Monday, July 27, 2020

माजी मुख्यमंत्री आणि कराडचे नूतन मुख्याधिकारी यांच्यामध्ये महत्वपूर्ण चर्चा... प्रशासनाला माझी खंबीर साथ असेल - आ. पृथ्वीराजबाबांची मुख्याधिकार्यांना ग्वाही

कराड
कराड नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी श्री रमाकांत डाके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आ पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी येथील सद्यस्थितीवर चर्चा झाली. दरम्यान आपली लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासासनाला खंबीर साथ असेल अशी ग्वाही माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी नूतन मुख्याधिकार्यांनी दिली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष तसेच नगरसेवक राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, युवानेते इंद्रजित चव्हाण, सातारा जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष झाकीर पठाण, सुनील बरिदे आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत कराडचे मुख्याधिकारी यांनी शहरातील कोरोना च्या सद्य परिस्थिती बद्दल चर्चा केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने एकत्र येऊन कराड शहरासाठी काम करता येईल याबाबत चर्चा झाली. यावेळी आ. पृथ्वीराज बाबांनी कराड शहर व भागासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी कायम प्रशासनाला साथ असेल अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांना दिली. कराडच्या सर्वांगीण विकासासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन प्रशासनाने कारभार करावा असा सल्ला यावेळी माजी मुख्यमंत्र्यांनी श्री डाके यांना दिला.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, कराड शहराच्या नवनियुक्त मुख्याधिकाऱ्यांनी शहराचा लौकिक कायम राखण्यासाठी कराडमधील नगरसेवक तसेच सर्व घटकांना, व्यापारी, लोकप्रतिनिधी व आम जनतेला सोबत घेऊन शहराचा विकास करावा तसेच शहरातील जनतेशी सुसंवाद साधावा यामुळे शहरातील जनतेचे प्रश्न मुख्याधिकाऱ्यांना समजून येतील व ते सोडविण्यासाठी मदत होईल.

No comments:

Post a Comment