Monday, July 27, 2020

आता.. आठवड्यातून दोनदा होणार सम्पूर्ण शहराचे सॅनिटायझेशन ; मुख्याधिकारी डाकेची माहिती

कराड
यशवंत डांगे यांच्या उचल बांगडी नंतर नूतन  मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी येथील पालिकेच्या कामाची सूत्रे हातात घेतली. लगेचच आजपासून शहरातील काही भागात स्वतः च्या उपस्थितीत औषध फवारणी करण्याच्या कामास त्यांनी प्रारंभ केला. यावेळी आठवड्यातून दोनदा सम्पूर्ण शहरात सॅनिटायझेशन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या कामाचा धडाका पाहून शहरातील व्यापारी वर्गासाह सुशिक्षित लोकांनी समाधान व्यक्त केलं.डासांचे वाढलेले शहरातील प्रमाण रोखण्यासाठी देखील पालिकेचे मोठे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी येथील एका खासगी वाहिनीशी बोलताना सांगितले.

येथील उचल बांगडी झालेले मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या जागी रमाकांत डाके हे येथे रुजू झाले आहेत.त्यांना आदर्श मुख्याधिकारी म्हणून यापूर्वी गौरवण्यात आले आहे. त्यांचे स्वच्छता अभियानातील केलेलं काम राज्यभर चर्चेत आले होते. त्यांनी अनेक उपक्रम राबवत विविध पालिकाना राज्यात गौरव मिळवून दिला आहे. डांगे यांची उचलबांगडी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी डाके येथे तातडीने हजर झाले.शहरातून फेरफटका मारून त्यांनी शहराची पाहणी केली. आपल्या पालिकेतील दालनातून त्यांनी त्यानंतर लगेचच कामाचा प्रारंभ केला.दरम्यान अनेक शहरवासीयांनी त्यांचे प्रत्यक्ष भेटून स्वागत केले.काही नगरसेवकांनी देखील त्यांना भेटून त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छाही दिल्या. मुख्याधिकारी डाके यांनी येथील आ. पृथ्वीराज चव्हाण व पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. आज सकाळी येथील डॉ. आंबेडकर ग्राउंड व बिचकर हॉस्पिटल परिसरामध्ये पालिका कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी स्वतः उपस्थित राहून त्याठिकाणी औषध फवारणी करून घेतली.सम्पूर्ण शहरात आठवड्यातून  दोनदा ट्रेकटर च्या माध्यमातून सॅनिटायझेशन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याठिकाणी छोटे रस्ते आहेत तिथे पालिका कर्मचारी जाऊन सॅनिटायझेशन करतील व शहराला निर्जंतुकीकरण करण्याचा यातून पालिकेचा प्रयत्न राहिल असेही ते म्हणाले.शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे ते रोखण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नूतन मुख्याधिकारी डाके यांनी याठिकाणी हजर झाल्या झाल्या येथील कामाचा स्वतःच्या उपस्थितीत  धडाका लावत येथील व्यापारी व सुशिक्षित वर्गाची वाहवा मिळवली आहे.त्यामुळे एकूणच डांगे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असणारा व्यापारी व वैचारिक वर्ग सध्या शहराच्या विकासाबाबत आशावादी दिसतो आहे. 

No comments:

Post a Comment