत नाही. कारण माझ्या एकट्या कडेच सर्व जबाबदाऱ्या आहेत. त्या मी समर्थपणे सांभाळतोय, पण जरी काही वाटलं तर जबाबदाऱ्यांचं विभाजन करण्यास माझी हरकत नाही."
बाळासाहेब थोरात म्हणाले की, "एच. के. पाटील प्रभारी झाल्यानंतरही मी त्यांनाही ही वस्तुस्थिती सांगितलं होती. पण काल अचानक माझ्या राजीनाम्याच्या बातमी का प्रसारित झाल्या मला माहिती नाही. पण जर तशी प्रोसेस सुरु झाली असेल तर मी तिची स्वागतच करतो.' पुढे बोलताना ते म्हणाले की, "काल दिल्लीत राजीनाम्याबाबत माझी चर्चाही झालेली नाही. चर्चाही करण्याची गरज नव्हती. कारण मी याआधीच ते स्पष्टपणे सांगितलं होतं." तसेच त्यांना सांगितलं की, "जर जबाबदाऱ्यांच्या वाटपाचा निर्णय घेताना तरुण धडाडीचा आणि जो काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जाईल, अशा व्यक्तीलाच नेतृत्त्वाची संधी द्यावी."
दरम्यान, काँग्रेसमध्ये मुंबईचा अध्यक्ष बदलल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु होती. एकीकडे महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार का अशी चर्चा सुरु झाली. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात हे स्वत:च हे पद सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. काल दिल्लीत येऊन त्यांनी काँग्रेसचे संघटन महासचिव के सी वेणुगोपाल, खजिनदार पवन बन्सल यांच्या गाठीभेटी घेतल्या. परंतु, बाळासाहेब थोरातांनी मी अजून प्रदेशाध्यक्ष आहे, राजीनामा दिलेला नाही, असं सांगितलं आहे.