Friday, July 24, 2020

"आदर्श मुख्याधिकारी' पुरस्कार प्राप्त रमाकांत डाके कामावर रुजू ...डाके यांच्याकडून कराडकराना विकासात्मक अपेक्षा...!!

कराड
 भम्पक व वादग्रस्त मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची नुकतीच उचलबांगडी झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेले नूतन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शुक्रवार दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजता येथील पालिकेतील मुख्याधिकारी दालनात येऊन आपला पदभार स्वीकारला.पालिका कर्मच्याऱ्यांनी तसेच नगरसेंवक इंद्रजित गुजर,व राजेंद्र माने यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत केले.

उचलबांगडी झालेले मुख्याधिकारी यांची कारकीर्द फारच वादग्रस्त म्हणून कराड शहरात गाजली.खरतर मूलभूत नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची संधी असताना त्यांनी बक्षिसे मिळवण्याच्या नादात केलेली कामे शहराच्या समोर नाचवून काहीतरी मोठं आपण काम करतोय असे दाखवण्याचा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला. खरतर त्याची काहीच गरज नव्हती.स्वच्छता अभियानातील त्यांचे काम चांगले झाले होते, मात्र  त्यांच्यावर अनेक आरोप खुद्द उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी करत त्यांच्या इतर चुकीच्या कामाच्या पद्धतीची वेळोवेळी चिरफाड केली होती. अतिक्रमण मोहिमेदरम्यान त्यांच्यावर येथील व्यापरिवर्ग चांगलाच नाराज झाला.व्यापारांचे अतोनात नुकसान करून केलेली ही अतिक्रमण मोहीम शहरात वाईट चर्चेने गाजली.एकूणच डांगे याना चांगल्या कामाची संधी असताना केवळ त्यांच्या मी पणाच्या कारभारामुळे सम्पूर्ण शहराला त्यांचा उपद्व्याप नको झाला,आणि त्यानंतर लोकभावना लक्षात घेऊन त्यांची उचलबांगडी करण्यात आली अशी चर्चा आहे.त्यांच्या जागी आदर्श मुख्याधिकारी पुरस्कार प्राप्त झालेले,आणि सांगली जिल्ह्यातील पलूस गावचे सुपुत्र रमाकांत डाके यांनी शुक्रवारी कराड चे नूतन मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

रमाकांत डाके यांनी सांगोला नगरपरिषदेत स्वच्छता अभियान,कचरा अभियान राबवून त्या पालिकेला गौरव प्राप्त करून दिला आहे.24 x 7 पाणी योजना यशस्वी राबवली आहे.स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मौदा नगरपरिषदेस देशपातळीवर गौरव मिळवून दिला आहे.असे कार्यक्षम, विनम्र, आणि संस्कारिक मुख्याधिकारी कराडला लाभले आहेत.त्यांना आदर्श मुख्याधिकारी म्हणून गौरवण्यात देखील आले आहे.त्यामुळे कराडकराना त्यांच्याकडून विकासात्मक अपेक्षा आहेत.

No comments:

Post a Comment