Thursday, July 30, 2020

कराडचे नूतन मुख्याधिकारी कोरोनाशी लढण्यासाठी उतरले ग्राउंडवर ; पालिका कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बजावत आहेत कर्तव्य...

कराड
येथील नूतन मुख्याधिकर्यांचा आपले कर्तव्य पार पाडण्याचा धडाका जोमाने सुरू असल्याचे चित्र सध्या शहरात दिसते आहे.दोन दिवसांपूर्वी पालिका कर्मचार्यांबरोबर उपस्थित राहून औषध फवारणी करून घेतल्याची घटना ताजी असतानाच त्यांनी आज येथील स्मशान भूमीत एका मृतदेहाला दहन देण्याकरिता कर्मचार्यांसंमवेत स्वतः हजर राहून आपल्या बांधिलकीचे दर्शन सम्पूर्ण शहराला दिले आहे.म्हणूनच भम्पक मुख्याधिकारी गेले आणि समजूतदार आले अशी चर्चा व्यापाऱ्यांसह शहरात सुरु आहे
चक्क कोरोना पेशंटला चालवत आणण्याची परवानगी देण्याबाबत चर्चेत राहीलेले वादग्रस्त मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची उचल बांगडी होऊन अजून आठवडा होत नाही तोच त्यांच्या जागी आलेल्या रमाकांत डाके यांनी आपल्या वेगळेपणाची चुणूक दाखवायला सुरुवात केली आहे.ज्या पदावर आपण काम करतो त्याची जबाबदारी काय?याचे भान त्यांना असल्याचे दिसते.त्यांनी येथील चार्ज ज्या दिवशी घेतला त्याच दिवशी शहरातून फेरफटका मारला व शहराची माहिती घेतली.त्यानंतर पालिकेतील आपल्या दालनात हजर राहून शहर वासीयांच्या शुभेच्छा त्यांनी स्वीकारल्या.त्यानंतर येथील लोकप्रतिनिधींची गाठभेट घेऊन महत्वाच्या चर्चा केल्या,आणि आपल्या कामाला लागले. सर्वप्रथम त्यांनी शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याचे पाउल म्हणून सम्पूर्ण शहर सॅनिटायझ करण्याबाबत निर्णय घेतला. आठवड्यातून दोनदा सम्पूर्ण शहर सॅनिटायझ होईल असे त्यांनी सांगिलते. स्वतः पालिका कर्मचार्यांबरोबर हजर राहून त्यांनी येथील आंबेडकर चौक,बिचकर हॉस्पिटल परिसरं या ठिकाणी औषध फवारणी करून घेतली.येथील मंगळवार पेठेतील एक वृद्ध महिलेचे नुकतेच निधन झाले. त्यापाश्र्वभूमीवर पालिका कर्मचार्यांबरोबर स्वतः पीपीई किट घालून मुख्याधिकारी स्मशानभूमीत त्या मृतदेहावर होणाऱ्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले.त्यांच्या एकूणच काम करण्याच्या पद्धतीवरून ते ग्राऊंडवर काम करणारे अधिकारी असल्याचे जाणवते.त्यांच्या कामाच्या या धडाक्याने शहराला आता चांगला मुख्याधिकारी मिळाल्याचे व भम्पक अधिकारी येथून गेल्याचे समाधान मिळत असल्याची शहरासह व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे.

No comments:

Post a Comment