Wednesday, October 23, 2024

राजेन्द्रसिंह यादव म्हणाले...येत्या 2 दिवसात भूमिका स्पष्ट करणार ; वेध - माझा शी बोलताना दिली प्रतिक्रिया ;


वेध माझा ऑनलाइन।
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे आघाडीची भूमिका येत्या दोन दिवसात स्पष्ट करणार असल्याचे त्यानी वेध माझा शी बोलताना संगितले आहे

 दोन वर्षांपूर्वी श्री यादव यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी कराड शहराच्या विकासाच्या आवश्यक कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यानंन्तर 209 कोटी रुपयांचा निधी शहरासाठी मंजूर झाला यात भुयारी गटार योजना व पाणी योजनेचे अद्यावतीकरण याचा समावेश आहे. त्याचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. इतका निधी राजेंद्रसिंह यादव यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच शहरासाठी आला आहे 

दरम्यान सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण असताना गेले काही दिवस त्यांच्या या निवडणुकीतील भूमिकेबाबत ते आपल्या सहकारी नगरसेवकांशी चर्चा करून आपली भूमिका येत्या 2 दिवसात घेणार आहेत असे त्यानी वेध माझा शी बोलताना सांगितले आहे 

Tuesday, October 22, 2024

तिकीटांच्या समीकरणामुळं नारायण राणे,धनंजय महाडिक आणि गणेश नाईक यांच्या घरांतही 2-2 पक्ष ?

वेध माझा ऑनलाइन।
महायुती आणि महाविकास आघाडीतल्या तिकीटांच्या समीकरणामुळं आता घरांतही 2-2 पक्ष झाल्याचं दिसतंय. नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. कुडाळमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. नारायण राणे भाजपचे खासदार, नितेश राणे भाजपचे आमदार आहेत. वडील आणि भाऊ भाजपात असले तरी तिकीटासाठी निलेश राणे बंड करुन शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत. महायुतीत कुडाळ-मालवणची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळं निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांशी निलेश राणेंची लढत होईल.

इकडे नवी मुंबईतही भाजपला गणेश नाईकांच्या घरातूनच धक्का बसलाय. नाईकांचे पुत्र, संदीप नाईकांनी 28 माजी नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. गणेश नाईकांना ऐरोलीतून विधानसभेचं तिकीट दिलंय. मात्र बेलापूरमधून भाजपनं तिकीट न दिल्यानं, संदीप नाईकांनी तुतारीवर लढण्याचा निर्णय घेतला.
निलेश राणेंसारखंच धनंजय महाडिकांच्या घरात होण्याची शक्यता आहे. धनंजय महाडिक, भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक कोल्हापूर उत्तरमधून इच्छुक आहेत. मात्र महायुतीत जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळे  निलेश राणेंसारखंच धनंजय महाडिकांच्या घरात होण्याची शक्यता आहे
तिथून मात्र राजेश क्षीरसागर शर्यतीत आहेत.


कराड दक्षिणच्या निष्क्रिय आमदारामुळे मतदार संघाचा विकास रखड़ला ; भाजपा चे सरकार असताना कामाचे श्रेय कोंग्रेसचे आमदार कसे काय घेवू शकतात? अशोक थोरात यांचा सवाल ;

वेध माझा ऑनलाइन।
निष्क्रीय लोकप्रतिनिधीमुळे कराड दक्षिणचा गेली १० वर्षे विकास रखडला, अशी घणाघाती टीका शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता केली आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ मलकापूर (ता. कराड) येथे कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. 

मलकापूर येथे विविध ठिकाणी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलताना अशोकराव थोरात म्हणाले, सरकारच्या माध्यमातून जी कामे होतात, अशा कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न कराड दक्षिणच्या विद्यमान लोकप्रतिनिधीकडून सुरु आहे. या कामाव्यतिरिक्त लोकांच्या उपयोगी पडेल असे एकही काम त्यांनी आत्तापर्यंत केलेले नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत लोकं त्यांना याचा धडा नक्की शिकवतील. भाजपाचे उमेदवार डॉ. अतुलबाबांकडे सामाजिक कार्याचा वारसा आहे. आप्पासाहेब, डॉ. सुरेशबाबा आणि डॉ. अतुलबाबांनी विकासाच्या बाबतीत कधीही हयगय केलेली नाही. हजारो माणसांना रोजगार उपलब्ध करुन दिला. 

मलकापुरात सत्तेवर असणाऱ्यांनी गेल्या २० वर्षांत हुकुमशाही निर्माण केली, अशी टीका माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यावर नाव न घेता करत, श्री. थोरात म्हणाले, मलकापूरातील जनता यावेळी डॉ. अतुलबाबांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील. त्यांना आमदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.  

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, मलकापूरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. पण त्या प्रमाणात येथे नागरी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही काही दिवसांपूर्वी २० कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करुन आणला. कराड दक्षिणेत सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त झाला असून, बरीचशी विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. येत्या काळात मलकापूरसह कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध आहे. 

यावेळी मलकापूरचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, माजी नगरसेवक अजित थोरात, दिनेश रैनाक, राजू मुल्ला, शहाजी पाटील, सुहास कदम, सुहास जाधव, भीमराव माहूर, अमित थोरात, पी. पी. पाटील, कराडचे माजी विरोधी पक्षनेते महादेव पवार, हेमंत पाटील यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 

Monday, October 21, 2024

ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांमध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा मानस ; परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांचे प्रतिपादन ;

वेध माझा ऑनलाइन।
ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना ताकद देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची राज्य शासनाने स्थापना केली आहे. ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात लाभ देऊन त्यांच्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा आपला मानस असल्याचे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांनी सांगितले.

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आशिष दामले आज (सोमवारी) प्रथमच कराड दौऱ्यावर आले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास व स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

आशिष दामले म्हणाले, इतर समाज घटकांप्रमाणे ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी ही अनेक वर्षाची ब्राह्मण समाजाची मागणी होती. युती सरकारने आमच्या मागणीला न्याय देत महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळावर माझी अध्यक्षपदी नियुक्ती करत मला कमी वयात काम करण्याची संधी दिली आहे. ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात ताकद देऊन त्यांच्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा माझा मानस आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने पुणे-मुंबई या ठिकाणी येत असतात. त्यांच्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून वस्तीगृह उभारण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ.सोनल भोसेकर, मुकुंद उर्फ शार्दुल चरेगांवकर, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सुरेन्द्र काळे, संजय भोसेकर, प्रशांत कुलकर्णी, ॲड मिलिंद कुलकर्णी, शशांक शेंडे, अमित बुधकर, मनोज आचार्य ,नितीन शाळीग्राम, प्रशांत कुलकर्णी रमेश कुलकर्णी, जगु पुरोहित , संदीप शेंडे,सदानंद घाटे, पी डी कुलकर्णी बाई, गौरीताई निलाखे, विनिता पेंढारकर, शरयु माटे सुषमा काळे , अनघा कुलकर्णी, विशाखा कित्तूर तसेच अनेक समाज बान्धव उपस्थित होते.


Sunday, October 20, 2024

पुढील 30 दिवस पृथ्वीराज चव्हाणांच्या विजयासाठी ; कार्यकर्त्यांचा निर्धार ; 50 हजारचे मताधिक्य देणार ;

वेध माझा ऑनलाइन।
- काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात कराड दक्षिण मतदार संघातून पृथ्वीराज चव्हाण यांना 50 हजाराच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच पुढील 30 दिवस पृथ्वीराज चव्हाण यांच्या विजयासाठी असा निर्धार केला. 

कराड येथे विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, फारूख पटवेकर, कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, अजितराव पाटील- चिखलीकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, मलकापूर नगरपरिषेदेच्या माजी नगराध्यक्षा निलम येडगे, जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा गितांजली थोरात,  कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजी जाधव, बंडा नाना जगताप, नानासो पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, डॉ सुधीर जगताप, निवासराव थोरात, पै. तानाजी चौरे, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष दिग्विजय पाटील, नामदेवराव पाटील, शंकरराव खबाले, वैभव थोरात, संजय तडाखे, श्रीकांत मुळे, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, गणेश गायकवाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 

माजी नगरसेवक फारूख पटवेकर म्हणाले... कराड शहरातून आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य पृथ्वीराज बाबांना देऊ. कराडमध्ये कृष्णा कोयनेचा- संगम आहे, तसा पृथ्वीराज बाबा- उदय दादा यांचा संगम आहे. पृथ्वीराज बाबांनी जसे पहिल्यांदा मराठा समाजाला 16% आरक्षण दिले त्याचवेळी त्यांनी मुस्लिम समाजातील मागासवर्गीय घटकाला सुद्धा आरक्षण दिल होत. मात्र भाजप सरकारने ते दोन्ही आरक्षण घालवले. 

  कार्यकर्ते जमिनीवरच बसले
कराड दक्षिण कार्यकर्ता मेळाव्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमस्थळी जागा कमी पडू लागल्याने कार्यकर्त्यांनी मांडी घालून जमिनीवर बसत भाषणे ऐकली. 


भाजपची पहिली यादी जाहीर; साताऱ्यातून शिवेंद्रराजे,तर कराड दक्षिणमधून डॉ. अतुल भोसलेंना उमेदवारी

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आज भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपच्या या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून या कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर साताराजिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले, माणमधून जयकुमार गोरे आणि कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी महत्वाचा मानला जाणाऱ्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांनी भाजपची मोठी ताकद वाढवली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्य देत विजयी करण्यात महत्त्वाचा हातभार लावला होता. तसेच लोकसभा प्रभारी म्हणूनही डॉ. अतुल भोसले यांनी चांगले काम केले. याही वेळेस २०२४ च्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले हे सर्व ताकदीनिशी उतरले आहेत. त्यांना पहिल्याच यादीत भाजपाने संधी दिली दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
भाजपाच्या पहिल्या यादीत 99 पैकी 13 महिला उमेदवार आहेत. अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून 99 पैकी 6 एसटी आणि 4 एससी उमेदवार आहेत. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, आशिष शेलार, नितेश राणे यांचा समावेश आहे. बेलापूरमधून पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांनाच भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांना तिकीट मिळणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांच्या जागेवर प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपची पहिली ९९ उमेदवार यादी

नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण
जामनेर -गिरीश महाजन
चिखली -श्वेता महाले
खामगाव – आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) – संजय कुटे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
देवली – राजेश बकाने
हिंगणघाट – समीर कुणावार
वर्धा – पंकज भोयर
हिंगना – समीर मेघे
नागपूर दक्षिण – मोहन माते
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोरा – विजय रहांगडाले
गोंदिया – विनोद अग्रवाल
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव – अशोक उडके
यवतमाळ – मदन येरवर
किनवट – भीमराव केरम
भोकर – क्षीजया चव्हाण
नायगाव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड


हिंगोली – तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डीकर
परतूर – बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
बगलान – दिलीप बोरसे
चंदवड – राहुल अहेर
नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
नालासोपारा – राजन नाईक
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
मुरबाड – किसन कथोरे
कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
डोंबिवली – रवींद्र चव्हाण
ठाणे – संजय केळकर
ऐरोली – गणेश नाईक
बेलापूर – मंदा म्हात्रे
दहिसर – मनीषा चौधरी
मुलुंड – मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम
विले पार्ले – पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर
पनवेल – प्रशांत ठाकूर
उरन – महेश बाल्दी
दौंड- राहुल कुल
चिंचवड – शंकर जगताप
भोसली -महेश लांडगे
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले
कोथरुड – चंद्रकांत पाटील
पर्वती – माधुरी मिसाळ
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव – मोनिका राजले
राहुरी शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड – राम शिंदे
केज – नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा – अभिमन्यू पवार
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण – अतुल भोसले
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कणकवली – नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
इचलकरंजी – राहुल आवाडे
मिरज – सुरेश खाडे
सांगली – सुधीर गाडगीळ

Saturday, October 19, 2024

नवाब मलिकांना उमेदवारी ? अजित पवार गट आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण होणार?

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवारांचे आमदार नबाव मलिक यांनी पक्ष फुटीनंतर दादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मलिकांना अजित पवार पुन्हा तिकीट देणार आहेत. मात्र मलिकांना भाजपनं उमेदवारी जाहीर होण्याआधीच विरोध केला आहे.

नवाब मलिकांवरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपचे पुन्हा मतभेद निर्माण होण्याचे चिन्हं आहेत. कारण भाजपकडून शेलारांनी नवाब मलिकांच्या उमेदवारीला उघड विरोध केलाय. दाऊदशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणं भाजपला मान्य नाही, असं आशिष शेलार म्हणाले आहेत. नवाब मलिक अजित पवारांसोबत आहेत. सध्या ते मुंबईच्या अणुशक्तीनगरमधून आमदार आहेत, इथून त्यांच्या कन्या सना मलिकांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघातून अजित पवारांची राष्ट्रवादी नवाब मलिकांना तिकीट देऊ शकते. मात्र भाजपनं मलिकांना विरोध केलाय.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित जमीन प्रकरणात, फडणवीसांनी मलिकांवर आरोप केले होते. त्यानंतर ईडीची कारवाई झाली आणि 15 महिने मलिक जेलमध्ये होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला. मात्र तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार जावून महायुती सत्तेत आली आणि अजित पवारही सत्तेत सहभागी झाले होते. तसंच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मलिकांनी अजित पवारांना साथ दिली.
महिन्याभराआधीच अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेतही मलिक सहभागी झाले. मलिक अजित पवारांसोबत दिल्यानंतर फडणवीसांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंच म्हटलं होतं. आता मलिकांवरुन फडणवीसांनी नेमकी कोणती भूमिका काय होती, तेही पाहुयात.

अजित पवारांना लिहिलेल्या पत्रात 

फडणवीसांनी म्हटलंय की, सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. मलिकांवरील आरोप सिद्ध न झाल्यास त्यांचे आपण जरुर स्वागत करावे. मात्र आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे हे योग्य होणार नाही, हे आमचे स्पष्ट मत आहे. मलिकांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली. तरीही त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही.

भाजपच्या विशेषत: फडणवीसांच्या विरोधानंतर नवाब मलिकांना अजित पवारांनी त्यांच्या यात्रेदरम्यान सोबत घेतलं. ते स्टँडिंग आमदार असल्यानं अजित पवार त्यांना तिकीट देणारच आहे. मात्र भाजपनं तिकीट जाहीर होण्याआधीच विरोध केलाय आणि चित्र 2-3 दिवसांत स्पष्ट होईल. तोपर्यंत सगळेच वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.