Tuesday, October 15, 2024

कराड दक्षिणच्या चौफेर विकासासाठी डॉ. अतुल भोसलेंसारखे कार्यक्षम नेतृत्व गरजेचे : डॉ. सुरेश भोसले ;

वेध माझा ऑनलाइन।
आमदार असताना कुणीही निधी आणेल; पण आमदार नसतानाही भरघोस निधी आणण्याचे कर्तृत्व डॉ. अतुल भोसले यांनी दाखविले आहे. कराड दक्षिणच्या चौफेर विकासासाठी जनतेने डॉ. अतुल भोसलेंसारख्या कार्यक्षम नेतृत्वाची निवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कार्वे (ता. कराड) येथे डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ७.४० कोटींच्या विकासकामांच्या भूमीपूजन व उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

महायुती सरकारच्या माध्यमातून आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून कार्वे गावात श्री धानाई मंदिर - गोपाळनगर – शिंदे वस्ती - मोळाचा मळा ते वडगाव हवेली या रस्त्यासाठी ४ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच कार्वे ते कोडोली रस्ता रूंदीकरण व मजबुतीकरणासाठी ३ कोटी आणि अल्पसंख्याक विकास योजनेतून मुस्लिम मस्जिद येथे बांधकामासाठी एकूण २० लक्ष असा एकूण ७ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या विविध विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 

याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना डॉ. भोसले म्हणाले, आज कृष्णा समूहाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. लोकांना आरोग्य, शिक्षण अशा सुविधा प्राप्त झाल्या आहेत. सामाजिक पातळीवर हे काम सुरु असतानाच; डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून आणि भाजपा – महायुती सरकारच्या माध्यमातून विविध गावांमध्ये विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला आहे. येत्या काळात सरकारच्या मदतीने कराड दक्षिणचा चौफेर विकास करण्यासाठी डॉ. अतुल भोसलेंना येत्या निवडणुकीत नेतृत्व करण्याची संधी जनतेने द्यावी.

यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक निवासराव थोरात, माजी संचालक संपतराव थोरात, माजी उपसरपंच वैभव थोरात, संभाजी थोरात, माजी पं. स. सदस्य कैलास जाधव यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रणजीतनानाच्या प्रयत्नाने कराडमध्ये 25 कोटी निधि आला ; काय आहे बातमी?


वेध माझा ऑनलाइन।
छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासह लिबर्टी मजदूर मंडळाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती स्मारक समितीचे संस्थापक सचिव रणजीत नाना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे विशेष सहकार्यातून व रणजीत पाटील नाना यांचे विशेष प्रयत्नातून कराड शरातील या दोन महत्वपूर्ण कामांसाठी 25 कोटी रुपये निधि मंजूर झाला आहे.

यावेळी बोलताना रणजीत पाटील म्हणाले की, स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसह विविध कामे करण्यासाठी चार कोटी रुपयांचा रुपये निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर लिबर्टी मजदूर मंडळ येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे व विविध कामे करण्यासाठी 21 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
ते  म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर जागेच्या मातीची टेस्ट केलेनंतर असे लक्षात आले की सदर कामासाठी 20 ते 22 फुट खाली राफ्ट व फौंडेशन घावे लागत आहे व त्यासाठी खर्च खूप वाढत होता. ही बाब महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्यानंतर मुख्यमंत्री यांनी लिबर्टी मजदूर मंडळ येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे व विविध कामे करणे. टप्पा क्रं. 2 साठी 21 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. त्यामुळे आता कराड शहराच्या वैभवात भर पडणारे दोन्हीही प्रोजेक्ट पूर्ण होण्यास कोणतीही अडचण राहिलेली नाही.
कराड नगरपरिषद कार्यालयतील 78 सफाई कामगार यांना वारसाहक्काने लाड शिफारशिनुसार नेमणुका मिळणेबाबत येणाऱ्या अडचनीबद्दल मुख्यमंत्री यांना सांगितल्यानंतर त्यांनी  तातडीने त्याचा आदेश प्राप्त केलेला आहे. त्यामुळे त्या कामगारांना वारसाहक्काने वारसास लाड शिफारशिनुसार नेमणुकीबाबतचा अडथळा दूर करण्यात आलेला आहे शासनाने याबाबतचा आदेश पारित केलेला आहे.याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई व रणजीत पाटील नाना यांचे स्मारक समिती तसेच लिबर्टी मजदर मंडळाकडून  आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी, प्रचारावर निर्बंध !

वेध माझा ऑनलाइन।
उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतल्या एच, एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना त्रास जाणवू लागला होता. हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आल्या आणि डॉक्टरांनी अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंवर याआधी 2012 मध्ये जुलै आणि नोव्हेंबरमध्ये 2 वेळा अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. आता ही तिसरी अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. मुख्यमंत्री असताना 2021 मध्ये मणक्याचं ऑपरेशनही झालं होतं. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे.

2 दिवसांआधी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कात दसरा मेळावाही घेतला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतही उद्धव ठाकरे हजर होते. मात्र पुढच्या काही तासांतच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करुन अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. ऐन निवडणुकीत अ‍ॅन्जिओप्लास्टी झाल्यानं उद्धव ठाकरे यांना आता प्रचारासाठीही काही प्रमाणात निर्बंध येतील.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिणेत १ कोटी ९० लाख ५० हजाराचा निधी उपलब्ध ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील सरकार विरोधी पक्षांचे असतानाही राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा सिलसिला कायम राखला आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षात सुरुवातीस कोरोनाचे संकट व नंतर राज्यात सत्ताबदल होवूनही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी आणत आपल्या प्रत्यक्ष कृतीची प्रचिती इतरांना दिली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी १ कोटी ९० लाख ५० हजार रुपयांचा निधी आणला आहे. या निधीची प्रशासकीय प्रतही मिळाली आहे.

मागील कालावधीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राज्यस्तरीय अनुसूचित जाती व नवबौध्द घटक योजना २०२४ - २५ अंतर्गत विविध विकासकामांना निधी देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबतचा अहवाल शासन दरबारी दिला. यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यामधून मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी १ कोटी ९० लाख ५० हजाराचा निधी उपलब्ध झाला आहे.

उपलब्ध निधीतून होणारी विकासकामे व कंसात मिळालेला निधी असा ; समतानगर - येळगाव येथे आरसीसी गटार करणे (९ लाख ५० हजार रुपये), अहिल्यानगर - वहागाव येथे बंदिस्त गटार बांधणे (७ लाख रुपये), आंबेडकरनगर - येरवळे येथे आरसीसी गटार करणे (९ लाख ५० हजार रुपये), नाईकबा मंदिर वस्ती - आटके येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (९ लाख ५० हजार रुपये), आंबेडकरनगर - घोगाव येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), रोहिदासनगर - विंग येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (९ लाख ५० हजार रुपये), गणेशनगर बेघर वस्ती गोळेश्वर येथे बंदिस्त गटार व आरसीसी रस्ता करणे (९ लाख ५० हजार रुपये), सिद्धार्थनगर रेठरे खुर्द येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (८ लाख ५० हजार रुपये), कृष्णा कॅनॉल सैदापूर येथील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), सम्राट अशोकनगर वडगाव हवेली येथील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (९ लाख रुपये), आण्णाभाऊ साठे नगर वाठार येथे नळपाणी पुरवठा कनेक्शन व मीटर बसवणे (८ लाख रुपये), आण्णाभाऊ साठे नगर विठ्ठलवाडी येथे रस्ता कॉंक्रीटीकरण व गटार बांधकाम करणे (१० लाख रुपये), आवळे वस्ती अकाईचीवाडी येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (६ लाख रुपये), सिद्धार्थनगर मनव येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (९ लाख ५० हजार रुपये), सम्राटनगर सवादे येथे रस्ता कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटार करणे (९ लाख रुपये), सिद्धार्थनगर जिंती येथील रस्ता कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटार करणे (१० लाख रुपये), आदर्शनगर शेरे येथे बंदिस्त गटार करणे (९ लाख रुपये), रोहिदासनगर चर्मकार वस्ती कासारशिरंबे येथील खंडोबा मंदिर ते चर्मकार वस्तीपर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), रमाईनगर ओंड येथे आरसीसी गटार व रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), भीमनगर व संत रोहिदास नगर तारुख येथे आरसीसी गटार करणे (९ लाख रुपये), जय मल्हार कॉलनी घोणशी येथे रस्ता कॉंक्रीटीकरण व आरसीसी गटार करणे (९ लाख रुपये), होली फॅमिली सैदापूर पाठीमागील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (९ लाख रुपये), झिमरे - साळुंखे वस्ती गोळेश्वर येथील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (९ लाख रुपये).

आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून २ कोटी ७७ लक्ष रूपये निधी मंजूर ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा विकास योजनेमधून कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील विविध गावांमधील विकास कामांकरीता रक्कम रूपये २ कोटी ७७ लक्ष रूपये निधी मंजूर झाला असून सदरची कामे मार्गी लागणार आहेत 

यामध्ये हजारमाची स.गड ता.कराड येथे वॉर्ड क्र.५ कल्पतरू वसाहतीमधील रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, हणबरवाडी ता. कराड येथे भगतसिंग नगरमधील रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ९.५० लक्ष, तळबीड ता. कराड येथे विठ्ठल मळामध्ये आर.सी.सी. गटर बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, वडोली भिकेश्वर ता. कराड येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगरमधील रस्ता काँक्रीटीकरण करणे व बंदिस्त गटर बांधणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, चरेगांव ता. कराड येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगरमध्ये बंदिस्त गटर बांधणे रक्कम रूपये ९.५० लक्ष, पाडळी (हे.) ता. कराड येथे पंचशिलनगरमधील कराड कोरेगांव रस्ता ते विश्वनाथ रामचंद्र वाघमारे यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, वाघेश्वर ता. कराड येथे संगमनगर मधील बैराग वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, हेळगांव ता. कराड येथे आंबेडकरनगरमध्ये अंतर्गत गटर करणे रक्कम रूपये ९.५० लक्ष, चरेगांव ता. कराड येथे भोसलेवस्ती मधील रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ९.०० लक्ष, हजारमाची स.गड ता. कराड येथे वॉर्ड क्र.६ आंबेडकर नगरमधील जयवंत विरकायदे ते सागर कांबळे यांचे घरापर्यंत आर.सी.सी. बंदिस्त गटर करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, कोरेगांव ता. कराड येथे रमाईनगर मध्ये बंदिस्त गटर करणे रक्कम रूपये ९.५० लक्ष, खराडे ता. कराड येथे सिध्दार्थनगर मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे व आर.सी.सी. गटर बांधकाम करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, निगडी ता. कराड येथे संगमनगरमध्ये नवीन गावठाण रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, वाघेरी ता. कराड येथे आदर्शनगर मध्ये गावठाण रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ९.५० लक्ष, कोपर्डे हवेली ता. कराड येथे माळवस्ती मध्ये बंदिस्त गटर करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, विरवडे ता. कराड येथे नवबौध्दवस्तीमध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ७.०० लक्ष, वाठार ता. कराड येथे आण्णाभाऊ साठेनगर मध्ये नळ कनेक्शन व मिटर बसविणे रक्कम रूपये ८.०० लक्ष, बनवडी ता. कराड येथे पुन्यश्लोक अहिल्यादेवीनगर नवीन गावठाण मध्ये साठे घर ते कांबळे घर यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, मसूर ता. कराड येथे मागासवर्गीय वस्तीत युवराज वाघमारे घर ते प्रमोद पवार घर रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, उंब्रज ता. कराड येथे रोहिदासनगर मध्ये आर.सी.सी. गटर करणे रक्कम रूपये ४.०० लक्ष, शिवडे ता. कराड येथे सिध्दार्थनगर मध्ये नळपाणीपुरवठा योजना करणे रक्कम रूपये १०.०० लक्ष, पेरले ता. कराड येथे आण्णाभाऊ साठेनगर मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ६.५० लक्ष, शिरवडे ता. कराड येथे आदर्शनगर मध्ये नळपाणीपुरवठा योजना जलमापक यंत्र बसविणे रक्कम रूपये ९.०० लक्ष, वराडे ता. कराड येथे बौध्द व मातंगवस्ती मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ९.५० लक्ष, सयापूर ता. कराड येथे रमाईनगरमध्ये बंदिस्त गटर करणे रक्कम रूपये ९.०० लक्ष, बाबरमाची स.गड ता. कराड येथे रमाईनगर मध्ये प्रदीप झेंडे ते वाघमारे यांचे घरापर्यंत बंदिस्त गटर करणे रक्कम रूपये ९.०० लक्ष, बनवडी ता. कराड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नवीन गावठाणमध्ये साबळे घर ते कांबळे घर यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ९.०० लक्ष, उंब्रज ता. कराड येथे तक्षशीलानगरमध्ये रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रक्कम रूपये ३.०० लक्ष, अंतवडी ता. कराड येथे सिध्दार्थनगरमध्ये रस्ता काँक्रीटीकरण व आर.सी.सी. गटर करणे रक्कम रूपये ९.०० लक्ष, हिंगनोळे ता. कराड येथे आंबेडकरनगर मध्ये आंबेडकरनगर ते ग्रामपंचायतीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ९.०० लक्ष, पार्ले ता.कराड येथे माणिकनगरमध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रूपये ८.५ लक्ष, या कामांचा समावेश आहे.

बांधकाम कामगारांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये मिळणार मोफत उपचार ; वैद्यकीय नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष सुरु; कुटुंबियांनाही मिळणार लाभ

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र शासन आणि इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदीत बांधकाम कामगारांना वैद्यकीय योजनांचा लाभ दिला जातो. याअंतर्गत येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना २ लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येणार आहेत. या कामगारांच्या वैद्यकीय नोंदणीसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्षाची सुरुवात आजपासून करण्यात आली.

महाराष्ट्र शासन आणि इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदीत बांधकाम कामगारांसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्व बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी डॉ. अतुल भोसले विशेष प्रयत्नशील आहे. नोंदीत बांधकाम कामगारांना २ लाखापर्यंतच्या उपचार सुविधांबरोबर अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या सुविधा आता कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाल्याने बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची मोठी सोय झाली आहे.

कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे आणि कृष्णा विश्व विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. या कक्षामध्ये नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय नोंदणी केली जाणार आहे. तसेच २४ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.

यावेळी बोलताना श्री. माशाळकर म्हणाले, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटल समाजातील तळागाळातील घटकांसाठी सातत्याने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित असते. बांधकाम कामगार हा आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या; पण समाजाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या घटकासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल सदैव तत्पर असून, या कक्षाला भेट देऊन, बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी विविध वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा.

याप्रसंगी कृष्णा हास्पिटलच्या विमा अधिकारी प्रियांका पवार, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक विक्रम पाटील, विक्रम पवार, माणिक साळुंखे, धनाजी माने यांच्यासह हॉस्पिटलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


वैद्यकीय योजनेचा लाभ कसा मिळवाल?

नोंदीत बांधकाम कामगार, त्याची पत्नी अथवा पती, त्यांची १० वर्षांवरील पहिली २ अपत्ये, तसेच नोंदीत कामगाराचे आई – वडील किंवा सासू – सासरे यांना या वैद्यकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे. वैद्यकीय नोंदणीसाठी येताना लाभार्थीने नोंदणी कार्ड व आधार कार्ड, तसेच संबंधित नातेवाईकांचे आधारकार्ड घेऊन यावे, असे आवाहन कृष्णा हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

राजेन्द्रसिंह यादव याना ताकद देणार ; खासदार श्रीकांत शिंदे

वेध माझा ऑनलाइन।
राजेंद्रसिंह यादव व शरद कणसे यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड शहरासाठी सुमारे २०९ कोटी रुपयांचा निधी दिला. एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. त्यांचे हात बळकट करा. शिवसेनेच्या बळकटीसाठी कराडमध्ये राजेंद्रसिंह यादव यांना पक्षाच्या वतीने संपूर्ण ताकद देण्यात येईल, अशी ग्वाही शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

राजेंद्रसिंह यादव यांच्या अथक पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या भुयारी गटर योजना, पाणी पुरवठा योजनेसह विविध विकासकामांसाठी सुमारे २०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामांचे ऑनलाइन भूमिपूजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, चंद्रकांत जाधव, शहर प्रमुख राजेंद्र माने, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, हणमंत पवार, माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक व महिलांची प्रचंड उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराडच्या महत्त्वपूर्ण योजनांचे भूमिपूजन होणार होते. परंतु ते पोहचू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी कराडच नव्हे तर संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रचंड निधी दिला आहे. अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. हे सर्व निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत.

कराडसाठी लवकरच ड्रीम प्रोजेक्ट - यादव
राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, स्मार्ट कराडचे स्वप्न पाहून त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या मागणीचा विचार करून २०९ कोटींचा निधी दिला. आजपर्यंत एकावेळी इतका निधी शहराला मिळाला नव्हता. कराड फेज टू ची ही सुरुवात आहे. आणखी निधी येत राहिल. कराड शहर व तालुक्याला दिशा देईल, असा ड्रीम प्रोजेक्ट हाती घेतला असून लवकरच त्याची घोषणा करणार आहे. फेज टू मध्ये शहर आदर्शवत करणार असून शहर पाहण्यासाठी राज्यातून लोक येतील, अशा पद्धतीने कामांची आखणी करणार आहे.
कराडच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, संपर्क प्रमुख शरद कणसे यांचे सहकार्य लाभले आहे. या विकास कामांचे लोकार्पण भव्य प्रमाणात करणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहर व परिसरात ५१ शाखांचे उद्घाटन त्यावेळी करणार असल्याचे यादव यांनी सांगितले. कराडमधील विकास कामे शहराच्या इतिहासात मैलाचा दगड ठरतील.

शरद कणसे म्हणाले, राजेंद्रसिंह यादव यांच्याकडे विकासाची दृष्टी असून भविष्यात शिवसेना पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.

जयवंतराव शेलार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कराड साठी कधी नव्हे इतका निधी मिळाला आहे. या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम यादवांनी केले आहे.
प्रास्ताविकात स्मिता हुलवान म्हणाल्या की, कराडच्या विकासाची दृष्टी राजेंद्रसिंह यादव यांच्याकडे आहे. भविष्यात स्मार्ट कराडचे स्वप्न साकार करण्यासाठी यादव यांच्या पाठीशी राहावे. राजेंद्रसिंह यादव यांचे नेतृत्व भविष्यात वाढत जावे, यादृष्टीने त्यांनी भविष्याचा वेध घ्यावा. स्मार्ट कराडचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे.

राजेंद्रसिंह यादव यांच्याकडे मोठी जबाबदारी द्या ; 

सचिन पाटील यांनी मित्र परिवाराच्या वतीने मनोगत व्यक्त करताना राजेंद्रसिंह यादव यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी द्यावी. आम्ही सर्व ताकदीने यादव यांच्याबरोबर राहणार आहोत, अशी मागणी यावेळी केली.  मोठ्या पदावर नसतानाही यादव यांनी विक्रमी निधी कराडसाठी खेचून आणल्याने आगामी काळात यादव यांच्याकडे पक्षाकडून मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा मेळाव्यात सुरू होती.