कराड
अतिक्रमनाच्या नावाखाकी शहरातील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान करणारे अशी ओळख निर्माण झालेले येथील पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला असतानाच त्यांना एक वर्ष आणखी मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये व प्रामुख्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.त्यांना शहरवासीयांवर आणखी वर्षभर का लादले जातंय? याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.
मात्र वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून चर्चेत असणाऱ्या डांगे यांची ही मुदतवाढ दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया शहरातून व्यक्त होत आहेत.
तीन वर्षापूर्वी यशवंत डांगे कराड शहराचे मुख्याधिकारी म्हणून येथील पालिकेत रुजू झाले. यापूर्वीचे सी.ओ. विनायक औंधकर यांच्या तडकाफडकी बदलीनंतर डांगे इथे रुजू झाले, मात्र लवकरच त्यांची चर्चा शहराचे नुकसान करणाऱ्या त्यांच्या अनेक एकतर्फी निर्णयाचा परिणाम म्हणून जोरदार होऊ लागली त्यामध्ये अनेक विषयांचा समावेश होतो.
डांगे यांची चर्चा पहिल्यांदा स्वच्छता अभियानात कराडचा पहिला क्रमांक राज्यात आला त्यावेळी खऱ्या अर्थाने झाली, म्हणजे एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे त्यांना शहरातून सन्मान मिळू लागला, मात्र ही क्रेज त्यांना फार काळ टिकवता आली नाही.त्यांचं स्वच्छते बाबतीतील काम चांगले होते त्याबद्दल कोणालाच दुमत असायचे कारण नव्हते, मात्र त्या इमेजचा वापर करत हे डांगे शहरातील प्रश्नावर भम्पकपणे एकतर्फी निर्णय घेत असल्याची चर्चा त्यावेळी होऊ लागली.त्यापैकी त्यांनी शहरातील अतिक्रमणे काढण्याचा जो निर्णय घेतला तो त्यांच्या इथल्या कारकिर्दीतील त्यांना लोकांच्या नजरेत बाद करणारा ठरला,म्हणजे अतिक्रमणे काढलीच पाहिजेत हे जरी बरोबर असलं तरी ती ज्या पद्धतीने काढली व त्यामधून त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांचे जे नुकसान केले त्याची भरपाई आजही व्यापाऱ्यांना द्यायची व्यवस्था या सी ओ नि केलेली दिसत नाही.त्यावेळी व्यापाऱ्यांनाशी चर्चा न करता केलेला हा उपद्व्याप सम्पूर्ण शहर आजही भोगत आहे.हे काम करतानाही त्यांनी येथील बड्या धेंड्यांची अतिक्रमणे तशीच ठेवली ही बाबदेखील डांगे यांचे खर रूप दाखवून गेली. काही नगरसेवक त्यांच्या या भूमिकेविरोधात बोललेले शहराने पाहिले, पण बहुतौनशी नगरसेवक डांगे यांनी अतिक्रमण नावाखाली शहराची दुर्दशा केल्याचे पाहून देखील गप्प बसलेले अनेक पालिका सभेतून दिसले याचा अर्थ काय... घ्यायचा ...अशी आजही चर्चा असते....त्यावेळीदेखील होती...
डांगे यांनी हातगाडी वाल्यांनादेखील दनडेलशाहीने हुसकावून लावले व अद्याप त्यांचा प्रश्न डांगे यांनी सोडवला नसल्याने हातगाडी वाल्यांची कुटुंबे आजही अडचणीत आहेत हे वास्तव आहे.
मात्र,या सर्व घटनांच्या निमित्ताने ढोपराने खणत खणत येथील राजकारणात डांगे यांचा हस्तक्षेप वाढू लागला.येथील एका होणाऱ्या विशेष सभेला डांगे यांनी या सभेला काही नगरसेवक उपस्थित राहणार नाहीत असे सभेपुर्वीच पत्रकारांना सांगून टाकले.याचे सर्वानाच आसचर्य वाटले....डांगे कोणी नेते नाहीत, किंवा गटनेते पण नाहीत... मग नगरसेवकांची भूमिका ते कसे काय सांगू शकतात? हा शहरात चर्चेचा प्रश्न त्यावेळी होता.याचे उत्तर उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचेकडून पत्रकारांना त्यावेळी मिळाले होते.ते म्हणाले हा सी. ओ. आमच्या पार्टीत भांडणे लावतो,पार्टीचा याने इस्कॉट केला आहे आमची पार्टी नक्की कोण चालवतय हेच मला कळेना झालंय... म्हणजे जयवंत पाटील यांनी पालिकेचा कारभार डांगे चालवत असल्याचे पत्रकारांना सुचवून या सी. ओ. चा येथील राजकारणातील हस्तक्षेप उघड केला होता. जयवंत पाटील यांनी डांगेवर वर आणखी एक गँभिर आरोप केला होता, ते म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षण च्या कामांबाबत या सी. ओ. नी अगोदर 80 लाखाची कामे केली आणि नंतर त्यां कामाची टेंडर काढली ...काय म्हणायचे डांगेच्या या कारभाराला...
त्या पुढे जाऊन डांगे यानी कहरच केला.कसलाच अधिकार नसताना लोकांनी निवडून दिलेल्या नगराध्यक्षाना अपात्रतेची नोटीस काढली व स्वतः चे हसू करून घेतले ,एवढंच नाही तर कोरोनाच्या काळात काही अधिकार नसताना शहरातून हे डांगे त्यांना वाटतय म्हणून लॉक डाऊन करायला निघाले होते.जिल्हाधिकाऱ्यांनी झापल्यावर शहाणे झाले आणि गप्प बसले.सोशल मिडियामधून त्यांनी हाईड केलेली काही टेंडर्सही लोकांसमोर नुकतीच आली आहेत. दरम्यान त्यांनी मधल्या लॉक डाऊन काळात देखील अनेक चुका करत आपला शहाणपणा रेटण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे सर्वजण जाणतात. कोरोना पेशंट चालवत हॉस्पिटल मध्ये नेण्यात आला. त्यावेळी कामावर रुजू असनाऱ्या डॉक्टरवर जरी हे प्रकरण शेकवले गेले असले तरी डांगे यांनी पेशंट चालवत आंणण्याबाबत परवानगी दिली होती... याची चर्चाही त्यावेळी जोरदार झाली.
शहरातील अनेक प्रश्न त्यांनी मुद्दामून सोडवले नाहीत अशी चर्चा असते त्यामध्ये प्रामुख्याने,रस्त्यातील अनेक ठिकाणी असलेले खड्डे,पाण्याची अनेक ठिकाणची असलेली बॉम्ब,24 तास पाण्याची रखडलेली योजना, कितीतरी न झालेली यांच्या तीन वर्षातील कामे सांगता येतील...मग डांगे यांनी केलं काय...हा प्रश्न शहरवासीय विचारतायत... यांनी फक्त एकच केलं...ज्या कामावर बक्षीस मिळत आहेत ती कामे जाहिरात बाजी करून केली, आणि ती मी केली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली...अहो...पण शहराचे मूलभूत प्रश्न तसेच राहिले...ते कधी सोडवणार ..त्याच्यावर बक्षीस लावल्यावर का? अशी डांगे बाबत नेहमी गावात चर्चा असते...,असल्या बेजबाबदार आणि भम्पक मुख्याधिकार्याचा तीन वर्षांचा कार्यकाल संपल्याचे कळताच कराडातील व्यापाऱ्यांनी व शहरवासीयांनी खरतर आपसात आनंद व्यक्त केला, मात्र शहर वासीयांचा हा आनंद फार काळ टिकला नाही,कारण याच डांगे याना अजून एक वर्ष कराड शहराचे मुख्याधिकारी म्हणून पुन्हा लादण्यात आले आहे. त्यामुळे आणखी एक वर्ष त्यांच्या बारा भानगडी छापण्याचा योग्य आम्हाला पत्रकार म्हणून आला असला तरी जनतेत मात्र नाराजी पसरल्याचे दिसते आहे.

No comments:
Post a Comment