Friday, July 31, 2020

कोरोनाशी लढण्यासाठी कराड पालिकेचे "एक पाऊल पुढचे नियोजन' मुख्याधिकारी डाकेच्या प्रयत्नांचे कौतुक

अजिंक्य गोवेकर
कराड
रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असला आणि त्याच्यात लक्षणे मात्र फारशी दिसत नसतील तर, अशा पेशंटना घरीच उपचार देण्याबाबत येथील पालिका प्रयत्नशील राहणार आहे. त्यासाठी डॉक्टर्स लोकांचा एक गट  तयार करण्यात येणार आहे व तो गट याकामी कार्यरत असणार आहे. पालिकेचे मुख्याधिकारी डाके यांनी कोरोनाच्या लढाईसाठी केलेल्या या नवीन नियोजनाचे एक पाऊल पुढे म्हणून शहरातून कौतुक होत आहे. दरम्यान कोरोनाच्या सद्य स्थितीची माहिती मिळावी म्हणून पालिकेच्या वतीने  24 तास कोविड हेल्पलाईन देखील नुकतीच सुरू करण्यात आली आहे.

इथला चार्ज घेतल्या पासून सतत स्वतः कामात धडाडीने भाग घेऊन पालिका कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा देत शहरामध्ये कार्यरत दिसणारे येथील नूतन मुख्याधिकारी डाके यांनी शहरातील स्वच्छता व औषध फवारणी  स्वतः हजर राहून करून घेतली,मृत्यू झालेल्या पेशंटला स्वतः त्याच्या घरातून रुग्णवाहिकेत ठेऊन त्या मृतदेहाला अंत्यविधी साठी स्मशानभूमीत नेण्यापर्यंत आपले कर्तव्य त्यांनी बजावले.ही चर्चा होत असतानाच त्यांनी आता कोरोना नियोजनाबाबत बाबत एक पाऊलं पुढे टाकत पेशंटना त्यांच्या घरीच आयसोलेट करून तिथेच त्यांना उपचार देण्याबाबत पालिका प्रशासनाचा पुढाकार यापुढे असणार आहे. त्याकरिता डॉक्टर्स लोकांचा एक गट तयार करण्यात येणार असून तो गट या उपचारासाठी कार्यरत असेल.संबंधित रुग्णाला अधिक त्रास झाल्यास त्याला तिथून  रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.
शहरात अचानक कोरोनाचा प्रसार वाढल्याने अशा नवीन नियोजनाची गरज होती,की ज्यामुळे येथील हॉस्पिटल्सवर अनावश्यक ताण येणार नाही,आणि रुग्णांना देखील दवाखान्याअभावी उपचाराची कमतरता भासणार नाही आणि तेच या माध्यमातून होताना दिसतंय. पालिका प्रशासनाने पालिकेत कोरोना विषयी शहरातील माहिती देणारी यंत्रणा म्हणजेच कोविड  हेल्पलाईन  24 तास उभी केली आहे, त्याद्वारे शहरातील कोरोनाविषयी माहितीसह उपलब्ध हॉस्पिटल्स व त्याठिकाची असणारी उपलब्ध बेडस याचीची माहिती या यंत्रणेद्वारे मिळणार आहे.
 डांगे कार्यरत असताना शहरात रुग्णसंख्या देखील फारशी नव्हती.त्यांच्या काळात लोकडाऊन चा कालावधीही मोठा होता त्यामुळे पेशंट संख्या फार वाढली नव्हती.त्याकारणाने त्यांना कोरोनाच्या बाबतीत फारसे असे काही चॅलेंजिंग काम नक्कीच नव्हते. त्यांची बदली झाल्यानंतर आता आलेल्या नूतन मुख्याधिकाऱ्यांसमोर मात्र शहरातील कोरोनाच्या संकटाचे चित्र उभे ठाकले आहे. तरीही न डगमगता त्याबाबाबतचे नवीन नियोजन करण्याचे कसब त्यांनी रुजू झाल्या झाल्या लगेचच स्वतः रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत सम्पूर्ण शहराला दाखवून दिले. आणि आता त्यांनी एकूणच कोरोना पार्शवभूमीवर केलेल्या या नवीन नियोजनाचे शहरातून स्वागत व कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment