Friday, February 27, 2026

कराड पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत विरोधी नेते वाटेगावकर व सत्ताधारी यांच्यात खडाजंगी ; नगरसेवक शिकलगार आणि वाटेगावकर एकमेकांना भिडले;

वेध माझा ऑनलाइन।
काल शुक्रवारी कराड पालिकेची अर्थसंकल्पीय सभा कराडच्या प्रीतिसंगम येथे स्व चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी पार पडली यावेळी सत्ताधारी व विरोधक (भाजप)  नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली वाटेगावकर व अल्ताफ शिकलगार यांच्यात यावेळी
जोरदार शाब्दिक चकमक झाली 
दरम्यान 314 कोटींचा हा अर्थसंकल्प यावेळी बहुमताने मंजूर करण्यात आला
दरम्यान या सभेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला पण माझा आवाज हे  लोक कधीच दाबू शकणार नाहीत असेही वाटेगावकर या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले

दरम्यान या अर्थसंकल्पाला विरोधीपक्ष नेते विजय वाटेगावकर यांनी भर सभेत "बोगस'  म्हटले याचा धागा पकडत नगरसेवक अल्ताफ शिकलगार आणि वाटेगावकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली
यावेळी शिकलगार मधेच उठून बोलले की
एकीकडे आम्ही सहकार्य करू असे म्हणायचे आणि दुसरीकडे चुका दाखवायच्या आणि अर्थसंकल्प बोगस असल्याचे बोलायचे आम्हाला मूर्ख समजायच चाललंय का?  

यावर उत्तर देताना वाटेगावकर म्हणाले
आम्हाला जनतेने सत्ताधारी लोकांना प्रश्न विचारायलाच पालिकेत निवडून पाठवले आहे आम्ही तुम्हा सत्ताधार्यांना प्रश्न नाही विचारायचा... तर मग कोणाला विचारायचा? असे म्हणत हा अर्थसंकल्प व आकडेवारी बोगस असल्याचा पुनरुच्चार पुन्हा 2 ते 3 वेळ यावेळी केला यावरून सत्ताधारी व वाटेगावकर यांच्यात जोरदार खडाजंगी पहायला मिळाली 

या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी नेते  वाटेगावकर म्हणाले...
हा अर्थसंकल्प व आकडेवारी बोगस वाटते त्यामुळे  आम्ही सुचवलेले बदल त्यात झाले पाहिजेत... तसेच आमच्या पार्टी च्या इतर नगरसेवकांनी सांगितलेल्या सूचनांनुसार त्यामधून बदलदेखील केले गेले पाहिजेत... आणि आम्हाला ते दाखवुनच हे बजेट पुढे पाठवले जावे असे आम्ही सत्ताधार्यांना सांगितले आहे... 
या सभेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला पण माझा आवाज हे  लोक कधीच दाबू शकणार नाहीत असेही ते या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले
लोकहितासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ शहरातील लोकांचे नुकसान होऊ देणार नाही
असेही त्यांनी स्पष्ट केले
या सभेबाबत मी वारंवार माहिती मागत होतो पण आम्हाला या सभेबाबत  माहिती दिली नाही तर फक्त सभेपुर्वीची नोटीसच दिली गेली आम्हीदेखील नगरसेवक आहोत त्यामुळे आम्हालाही याबाबत कल्पना देणे, विश्वासात घेणे गरजेचे होते असेही वाटेगावकर यावेळी म्हणाले
दरम्यान भाजपच्या शिवाजी पवार अजय पावसकर व दिग्विजय डूबल या तिघांनी देखील सत्ताधार्यांना प्रश्न विचारले आणि पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी काही सूचना देखील केल्या तसेच शिकलगार आणि वाटेगावकर यांच्यातील झालेल्या बाचाबाचीवेळी  वाटेगावकर यांच्या बाजूने भाजपचे हेच तिघे खंबीरपणे बोलताना दिसले 

तर शिकलगार यांच्या बाजूने सत्ताधारी नगरसेवक उभे राहिलेले दिसले 
दरम्यान शिकलगार आणि वाटेगावकर यांच्यातील झालेल्या या वादावादीची सध्या  जोरदार चर्चा सुरू आहे

Thursday, February 26, 2026

कराड दक्षिणमधील १३५ भजनी मंडळांना ३३.७५ लाखांचे अनुदान मंजूर : आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचे विशेष प्रयत्न;

वेध माझा ऑनलाइन।
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील तब्बल १३५ भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ३३ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. राज्याज्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम लवकरच भजनी मंडळांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. 
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना अनुदान दिले जाते. भाजपा-महायुती सरकारने गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून दर्जा देण्यात आला आहे. याअंतर्गत भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली होती. 

