कराड
कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार दिवंगत जयवंतराव भोसले यांची 97 वी जयंती नांदगाव (ता. कराड )येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांचे हस्ते दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला दक्षिण मांड व्हॅली शिक्षण संस्थेचे सचिव एस टी सुकरे, प्राचार्य आर बी पाटील, कालवडे -बेलवडे उपसा जलसिंचन योजनेचे संचालक संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष जयवंत मोहिते,हितेश सुर्वे, धोंडीराम शिंदे, संजय पाटील, संदीप पाटील, मधुकर पाटील, अरुण पाटील, शिवाजी माळी, भगवान पाटील, अर्जुन माळी, रघुनाथ जाधव, प्रकाश रसाळ, सुनील शिनगारे, सोमेश्वर तलबार, विलास माटेकर, निवृत्ती माटेकर, दिलीप माटेकर ,अशोक शिंदे, रणधीर शिंदे, अनिकेत तांबवेकर ,बाळासो नलवडे, गौरव कडोले, रोहित मुळीक आदींसह ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, वसंत माटेकर, विलास माटेकर, बाळासाहेब नलवडे, रणधीर शिंदे, अनिकेत तांबवेकर, गौरव कडोले, रोहित मुळीक हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment