वेध माझा ऑनलाईन । फर्ग्युसन रोडवरील प्रसिद्ध हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटॉर्नी पिस्तुलाचा धाक दाखवून घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजीत विनायकराव जाधव (वय ३८), अभिजित विनायकराव जाधव (वय ४०), विनायकराव जाधव (वय ६५), वैशाली विनायकराव जाधव (वय ६०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत एका विवाहितेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१८ पासून १८ जून २०२३ पर्यंत सुरु होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती विश्वजीत याने २०१८ मध्ये फिर्यादी यांना त्यांच्या घोले रोड येथील घरी दारु व ड्रग्ज पाजून त्यांच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. लग्नानंतर त्यांना संगनमताने मारहाण करुन शारीरीक व मानसिक छळ केला. विश्वजीत याने पिस्टलचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने पॉवर ऑफ अटॉर्नी करुन फिर्यादीचे वडिलांचे वैशाली हॉटेल, त्यांच्यावर नावावर करुन घेतले.
कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या कोट्यावधींच्या ४ कारची परस्पर विक्री करुन फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीचे १ कोटी ७० लाख रुपयांचे लग्नातील दागिने व वस्तू तसेच दोन कार घेऊन तो व त्यांचा भाऊ वापरत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक विक्रम गौड अधिक तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment