Monday, July 27, 2020

नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा ; पती उमेश शिंदे यांनी दिली माहिती

कराड
नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांनी  सौम्य लक्षणे दिसून येताच कोविड ची  टेस्ट २२ जुलैला केली व त्याच दिवशी त्या पॉझिटिव्ह आल्याचे दिसून आले .   प्राथमिक लक्षणे दिसताच त्यांनी स्वतःला कुटुंबापासून  आयसोलेट करून घेतले होते.सध्या त्या येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.तेथील सर्व डॉक्टर्स व इतर  स्टाफ नगराध्यक्षांसाहित इतर सर्वच कोव्हीड रुग्णांची व्यवस्थित काळजी घेत आहेत. पहिल्यापेक्षा नगराध्याक्षा सौ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे अशी माहिती त्यांचे पती उमेश शिंदे यांनी दिली .

गेल्या काही दिवसांपासून नगराध्यक्षा सौ.शिंदे या कोरोनाची लागण झाल्याकारणाने त्या येथील कृष्णा हॉस्पिटल येथे ऍडमिट आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यामध्ये सुधारणा होत आहे.
दरम्यान, सध्यस्थीतीला ऍडमिट असतानादेखील त्या   फोनद्वारे सातारा जिल्हाधिकारी, तसेच प्रांताधिकारी यांचे बरोबर कराड शहरातील परिस्थितीबाबत वेळोवेळी सविस्तर चर्चा करीत आहेत.  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके , पालिकेचे इतर अधिकारी यांच्या संपर्कात राहूनदेखील त्या शहरातील सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सध्या कराड शहरात रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने  सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
मी बरी होऊन लवकरच पुन्हा कराडकर जनतेच्या सेवेत नव्या उमेदीने दाखल होईन, असा विश्वासही सौ. शिंदे यांनी व्यक्त  केला आहे.


 नगराध्यांक्षांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी त्याचदिवशी सायंकाळी सौ. रोहीनी शिंदे यांना स्वतः दिली. काळजी करू नका , संपूर्ण कृष्णा परिवार आपल्या पाठीशी आहे व कराडकर जनतेच्या शुभेच्छा आपल्या सोबत आहेत असे सांगून आम्हाला त्यांनी लाखमोलाचा धीरही दिला. डॉ सुरेशबाबा यांनी दाखवलेल्या या आपुलकीबाबत बोलत असताना उमेश शिंदे भावुक झाले होते.

No comments:

Post a Comment