Wednesday, December 22, 2021

कोरोना लसीकरण पूर्ण न झालेल्या लोकांना सार्वजनिक वाहतुकीस प्रवेश देता येणार नाही ; राज्य शासनाची हायकोर्टात भूमिका...

वेध माझा ऑनलाईन
कराड
लसीकरण पूर्ण न झालेल्यांना मुंबईत लोकलनं प्रवासाची मुभा दिल्यास कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो. लसीकरण न झालेली व्यक्ती ही स्वत:सोबत इतरांसाठीही धोका ठरू शकते. त्यामुळे कोरोना लसीकरण पूर्ण न झालेल्या लोकांना मुंबई लोकलनं प्रवास करू न देण्याचा निर्णय हा सर्वांच्याच हिताचा आहे. कारण लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांच्या मुलभूत अधिकारांचं रक्षण करणं ही देखील राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे लस घेतलेल्या आणि न घेतलेल्यांमध्ये भेदभाव करण्याचा राज्य सरकारचा कोणताही हेतू नाही. असं राज्य सरकारनं बुधवारी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पषंट केलं आहे. 

राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. राज्याच्या आपत्तकालीन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्यानं त्यांनी हे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं आहे. ज्यात त्यांनी स्पष्ट केलंय की, केवळ लोकल ट्रेनच नव्हे तर इतर सर्व सार्वजनिक वाहतुकींच्या वापरासाठीही लसीकरण पूर्ण होणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. राज्यात करोना प्रतिबंधक लस सहजरित्या उपलब्ध आहे. राज्यातील 7.9 कोटी जनतेनं लसीचा पहिला डोस घेतलाय तर 4.95 कोटी जनतेनं लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. तसेच राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी दारोदारी जाऊन लसीकरणाची मोहिमही राबवण्यात येत आहे. तसेच घटनेच्या अनुच्छेद 14 नुसार लस घेतलेले आणि न घेतलेले असं अपवादात्मक वर्गीकरण करणं म्हणजे भेदभाव केल्यासारखं म्हणता येणार नाही. तसेच संचारमुक्तीच्या अनुच्छेद 19 चंही इथं उल्लंघन होत असल्याचाही आरोप करता येणार नाही असं या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट करण्यात आलंय. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठानं राज्य सरकारच्या या प्रतिज्ञापत्रावर याचिकाकर्त्यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी 3 जानेवारीपर्यंत तहकूब केली. 

काय आहेत याचिका?

वैद्यकीय सल्लागार असलेल्या योहान टेंग्रा यांनी अँड. अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत याबाबत याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच लोकल ट्रेननं प्रवास करण्याची मूभा देण्यात येणार असून लसीकरण पूर्ण न केलेल्यांना मात्र लोकलनं प्रवास करता येणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने 10 आणि 11 ऑगस्ट रोजी जारी केला. मात्र, सरकारचा हा निर्णय मनमानी आणि भेदभाव करणारा असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक तत्त्वांनुसार लस अनिवार्य नसून ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसं असतानाही सरकारचा हा निर्णय मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आहे. लसीकरण केलेल्या आणि लसीकरण न केलेल्या व्यक्तींमध्ये कोणताही फरक नसावा कारण, दोघेही कोरोना विषाणुचे प्रसारक असू शकतात आणि रोग पसरवू शकतात. जी व्यक्ती कोरोनातून पूर्णपणे बरी झाली आहे. ती व्यक्ती लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीपेक्षा कोरोना विषाणु पसरण्याची शक्यता कमी असल्याचेही याचिकेत म्हटलेलं आहे.
याशिवाय राज्य सरकारच्या या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते फिरोझ मिठबोरवाला यांनीही फौजदारी रीट याचिकेतून आव्हान दिलेलं आहे. सरकारच्या आदेशामुळे लस न घेतलेल्या अथवा लसींचा एकच डोस घेतलेल्या नागरिकांच्या उपजिविकेवर या निर्णयामुळे गदा येणार असून लसीकरणाच्या आधारे लोकांमध्ये भेदभाव करणे म्हणजे सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करण्यासारखं असल्याचा दावा मिठबोरवाला यांच्या याचिकेतून करण्यात आली आहे. लसीकरण करणं हे ऐच्छिक आहे त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारा असल्याचा दावाही याचिकेतून केला गेला आहे. सार्वजनिक वाहतूक आणि जागा वापरण्यासाठी लसीकरण न केलेल्या व्यक्तींचाही समावेश करावा आणि राज्य सरकारच्या निर्णयात सुधारणा करण्यात यावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारलाही यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बाजू माडण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.



राज्यात आज 1201 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 953 रुग्ण झाले कोरोनामुक्त...

वेध माझा ऑनलाईन
कराड
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1201 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 953  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 99  हजार 760 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. 

राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही

राज्यात  आज ओमायक्रॉनचा एकाही  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 65 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 35 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार दिवंगत जयवंतराव भोसले यांची 97 वी जयंती नांदगाव येथे विविध उपक्रमांनी साजरी..

वेध माझा ऑनलाईन
कराड
 कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार दिवंगत जयवंतराव भोसले यांची 97 वी जयंती नांदगाव (ता. कराड )येथे विविध  उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांचे हस्ते दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आले. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला  दक्षिण मांड व्हॅली शिक्षण संस्थेचे  सचिव   एस टी सुकरे, प्राचार्य आर बी पाटील, कालवडे -बेलवडे उपसा जलसिंचन योजनेचे संचालक संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे,  विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष जयवंत मोहिते,हितेश सुर्वे, धोंडीराम शिंदे, संजय पाटील, संदीप पाटील, मधुकर पाटील, अरुण पाटील, शिवाजी माळी, भगवान पाटील, अर्जुन माळी, रघुनाथ जाधव, प्रकाश रसाळ, सुनील शिनगारे, सोमेश्वर तलबार, विलास माटेकर, निवृत्ती माटेकर, दिलीप माटेकर ,अशोक शिंदे, रणधीर शिंदे, अनिकेत तांबवेकर ,बाळासो नलवडे,  गौरव कडोले,  रोहित मुळीक आदींसह ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, वसंत माटेकर, विलास माटेकर, बाळासाहेब नलवडे, रणधीर शिंदे, अनिकेत तांबवेकर, गौरव कडोले, रोहित मुळीक हे उपस्थित होते. 

 

आज जिल्ह्यात 15 बाधीत,25 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 15 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
25 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3 खंडाळा 2 खटाव 0 कोरेगांव 1 माण 2 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 1 सातारा 5 वाई 0 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 15 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 25 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

ओमिक्रॉन वाढत राहिल्यास शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ ; शिक्षणमंत्र्यांचा इशारा...

वेध माझा ऑनलाईन
 कराड
राज्यात सध्या वाढत असलेल्या ओमिक्रोनबाबत राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. नुकतीच शाळांनाही परवानगी देत सुरुवात करण्यात आली आहे. अशात आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा शाळा बंद करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. “महाराष्ट्रातील ओमिक्रॉन प्रकरणे वाढत राहिल्यास सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते,” असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू केल्यानंतर आता त्या पुन्हा बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबात मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, देशात सध्या ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यातील शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन प्रकरणे वाढत राहिल्यास सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.
देशातील एकूण 213 ओमिक्रॉन प्रकरणांपैकी महाराष्ट्रात 54 रुग्णांची नोंद केली गेली आहे. ओमिक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास, आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. दरम्यान, काही राज्यांमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून तिचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले असल्याचे यावेळी मंत्री गायकवाड यांनी सांगितले.

महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवली असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती...

वेध माझा ऑनलाईन
कराड
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने अनेक देशात शिरकाव केला आहे. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मागील कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर आता ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव झाला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. तर, महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी दिली.

देशातील 12 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे 200 हून जास्त रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे रुग्ण  सर्वाधिक आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 77 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, राजेश टोपे  म्हणाले की, ‘टास्क फोर्सने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात फेब्रुवारीत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्याने त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनाबाबतचे नियम पाळणं गरजेचं आहे,’ असं आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे
पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉन व्हेरिएंटचीच असेल. पण त्याबाबत फार घाबरण्याची गरज नाही कारण ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये हॉस्पिटलाईज होण्याचे प्रमाण फार कमी आहे. परंतु, असं असलं तरी नाताळ आणि नववर्ष साजरं करताना काळजी घ्यावी.

गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत शहरातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ; ना बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून शहरासाठी 11कोटी निधी उपलब्ध...

वेध माझा ऑनलाईन
कराड
नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून शहराच्या रस्ते कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे त्या माध्यमातून पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत येथील विविध रस्ते कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला...

नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरातील 115 कामासाठी 11 कोटी 26 लाख इतका निधी उपलब्ध झाला आहे त्या माध्यमातून पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला त्यामध्ये येथील शुक्रवार पेठ सात शहीद चौक येथील इंगवले यांच्या घरापासुन ते प्रकाश पवार यांच्या घरासमोरुन जाणारा रस्ता...... तसेच संत तुकाराम हायस्कूल, राम मंदिर ते 11 फुटी महारुद्र हनुमान मंदिर याठिकाणचा रस्ता... तसेच शेलार वाडा ते सुहास शिंगण यांच्या घरा समोरून चौका पर्यतच्या रस्ता...आदी रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ गटनेते  यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला... यावेळी बांधकाम सभापती हणमंतराव पवार नगरसेविका सौ स्मिता  हुलवान तसेच जनशक्तीचे नगरसेवक व विविध मान्यवर  उपस्थित होते तसेच शनिवार पेठेतील लल्लूभाई चाळ रस्ता काँक्रेटिकरण करणे यादेखील कामाचा शुभारंभ याठिकाणी पार पडला...
यावेळी.विजयसिह यादव (भाऊ) नगरसेवक हणमंतराव पवार , विजय वाटेगावकर , बाळासाहेब यादव .गजेंद्र कांबळे ,ओंकार मुळे  जयंत बेडेकर  सुहास पवार अखतर आंबेकरी .शिवाजीराव पवार  वैभव हिंगमिरे , संजयसिह यादव मा बापू देसाई , दिनेश यादव  नगरसेविका  सौ स्मिता हुलवान , श्रीमती आशा मुळे .सौ सुप्रिया खराडे यांच्यासह.राहुल चव्हाण , प्रदीप माने ,अनिल जाधव, माधव पिसे,शिवाजी माळी अण्णा, जमनादास ठक्कर, केतन ठक्कर, बच्चू रावल, राजू रावल , किशोर रावल, संजय माळी , सतीश माळी,दीपक शहा , अरुण बेडके रावळ , शरद मुंढेकर , राजू कोरडे , शिरीष शहा शरीष घोडके , संदीप मुंढेकर , विलास बेडके ,दीपक कोरडे , सौरभ शहा तसेच स्थानिक महिलांचा व नागरिकांची उपस्थिती होती