Sunday, July 2, 2023

राज्यात घडलेल्या घडामोडींची मला माहिती नव्हती टीव्ही वर पाहिलं तेव्हा कळलं,;आ बाळासाहेब पाटील यांचे स्पष्टीकरण ;

वेध माझा ऑनलाईन। 
उद्या सोमवारी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची मीटिंग आहे त्यासाठी उद्या शरद पवार साताऱ्यात येणार आहेत तत्पूर्वी पवार साहेब सकाळी साडेदहा वाजता चव्हाण साहेबांच्या समाधीस अभिवादन करण्यासाठी कराडात येणार असल्याची माहिती आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कराड तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यावेळी उपस्थित होते 

दरम्यान अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत याबाबतच्या  राज्यात घडलेल्या आजच्या घडामोडीची मला कसलीच माहिती नसल्याचे सांगत यापुढे जी शरद पवारांची भूमिका आहे तीच आपली असेल असही आ पाटील यावेळी म्हणाले 
राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीबद्दल आ पाटील म्हणाले मला टीव्ही बघितल्यावरच या घडामोडी बाबत कळले मला काहीच कल्पना नव्हती अजितदादा किंवा जयंत पाटील या कोणाशीच माझे कसलेच बोलणेही झालेले नाही
टिव्हवर पाहिलं तेव्हाच मला याबाबत सगळं कळलं असे त्यांनी सांगितलं


राजकीय भूकंप : अजित पवार छगन भुजबळ शपथ घेणार । राजभवन येथे शपथ होणार ; 30 आमदार अजितदादांबरोबर... ; अजितदादा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार!

वेध माझा ऑनलाईन। अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांचे पीए राजभवनात दाखल झाले आहे. अजित पवार उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेवू शकतात. अजित पवार सरकारमध्ये सामील होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री पदाची शपथ घेवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचे 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. या 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार राज्यपालांना देणार आहेत.

अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार...

दिलीप वळसे पाटील 
हसन मुश्रीफ
छगन भुजबळ 
किरण लहमाटे 
निलेश लंके
धनंजय मुंडे 
रामराजे निंबाळकर 
दौलत दरोडा 
मकरंद पाटील 
अनुल बेणके 
सुनिल टिंगरे 
अमोल मिटकरी 
अदिती तटकरे 
शेखर निकम 
निलय नाईक
अशोक  पवार 
अनिल पाटील
सरोज अहिरे



Saturday, July 1, 2023

आनंदाची बातमी... ; येत्या २४ तासांत १७ राज्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस

वेध माझा ऑनलाईन। देशभरात मान्सूनचा सरासरी पाऊस जूनपेक्षा जुलैत ‘सामान्य’ राहण्याची अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे, देशाच्या ‘मान्सून कोर’ झोनमध्ये शेतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत मिळतात. त्याचवेळी देशाच्या बहुतांश भागांमध्ये जुलै महिना सामान्यपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले. दरम्यान हवामान विभागाने या आठवड्यात जवळपास सर्व राज्यांत पावसाचा इशारा दिला असून, येत्या २४ तासांत मध्य प्रदेश-राजस्थानसह १७ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. 

जुलैत देशभरात मान्सूनची स्थिती सकारात्मक राहणार असली तरी वायव्य भारतातील पंजाब, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सामान्य पातळीहून कमी पावसाची शक्यता आहे.  काही भागांत हा चिंतेचा विषयही ठरू शकतो. मध्य भारत व लगतच्या दक्षिण प्रायद्वीप आणि पूर्व भारताच्या बहुतांश भागांत तसेच ईशान्य व वायव्य भारतातील काही भागांत ‘सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस’ होण्याची शक्यता आहे. याउलट वायव्य, ईशान्य व आग्नेय द्वीपकल्पीय भारतातील अनेक भागांत ‘सामान्यपेक्षा कमी’ पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

