छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासह लिबर्टी मजदूर मंडळाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती स्मारक समितीचे संस्थापक सचिव रणजीत नाना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे विशेष सहकार्यातून व रणजीत पाटील नाना यांचे विशेष प्रयत्नातून कराड शरातील या दोन महत्वपूर्ण कामांसाठी 25 कोटी रुपये निधि मंजूर झाला आहे.
यावेळी बोलताना रणजीत पाटील म्हणाले की, स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसह विविध कामे करण्यासाठी चार कोटी रुपयांचा रुपये निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर लिबर्टी मजदूर मंडळ येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे व विविध कामे करण्यासाठी 21 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
ते म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर जागेच्या मातीची टेस्ट केलेनंतर असे लक्षात आले की सदर कामासाठी 20 ते 22 फुट खाली राफ्ट व फौंडेशन घावे लागत आहे व त्यासाठी खर्च खूप वाढत होता. ही बाब महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्यानंतर मुख्यमंत्री यांनी लिबर्टी मजदूर मंडळ येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे व विविध कामे करणे. टप्पा क्रं. 2 साठी 21 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. त्यामुळे आता कराड शहराच्या वैभवात भर पडणारे दोन्हीही प्रोजेक्ट पूर्ण होण्यास कोणतीही अडचण राहिलेली नाही.
कराड नगरपरिषद कार्यालयतील 78 सफाई कामगार यांना वारसाहक्काने लाड शिफारशिनुसार नेमणुका मिळणेबाबत येणाऱ्या अडचनीबद्दल मुख्यमंत्री यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने त्याचा आदेश प्राप्त केलेला आहे. त्यामुळे त्या कामगारांना वारसाहक्काने वारसास लाड शिफारशिनुसार नेमणुकीबाबतचा अडथळा दूर करण्यात आलेला आहे शासनाने याबाबतचा आदेश पारित केलेला आहे.याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई व रणजीत पाटील नाना यांचे स्मारक समिती तसेच लिबर्टी मजदर मंडळाकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment