ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचे विकास कुलकर्णी यांना विधान परिषदेवर घ्या - ए जे एफ सी चे संस्थापकीय अध्यक्ष यासिन पटेल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी "
मुंबई ( महादेव माने ) : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधले जाते. या चौथ्या स्तंभाने भारतातील लोकशाही निकोप ठेवली आहे. निकोप लोकशाहीसाठी पत्रकारिता सदैव योगदान देत आली आहे त्यामुळेच महाराष्ट्रातील पत्रकारांचा आवाज बुलंद व्हावा, निकोप राजकारणासाठी पत्रकारांचे शासनात प्रतिनिधित्व असावे याकरिता विद्यमान महाआघाडी सरकारने राज्यातील पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेचे सचिव तथा पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार विकास कुलकर्णी याना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचे संस्थापकीय अध्यक्ष यासिन पटेल यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यपालांकडून लवकरच महाराष्ट्र विधान परिषदेसाठी 12 सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.. राज्यपालांच्या कोट्यातून पत्रकार, विचारवंत, साहित्यिक, कलावंत यांची नियुक्ती व्हावी अशी अपेक्षा आणि परंपरा आहे.. त्याअनुषंगाने पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार श्री विकास कुलकर्णी यांची विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करून पत्रकारांचा प्रतिनिधी विधानपरिषदेत पाठवावा, अशी मागणी ऑल जर्नालिस्टस अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल हे भारतातील पहिले नोंदणीकृत पत्रकार मित्र संघटन असून आजमितीस देशभरात किमान 30 ते 35 हजार पत्रकार या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन योजना, पत्रकारांना देण्यात येणारी अधिस्वीकृती, पत्रकारांवरील होणारे हल्ले अश्या विविध आघाड्यावर शासन दरबारी योग्य तो समन्वय साधून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याकरिता संघटना नेहमीच अग्रभागी राहिली आहे. पत्रकार बांधवांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता संघटनेचे पदाधिकारी सदैव तत्पर असतात त्यामुळेच आज देशभरात असंख्य पत्रकार संघटनेच्या कार्याची धुरा सांभाळताना दिसतात. संस्थेचे विद्यमान केंद्रीय सचिव श्री विकास विजय कुलकर्णी यांचा गेली 35 वर्षे वृतपत्र क्षेत्रातील अनुभव असून त्यांनी दे. केसरी, दे. तरुण भारत (बेळगाव) दे. रत्नागिरी टाईम्स (कोल्हापूर आवृत्ती) दे. जयप्रवास, दे. पुण्यनगरी, अश्या विविध वृत्तपत्रातून तसेच सी.. न्यूज (प्रतिनिधी) ई. टीव्ही. अन्नदाता (सांगली जिल्हा) या वृत्तवाहिण्याकरिता मोलाची कामगिरी केली आहे. सध्या ते सम्पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक मिरज गर्जनाचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा अत्यन्त जवळचा सम्बन्ध असून त्यांचा कातळ नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. नुकतेच त्यांना संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एक लढावू बाण्याचे गुणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेत. तसेच गेली 35 वर्षे पत्रकारितेला वाहून घेतलेल्या,राज्यातील पत्रकार आणि सर्वसामांन्य जनतेचे प्रश्न धसास लावण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सदोदित संघर्ष करणारे पत्रकार, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी, राज्यातील पत्रकारांचे खंबीर नेतृत्व म्हणून श्री विकास कुलकर्णी विधान परिषदेत गेले तर राज्यातील पत्रकारांना आपल्या हक्काचा आमदार मिळेल, त्याबरोबर आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मांडणारा, त्या सोडविण्यासाठी प़ामाणिक प्रयत्न करणारा आमदार जनतेला लाभेल असे ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष श्री यासीन पटेल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अजिंक्य गोवेकर, कार्याध्यक्ष श्री दीपक नागरे, उपाध्यक्ष श्री अतुल होणकळसे, राष्ट्रीय संयोजक श्री आशुभाऊ इंगळे, श्री गणेश गोडसे, श्री समीर कुरेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री महादेव माने, विदर्भ अध्यक्ष श्री नितिन गुंजाळकर, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री राजेश शंकर पाटील यांनी निवेदना द्वारे मा राज्यपाल भरतसिंह कोशारी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment