Wednesday, December 22, 2021

महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवली असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती...

वेध माझा ऑनलाईन
कराड
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने अनेक देशात शिरकाव केला आहे. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मागील कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर आता ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव झाला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. तर, महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी दिली.

देशातील 12 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे 200 हून जास्त रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे रुग्ण  सर्वाधिक आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 77 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, राजेश टोपे  म्हणाले की, ‘टास्क फोर्सने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात फेब्रुवारीत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्याने त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनाबाबतचे नियम पाळणं गरजेचं आहे,’ असं आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे
पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉन व्हेरिएंटचीच असेल. पण त्याबाबत फार घाबरण्याची गरज नाही कारण ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये हॉस्पिटलाईज होण्याचे प्रमाण फार कमी आहे. परंतु, असं असलं तरी नाताळ आणि नववर्ष साजरं करताना काळजी घ्यावी.

No comments:

Post a Comment