येत्या २४ तासांत १७ राज्यांत मुसळधार
हवामान विभागाने या आठवड्यात जवळपास सर्व राज्यांत पावसाचा इशारा दिला असून, येत्या २४ तासांत मध्य प्रदेश-राजस्थानसह १७ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. उत्तराखंडमधील चमोली येथे शनिवारी सकाळी दरड कोसळली. त्यामुळे बद्रीनाथ महामार्ग (एनएच - ७) बंद करावा लागला. महामार्ग प्राधिकरण दरडीचा ढिगारा हटवत आहे. दाेन दिवसांपूर्वी बद्रीनाथ महामार्ग १७ तासांसाठी बंद करण्यात आला होता.

या राज्यांत मुसळधार 
राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक.

आज कराडात जयंत गुजर परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन ; सर्व भक्त भाविकांनी सहपरिवार उपस्थित रहा ; समस्त गुजर परिवाराच्या वतीने सर्वांना निमंत्रण;

वेध माझा ऑनलाईन। कराड येथील साईभक्त जयंत गुजर यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी आज सोमवार दिनांक 3 जुलै रोजी जुने कृष्णामाई मंगल कार्यालय येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार असल्याची माहिती स्वतः जयंत गुजर यांनी दिली यावर्षी या उत्सवाचे 26 वे वर्ष आहे

आज सोमवार दिनांक 3 जुलै रोजी पहाटे सव्वापाच वाजता काकड आरतीने या उत्सवास प्रारंभ होईल... त्यानंतर 6 वाजता अभिषेक होईल... 7 वाजता सत्यनारायण महापूजा होणार आहे, तसेच 9 वाजता स्तवनमंजिरीचे वाचन होईल. दुपारी 12 वाजता माध्यान आरती होईल, त्यानंतर साडेबारा वाजता महाप्रसाद सुरू होणार आहे... दुपारी 4.30 यर्यंत महाप्रसादाचा लाभ भक्तांना मिळणार आहे...  सायंकाळी 6 30 वाजता धुप आरती व रात्री 10 वाजता शेजारती होणार आहे... अशी माहिती जयंत गुजर यांनी दिली आहे...

तरी जास्तीत जास्त भक्त भाविकांनी आपल्या परिवारासह या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन गुजर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे गेली 25 वर्षे जयंत गुजर परिवार हा उत्सव  साजरा करत आहेत यावर्षी या उत्सवाचे 26 वे वर्ष आहे

येत्या बुधवारी रोटरी क्लब ऑफ कराडचा 67 वा पदग्रहण समारंभ ; कराड अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये होणार कार्यक्रम ; नूतन प्रेसिडेंट रो.बद्रीनाथ धस्के आणि नूतन सेक्रेटरी शिवराज माने यांची माहिती ;

वेध माझा ऑनलाईन।  रोटरी क्लब ऑफ कराडचा 67 वा पदग्रहण समारंभ बुधवार, दि.5 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता कराड येथील दि कराड अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्याख्याते व प्रशिक्षक रो.मोहन पालेशा यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी रो.पालेशा यांचे 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ कराड चे नूतन प्रेसिडेंट रो.बद्रीनाथ धस्के व नूतन सेक्रेटरी शिवराज माने यांनी दिली.

रोटरी क्लब ऑफ कराड व रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभास सातारा जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. यावेळी रोटरी क्लब ऑफ कराड च्या वतीने वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या प्रोजेक्टचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्याख्याते व प्रशिक्षक रो.मोहन पालेशा यांचे 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. त्यांची प्रसिद्ध लेखक, कवी, प्रेरणादायक वक्ते म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती आहे. त्यांचे इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती व मराठी भाषेवर प्रभुत्व आहे. शेरो - शायरी त्यांचा विशेष आवडता विषय आहे. शाळा, महाविद्यालय, विविध कंपन्या, कार्पोरेट वर्कशॉप इत्यादी साठी त्यांनी अनेक शहरांमध्ये, देशांमध्ये व्याख्याने दिली आहेत. रोटरीच्या असेंबली, कॉन्फरन्स, पदग्रहण समारंभासाठी, वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

आपल्या ओघवत्या वाणीने आणि वक्तृत्वाने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांचे 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या विषयावरील व्याख्यान म्हणजे जीवन समृद्ध करणारा एक अविस्मरणीय अनुभव आहे. आपल आयुष्य व जगणं यांची योग्य सांगड घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक घटनांचा या विषयांमध्ये त्यांनी आढावा घेतला आहे. मनाला प्रसन्न आणि समाधान देण्यासाठी मिळालेल्या आयुष्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे सूत्र त्यांच्या ओजस्वी वाणीतून ऐकावयास मिळणार आहे. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची ताकद असणारा हा कार्यक्रम रोटरीच्या पदग्रहण समारंभा निमित्त कराडमध्ये होत आहे. 

 या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी कराडकर नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कराड चे नूतन प्रेसिडेंट रो.बद्रीनाथ धस्के व नूतन सेक्रेटरी शिवराज माने व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जेष्ठ संशोधक प्रा डॉ चंद्रकांत लोखंडे यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर ; आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ गुजर यांची पत्रकार परिषदेत माहिती;

वेध माझा ऑनलाईन। आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे फिजिक्स विषयाचे विभाग प्रमुख म्हणून ज्यांनी यशस्वी काम पाहिले आहे आणि डॉ डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर येथे डिन व रिसर्च डायरेक्टर म्हणून देखील जे कार्यरत राहिले आहेत असे जेष्ठ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक प्रा डॉ चंद्रकांत लोखंडे याना जाहीर झाला असल्याचे प्रतिष्ठान च्या वतीने उपाध्यक्ष डॉ गुजर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले

आतापर्यंत सदर प्रतिष्ठानच्या वतीने जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, कु नसीमा हुरजूक, डॉ प्रकाश आमटे, शा बं मुजुमदार,  डॉ अभय बंग, डॉ जब्बार पटेल, डॉ रणजित जगताप, प्रा डॉ शिवाजीराव कदम, याना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे दरम्यान,17 सप्टेंबर ला या पुरस्काराचे सन्मान पूर्वक वितरण करण्यात येणार आहे असेही प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ गुजर यांनी यावेळी सांगितले
कराड तालुक्यातील जिंती येथे शुक्रवार 30 रोजी रात्री 1 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरा समोर लावलेल्या दोन मोटारसायकली जाळल्याची घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की  विकास सेवा सोसायटीचे संचालक शिवाजी सावळा पाटील यांचे घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी रात्री 1 च्या सुमारास अज्ञाताकडून पेट्रोल ओतून जाळणेत आल्या. शिवाजी पाटील यांचे घर मुख्य चौकात असल्याने मोठा जाळ व गाडीची पेट्रोल टाकी फुटल्याचा आवाज झालेने घरातील व शेजारील लोक उठून बाहेर आले मात्र आगीने मोठा पेट घेतल्याने मोटारसायकली वाचवता आल्या नाहीत.दोन्ही मोटारसायकल चे फक्त सांगाडे उरले आहेत. 

आकाश शिवाजी पाटील यांचे नावे असणारी mh50Q1330 हिरो होंडा व विठ्ठल सावळा पाटील हे वापरत असलेली त्याच्या नातेवाईक यांची mh50D2107 या  मोटारसायकली आगीत जळून खाक झाल्या या जळीतात सुमारे 1लाख 25 हजार रुपयां पेक्षा जास्त नुकसान झाले असून या घटनेची फिर्याद आकाश शिवाजी पाटील यांनी कराड ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.

पुणे सारख्या शहरात मोटारसायकल पेटवण्याच्या घटना घडत आहेत जिंती सारख्या ग्रामीण भागात अशी घटना घडल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.