वेध माझा ऑनलाइन । शिवसेना पक्षाचा वर्धापनदिन आहे त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यापासून ते आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे
ठाकरे गटाची चिंता वाढली
ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी एक आमदार शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आगामी महापालिकेंच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात अनेक प्रमुख महापालिकांची मुदत संपली आहे. येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक नगरसेवक, पदाधिका-यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंकडे विधानसभा आणि विधानपरिषद मिळून मोजकेच आमदार ठाकरेंकडे आहेत. ठाकरेंकडे असणारे आमदार हळूहळू शिवसेनेत पक्षप्रवेश करू लागल्यानं ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.
No comments:
Post a Comment