अजिंक्य गोवेकर
कराड
टेम्बु येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाला त्रास होऊ लागल्याने त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. सगळे दवाखाने एकीकडे कोविड पेशंटनी फुल्ल झाले असताना नगरसेवक राजेंद्रसिह यादव यांनी त्या रुग्णाला अशाही वेळी उपचारासाठी हॉस्पिटल उपलब्ध करून दिले त्यामुळे त्या पेशंटला योग्य उपचार मिळू शकले.यादव मेहेरबान यांनी दाखवलेल्या या तत्परतेचे शहरातून कौतुक होताना दिसतंय.
एका व्हाट्स अप ग्रुप वर सामाजिक कार्यकर्ते राहुल खराडे यांनी टेम्बु येथील एका रुग्णाला धाप लागत असल्याने व्हेंटिलेटरची गरज असल्याची पोस्ट टाकली होती.राहुल खराडे हे लोकांसाठी धडपडणारे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.त्यांनी सध्याच्या कोरोना काळात गोरगरीब जनतेसाठी मदतदेखील केली आहे. दरम्यान,त्यानी ही पोस्ट टाकल्या नंतर पालिकेचे मुख्याधिकारी डांके, नगरसेवक विजय वाटेगावकर, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर,डॉ,शीतल कुलकर्णी,वैभव चव्हाण,जान फौंडेशनचे जावेद नायकवडी यांनी या रुग्णाच्या मदतीसाठी खूप प्रयत्न केले व अनेक हॉस्पिटलमधून चौकशीदेखील केली.मात्र सगळे दवाखाने फुल्ल असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी येथील शारदा क्लिनिक चे डॉ,चिन्मय यांच्याशी नगरसेवक राजेंद्र यादव यांनी संपर्क केला व त्या रुग्णाला त्याठिकाणी उपचाराची सोय करून देण्याबाबत विनंती केली.डॉ, चिन्मय यांनीही त्या रुग्णांला ऍडमिट करून घेत तात्काळ योग्य ते उपचार दिले. राजेंद्र यादव यांनी दाखवलेली ही तत्परता सध्या शहरात चर्चेत आहे. सुरू असलेल्या सध्याच्या कोविडच्या महामारीत नगरसेवक यादव यांनी केलेलं कामही यानिमित्ताने चर्चेत आहे.अनेक गरजूंना त्यांनी लॉकडाऊन काळात घरउपयोगी वस्तूंचे वाटप केले आहे. मास्क वाटप,भाजीपाला वाटप,सॅनिटायझरचे वेळोवेळी केलेले वाटप, शहरातून त्यांनी केलेली औषध फवारणी,अशा त्यांच्या अनेक कामाची वाहवा देखील झाली आहे. टेम्बुच्या रुग्णाला उपचार मिळण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेचेही शहरातून सध्या कौतुक होताना दिसते आहे.

No comments:
Post a Comment