Tuesday, October 22, 2024

तिकीटांच्या समीकरणामुळं नारायण राणे,धनंजय महाडिक आणि गणेश नाईक यांच्या घरांतही 2-2 पक्ष ?

वेध माझा ऑनलाइन।
महायुती आणि महाविकास आघाडीतल्या तिकीटांच्या समीकरणामुळं आता घरांतही 2-2 पक्ष झाल्याचं दिसतंय. नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. कुडाळमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. नारायण राणे भाजपचे खासदार, नितेश राणे भाजपचे आमदार आहेत. वडील आणि भाऊ भाजपात असले तरी तिकीटासाठी निलेश राणे बंड करुन शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत. महायुतीत कुडाळ-मालवणची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळं निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांशी निलेश राणेंची लढत होईल.

इकडे नवी मुंबईतही भाजपला गणेश नाईकांच्या घरातूनच धक्का बसलाय. नाईकांचे पुत्र, संदीप नाईकांनी 28 माजी नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. गणेश नाईकांना ऐरोलीतून विधानसभेचं तिकीट दिलंय. मात्र बेलापूरमधून भाजपनं तिकीट न दिल्यानं, संदीप नाईकांनी तुतारीवर लढण्याचा निर्णय घेतला.
निलेश राणेंसारखंच धनंजय महाडिकांच्या घरात होण्याची शक्यता आहे. धनंजय महाडिक, भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक कोल्हापूर उत्तरमधून इच्छुक आहेत. मात्र महायुतीत जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळे  निलेश राणेंसारखंच धनंजय महाडिकांच्या घरात होण्याची शक्यता आहे
तिथून मात्र राजेश क्षीरसागर शर्यतीत आहेत.


No comments:

Post a Comment