वेध माझा ऑनलाईन। रोटरी क्लब ऑफ कराडचा 67 वा पदग्रहण समारंभ बुधवार, दि.5 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता कराड येथील दि कराड अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्याख्याते व प्रशिक्षक रो.मोहन पालेशा यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी रो.पालेशा यांचे 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ कराड चे नूतन प्रेसिडेंट रो.बद्रीनाथ धस्के व नूतन सेक्रेटरी शिवराज माने यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ कराड व रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभास सातारा जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. यावेळी रोटरी क्लब ऑफ कराड च्या वतीने वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या प्रोजेक्टचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्याख्याते व प्रशिक्षक रो.मोहन पालेशा यांचे 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. त्यांची प्रसिद्ध लेखक, कवी, प्रेरणादायक वक्ते म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती आहे. त्यांचे इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती व मराठी भाषेवर प्रभुत्व आहे. शेरो - शायरी त्यांचा विशेष आवडता विषय आहे. शाळा, महाविद्यालय, विविध कंपन्या, कार्पोरेट वर्कशॉप इत्यादी साठी त्यांनी अनेक शहरांमध्ये, देशांमध्ये व्याख्याने दिली आहेत. रोटरीच्या असेंबली, कॉन्फरन्स, पदग्रहण समारंभासाठी, वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
आपल्या ओघवत्या वाणीने आणि वक्तृत्वाने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांचे 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या विषयावरील व्याख्यान म्हणजे जीवन समृद्ध करणारा एक अविस्मरणीय अनुभव आहे. आपल आयुष्य व जगणं यांची योग्य सांगड घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक घटनांचा या विषयांमध्ये त्यांनी आढावा घेतला आहे. मनाला प्रसन्न आणि समाधान देण्यासाठी मिळालेल्या आयुष्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे सूत्र त्यांच्या ओजस्वी वाणीतून ऐकावयास मिळणार आहे. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची ताकद असणारा हा कार्यक्रम रोटरीच्या पदग्रहण समारंभा निमित्त कराडमध्ये होत आहे.
या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी कराडकर नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कराड चे नूतन प्रेसिडेंट रो.बद्रीनाथ धस्के व नूतन सेक्रेटरी शिवराज माने व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment