मुंबई
देशातील कोरोनाबधितांचा आकडा दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, अर्थचक्र सुरळीत ठेवण्याकरिता लॉकडाऊनसह देशात अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून बुधवारी (२९ जुलै) देशातील कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. केंद्राच्या घोषणेनंतर आता महाराष्ट्रातही ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी खरंतर देशात तब्बल अडीच ते ३ महिन्यांचा लॉकडाऊन पाळला. मात्र, या काळात अर्थचक्र रखडल्याने अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात सुरुवात करण्यात आली. त्यामुळे, देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. केंद्राकडून नुकतीच ‘अनलॉक ३’ची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही लॉकडाऊनसह टप्प्याटप्प्याने ‘मिशन बिगीन अगेन’ही अनलॉक प्रक्रिया सुरू आहे.
*राज्यासाठी ‘ही’ आहेत नवी मार्गदर्शक तत्त्वे*
-राज्यात यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवांसह आणि अन्य दुकानांची परवानगी कायम
-अत्यावश्यक सेवांसह अनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठा, बाजारपेठांचा परिसर आणि दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार
-चित्रपटगृहे, फूड कोर्टस आणि रेस्टॉरंट्स अद्याप परवानगी नाही.
-५ ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार
-मॉल्स तसेच मार्केट कॉम्प्लेक्समधील फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्सना होम डिलिव्हरीकरिता किचन सुरु ठेवण्यास परवानगी
-मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी.

No comments:
Post a Comment