Monday, June 19, 2023

मनिषा कायंदे शिंदे गटात गेल्या...कारण ४० कोटींची "ती' फाईल!...संजय राऊत यांचे विधान ;


वेध माझा ऑनलाइन । 
ठाकरे गटाच्या माजी प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी रविवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मनिषा कायंदेंवर टीकास्र सोडलं. ४० कोटींच्या कथित फाईलमुळे मनिषा कायंदे शिंदे गटात गेल्या, असं विधान संजय राऊतांनी केलं. राऊतांच्या या विधानावर स्वत: मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


मला कुठल्या निधीचं आमिष दिलं नाही. मी कुठल्याही आमिषाला बळी पडले नाही, अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

मनिषा कायंदे पुढे म्हणाल्या, “काही लोकांना वाटतं, माझा आमदारकीचा कार्यकाल पुढच्या महिन्यात संपणार आहे. पण असं नाहीये, माझा अजून एक वर्षाचा कार्यकाल बाकी आहे. २०२४ ला निवडणुका होतील. त्यानंतर कुणाला काय मिळणार? हे ठरेल. राजकारणात खूप वचनं दिली जातात. पण त्या-त्या वेळी काय अडचणी असतात? हे आपल्याला माहीत आहे. मला संघटनेत फक्त एक चांगलं पद द्या, जेणेकरून मला मनमोकळेपणाने काम करता येईल, एवढंच मी एकनाथ शिंदेंना म्हटलं.”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
मनिषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केल्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “जे खरे शिवसैनिक आहेत, ते शिवसेनेतच आहेत. प्रत्येक गोष्ट खोके किंवा पैशांनी विकत घेता येत नाही. ४० कोटींची कुठलीतरी फाईल समोर आली म्हणून बाई (मनिषा कायंदे) शिंदे गटात गेल्या, असं मी काल व्यासपीठावर ऐकलं आहे. याबद्दल मला जास्त माहीत नाही. मी या विषयावर फार बोलतही नाही. पण हे लोक कुठून येतात आणि कुठे जातात? हा एक संशोधनाचा विषय आहे. यावर भविष्यात आम्हाला विचार करावा लागेल




पिस्तुलाचा धाक दाखवून पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरील हॉटेल वैशालीची जबरदस्तीने घेतली पॉवर ऑफ अटॉर्नी ; धक्कादायक प्रकार ; पुण्यात खळबळ ; पोलिसात तक्रार दाखल ;


 वेध माझा ऑनलाईन । 
फर्ग्युसन रोडवरील प्रसिद्ध हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटॉर्नी पिस्तुलाचा धाक दाखवून घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजीत विनायकराव जाधव (वय ३८), अभिजित विनायकराव जाधव (वय ४०), विनायकराव जाधव (वय ६५), वैशाली विनायकराव जाधव (वय ६०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत एका विवाहितेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१८ पासून १८ जून २०२३ पर्यंत सुरु होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती विश्वजीत याने २०१८ मध्ये फिर्यादी यांना त्यांच्या घोले रोड येथील घरी दारु व ड्रग्ज पाजून त्यांच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. लग्नानंतर त्यांना संगनमताने मारहाण करुन शारीरीक व मानसिक छळ केला. विश्वजीत याने पिस्टलचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने पॉवर ऑफ अटॉर्नी करुन फिर्यादीचे वडिलांचे वैशाली हॉटेल, त्यांच्यावर नावावर करुन घेतले.

कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या कोट्यावधींच्या ४ कारची परस्पर विक्री करुन फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीचे १ कोटी ७० लाख रुपयांचे लग्नातील दागिने व वस्तू तसेच दोन कार घेऊन तो व त्यांचा भाऊ वापरत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक विक्रम गौड अधिक तपास करीत आहेत.

Sunday, June 18, 2023

महाविकास आघाडीत बिघाडी? ; संजय राऊत यांचा स्वबळाचा इशारा ; यावर ...शरद पवार अजितदादा काय म्हणाले...

वेध माझा ऑनलाइन । महाविकास आघाडीत बिघाडी? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.  कारण खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत शक्य आहे तोपर्यंत राहू त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असं शिबिरात जाहीर भाषण करताना बोलले..तर सामनामध्ये तर दुसरीकडे आमचं मोदी शाह यांच्याशी आमचं भांडण नसल्याचं म्हणत पुन्हा एकदा भाजप नेतृत्वाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न साधला आहे. त्यामुळे ठाकरे गट महाविकास आघाडीत राहणार की पुन्हा जुन्या युतीत सहभागी होणार या चर्चांना वेग आला आहे. संजय राऊतांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेनेच्या राज्यव्यापी शिबीरात बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीवरही भाष्य केलेय.  आता सगळे भावी मुख्यमंत्री समोर येताय. या भावी मुख्यमंत्र्याचा पीक आलाय. माझ्यासमोरही  एक भावी मुख्यमंत्री आहेत. आपण राहू महाविकास आघाडीमध्ये जोपर्यत आहोत तोपर्यंत. ज्यावेळी निर्णय घ्यायचा तेव्हा घेऊ. विद्यामान मुख्यमंत्री समोर आहेत, कोर्ट काय म्हणाल होत आम्ही पुन्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं असते, असे संजय राऊत म्हणाले. 
आमच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार आहे, हा विषय आज आमचा नाहीच. आज हे राज्य आणि देश पातळीवर भाजपला दूर कसं करता येईल, यावर अधिक लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळं आज राज्यात कोण येईल, हा विषय सध्या नाही, असे शरद पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले ...
त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे. तीन पक्ष एकत्र आल्याशिवय आम्ही शिंदे आणि भाजपचा मुकाबला करु शकत नाही. हेच संजय राऊत मागे म्हणाले होते की आमची आघाडी 25 वर्षे टिकणार आहे. त्यावेळी त्यांना आघाडी 25 वर्ष टिकेल असे वाटतं होते पण आता त्यांना एकट्याचे सरकार यावं अस वाटत असेल तर चुकीचे काय आहे ? काहीतरी ध्येय डोळयासमोर ठेवून वाटचाल करीत असतो आणि ती इच्छा त्यांनी बोलून दाखवली, त्यांना आमच्या शुभेच्छा, असे अजित पवार म्हणाले.

कराडात पंचायत समिती परिसरात चोरी - रोख रकमेसह चक्क पिस्टलच नेली चोरून ...काय आहे बातमी...?

वेध माझा ऑनलाइन । कराडातील पंचायत समिती परिसरात अज्ञात चोरट्यानी एका माध्यम कार्यालयाच्या काचा फोडून  रोख रक्कम पळवत अन्यही दोन ठिकाणी चोरी केल्याचो घटना काल घडली आहे 

त्याठिकाणी पंचायत समिती परिसरात असलेल्या पत्रकार प्रकाश पिसाळ यांच्या स्वप्न नगरी कार्यालयाच्या काचा फोडून तेथील काही रोख रक्कम चोरट्यानी लंपास केली किमती कॅमेरे व रोख रक्कम अशी एकूण अंदाजे 50 हजाराची त्याठिकाणी चोरी झाली आहे तर एका ठिकाणाहून एअर गन व एअर पिस्टल चोरून नेली आहे तसेच तेथील हॉटेल सुराज याठिकाणी देखील चोरी झाली आहे अशा एकूण 3 ठिकाणी चोरट्यानी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे पंचायत समिती परिसरात ही चोरी झाली आहे पत्रकार प्रकाश पिसाळ यांनी पोलिसात तक्रार दिली आहे

ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाकरे गटाची "ही' महिला नेता जाणार शिंदे गटात ! ;

वेध माझा ऑनलाइन । शिवसेना पक्षाचा वर्धापनदिन आहे त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.  काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यापासून ते आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी  विधानपरिषद  आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे 

ठाकरे गटाची  चिंता वाढली 
ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी एक आमदार शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आगामी महापालिकेंच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात अनेक प्रमुख महापालिकांची मुदत संपली आहे.  येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक नगरसेवक, पदाधिका-यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंकडे विधानसभा आणि विधानपरिषद मिळून मोजकेच आमदार ठाकरेंकडे आहेत. ठाकरेंकडे असणारे आमदार  हळूहळू शिवसेनेत पक्षप्रवेश करू लागल्यानं ठाकरे गटाची  चिंता वाढली  आहे.

Saturday, June 17, 2023

प्रकाश आंबेडकर यांनी दिली औरंगजेबाच्या कबरीला भेट ; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता ;

वेध माझा ऑनलाइन ।  राज्यात अलीकडेच औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळे अनेक भागात हिंसाचार घडला. कोल्हापूरमध्ये दंगलसदृश परिस्थिती उद्भवली. मात्र याच परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटू शकते. 

औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, औरंगजेबाच्या समाधीला मी भेट दिली. इथं ऐतिहासिक वास्तू आहे ती बघायला आलो आहे. औरंगजेब राज्यावर ५० वर्ष राज्य करून गेला ती तुम्ही मिटवणार आहात का? औरंगजेबाचे राज्य इथं आले का हे बाबासाहेबांनी सांगितलंय. जयचंद इथं आले होते. त्या जयचंदाला शिव्या घाला आणि औरंगजेबाला शिव्या का घालताय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

त्याचसोबत मी औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्याने ठाकरेंची कोंडी अजिबात होणार नाही. कारण औरंगाबाद हे दुसरी राजधानी व्हावी हे तुघलकांपासून आहे. महाराष्ट्राने पुढाकार घेऊन या भारताची दुसरी राजधानी हे औरंगाबाद, खुलताबाद करावी. माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर २ दिवसांत दंगलीचा विषय निपटून टाकला असता. वादाचा विषय होऊन देता म्हणून वाद होतो असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

खुलताबाद ऐतिहासिक शहर आहे, आम्ही येथील मारुती मंदिराला देखील भेटत आहोत. नावावरून भांडण लावण्याचा प्रकार सुरु आहे त्यांना एकच सांगतो, औरंगजेबाने राज्य केले हे कोणाला मिटवता येणार नाही. बाबासाहेबांनी सांगितले, औरंगजेबाचे राज्य आले जयचंद यांच्यामुळे आले. असे जयचंद येथील अनेक हिंदू राज्यांकडे होते. त्यांना तुम्ही का विरोध करत नाहीत. ज्यांनी देशाला गुलाम केले त्यांची तुम्ही निंदा करा असंही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 


उदयनराजेंशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, पालकमंत्र्यांनी समंजसपणाची भूमिका घ्यावी ; शिवेंद्रराजे भोसले यांचे स्पष्ट मत ;

वेध माझा ऑनलाइन । साताऱ्यात सध्या सुरू असलेल्या स्मारक उभारणीबाबतच्या विषयावर बोलत असताना भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दोन्ही नेत्यांचे कान उघडणी केली आहे.

या वेळी बोलत असताना ते म्हणाले साताऱ्यात सुरू आहे हे इगो वॉर सुरू आहे. एकाने भिंतीवर चित्र रंगवलं म्हणून दुसऱ्याने स्मारकाचा विषय काढला आहे. दुर्दैवाने या दोन्ही नेत्यांमध्ये सातारकर आणि शिवभक्त गुरफटले गेले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज किंवा सातारची छत्रपती शाहू महाराज यांच्या बाबत कोणतीही तडजोड कोणीही करणार नाही. सुरू असलेले इगो वॉर दोन्ही नेत्यांनी थांबवावे माझं तर स्पष्ट मत आहे.

पालकमंत्र्यांनीच याबाबतीत सामंजसपणा दाखवावा उदयनराजेंशी बोलण्यात काही अर्थच नाही भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे स्वतःच्याच विश्वात सतत असल्यामुळे त्यांच्याकडून भूमिका घेतली जाईल अस वाटत नाही.मंत्र्यांनीच सामंजसपणा दाखवून शिवभक्तांचा भावनेचा विचार करून हे स्मारक पोवई नाका येथे न करता दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी करावे.