त्यानुसार कराड दक्षिणमधील जास्तीत जास्त भजनी मंडळांना या अनुदानाचा लाभ मिळावा, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विशेष मोहिम राबवित भजनी मंडळांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी प्रयत्न केले. या माध्यमातून नोंदविण्यात आलेल्या कराड दक्षिणमधील तब्बल १३५ भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ३३ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. लाभार्थी भजनी मंडळांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या अनुदानामुळे भजनी मंडळांना आवश्यक साहित्य खरेदीस मोठी मदत होणार असून, ग्रामीण भागातील सांस्कृतिक परंपरा आणि वारकरी संप्रदायाची परंपरा अधिक बळकट होण्यास हातभार लागणार आहे. या निर्णयाबद्दल कराड दक्षिणमधील सर्व भजनी मंडळांच्यावतीने आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.


Wednesday, February 25, 2026

अपक्ष नगरसेविका तेजश्री पाटसकर यांना कराड पालिकेत स्वतंत्र केबिन ; विकासकामांना गती देण्याचा नगरसेविका सौ पाटसकर यांचा निर्धार :

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आलेल्या अपक्ष नगरसेविका सौ. तेजश्री सुदर्शन पाटसकर यांच्या पालिकेतील स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे आणि तत्परतेने सोडविण्याच्या उद्देशाने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

या कार्यालयाचे उद्घाटन सौ. आशा विष्णू पाटसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विजयसिंह यादव, नगरसेवक जयंतकाका पाटील, विष्णुकाका पाटसकर, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर तसेच लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीचे सर्व नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास स्थानिक कार्यकर्ते, नागरिक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नगरसेविका तेजश्री पाटसकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, प्रकाशयोजना यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी बोलताना नगरसेविका तेजश्री पाटसकर यांनी सांगितले की, “ जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी व विकासकामांना गती देण्यासाठी हे स्वतंत्र कार्यालय महत्त्वपूर्ण ठरेल. नागरिकांनी कोणत्याही समस्येसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.”
नवीन कार्यालयामुळे प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिकांना त्यांच्या प्रश्नांसाठी थेट प्रतिनिधींशी संपर्क साधणे सुलभ होणार असून प्रशासनाशी समन्वय अधिक प्रभावीपणे साधता येणार आहे. त्यामुळे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

आमदार डॉ अतुलबाबांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सभागृहासमोर मांडत वेधले संपूर्ण राज्याचे लक्ष :

वेध माझा ऑनलाइन।
कराड तालुक्यातील खोडशी बंधाऱ्याच्या पायथ्याशी नवीन रिटेन्ड बंधारा उभारण्याचे गेली ४१ वर्षे सुरु आहे. आत्तापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित २० टक्के काम अद्याप अपूर्ण आहे. दरम्यान, या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याने, हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहत आहे. त्यामुळे खोडशी बंधाऱ्याच्या उर्वरित २० टक्के कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची गरज भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत अधोरेखित केली. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेनशात राज्यपालांच्या अभिभाषणावर ते बोलत होते. तालिका अध्यक्षपदी आ. समाधान आवताडे होते. 

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आ.डॉ. भोसले यांनी राज्य सरकारच्या प्रगतीशील वाटचालीचे कौतुक करत, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सभागृहासमोर मांडत, या प्रश्नांकडे राज्याचे लक्ष वेधून घेतले. 

आ. डॉ. भोसले म्हणाले, कराड तालुक्यात १८६७ साली ब्रिटिश काळात उभारण्यात आलेला खोडशी बंधारा आजही कार्यरत आहे. हा बंधारा कृष्णा नदी परिसरात असून त्याच्याशी संलग्न ८७ किलोमीटर लांबीचा कृष्णा कालवा कराड, वाळवा, पलूस आणि तासगाव या चार तालुक्यांना पाणीपुरवठा करतो. या कालव्याच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांची शेती हिरवीगार राहते. या बंधाऱ्याच्या पायथ्याशी १९८५ साली नवीन रिटेन्ड बंधारा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या ४१ वर्षांच्या कालावधीत याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित २० टक्के काम अद्याप अपूर्ण आहे. या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याने, हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहत आहे. त्यामुळे उर्वरित २० टक्के कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची गरज आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने राबवल्यास सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचा सर्वांगीण विकास 
पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारे महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून कराडची ओळख आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक, औद्योगिक मालवाहतूक आणि ग्रामीण भागातील दैनंदिन ये-जा यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक वाढले आहे. शहरातील मुख्य मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी स्वतंत्र ‘नेकलेस रोड’ची मागणी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुन्हा एकदा सभागृहासमोर आग्रहाने मांडली. याअंतर्गत कृष्णा–कोयना प्रीतिसंगम परिसरातील स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचा सर्वांगीण विकास, पूरसंरक्षण भिंत, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट या प्रकल्पांना तातडीने प्रशासकीय मान्यता व आवश्यक निधी देण्याची आग्रही मांडणी त्यांनी केली. या प्रकल्पांमुळे केवळ वाहतूक कोंडी कमी होणार नाही, तर शहरातील व्यवसाय वाढेल, पर्यटनाला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती होईल आणि कराडची अर्थव्यवस्था अधिक सक्षम बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

येवती-म्हासोली प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईनवर भर
येवती-म्हासोली मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचा उल्लेख करत आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले की, या योजनेतून पाण्याची विल्हेवाट योग्यप्रकारे होत नाही. पर्यायाने शेवटच्या टोकावरील गावांपर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचत नाही. या पार्श्वभूमीवर बंदिस्त पाईपलाईन व्यवस्था राबविणे अत्यावश्यक असल्याचे सांगून, यामुळे पाण्याची गळती जवळपास शून्यावर येईल. शेवटच्या शेतापर्यंत समान दाबाने पाणी पोहोचेल, वितरणावर नियंत्रण राहील तसेच विजेचा व देखभालीचा खर्च कमी होईल. या प्रकल्पासाठी बंदिस्त पाईपलाईन योजनेस तातडीने मान्यता देऊन टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

मलकापूर नगरपालिकेची प्रशासकीय इमारत पूर्ण करण्याची मागणी
मलकापूर शहरातील अपूर्ण प्रशासकीय इमारतीचा प्रश्न कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सभागृहात उपस्थित केला. गेली सात वर्षे निधीअभावी ही इमारत अपूर्ण अवस्थेत आहे. अत्यल्प आणि किरकोळ काम बाकी असताना केवळ निधीअभावी हा प्रकल्प रखडलेला आहे, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. हा निधी तातडीने उपलब्ध झाल्यास मलकापूर शहराला एक सुसज्ज प्रशासकीय मुख्यालय मिळू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले. विविध विभाग एकाच छताखाली कार्यरत राहिल्यास प्रशासन अधिक कार्यक्षम, वेगवान आणि पारदर्शक बनेल. ही इमारत पूर्ण करताना या परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक तसेच हरित पट्टा व सुशोभीकरण करण्याचा प्रस्तावही त्यांनी सुचवला.

१० हजार घरांना सूर्यघर योजनेचा लाभ मिळवून देणार
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीबाबत आग्रही मांडणी करताना आ.डॉ. भोसले म्हणाले, कराड दक्षिणमध्ये आतापर्यंत १००० घरांवर ही योजना यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १ ते ३ किलोवॅटपर्यंत सोलर पॅनल बसवण्याची सुविधा असून, शासनाकडून १ किलोवॅटसाठी सुमारे २६ हजार आणि ३ किलोवॅटसाठी सुमारे ७८ हजार इतके अनुदान दिले जाते. सुरुवातीला नागरिकांना यासाठी १.७० ते १.८० लाखांपर्यंत खर्च येत होता. पण आम्ही आमच्या मतदारसंघात पुढाकार घेऊन, बँकेची हमी उपलब्ध करून देत ३ किलोवॅट संचाची किंमत १.०५ लाखांपर्यंत खाली आणली. ज्यामुळे शासनाच्या ७८ हजार रुपयांच्या अनुदानानंतर नागरिकांना फक्त २७ हजार रुपयांत या योजनेचा लाभ घेणे शक्य झाले असून, या उपक्रमामुळे अनेक घरांचे वीजबिल शून्यावर आले आहे. कराड दक्षिणमध्ये येत्या वर्षभरात १० हजार घरांना या योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचे आ.डॉ. भोसले सांगितले. 

अतुलबाबांची आणखी महत्वाची मागणी;
सोलर पॅनल बसविण्यासाठी अलीकडील शासन निर्णयानुसार “जितकी गरज तितकाच किलोवॅट” अशी अट घालण्यात आल्याचे आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पूर्वी ३ किलोवॅटपर्यंत परवानगी असल्याने भविष्यातील वाढती वीज गरज लक्षात घेऊन नागरिक जास्त क्षमतेचा संच बसवत होते. नवीन नियमामुळे भविष्यात अतिरिक्त खर्चाचा बोजा पडू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ३ किलोवॅटपर्यंतचा पूर्वीचा पर्याय कायम ठेवण्यासाठी शासनाने सकारात्मक पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.


बारामती विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड : अजित पवार यांच्या निधनानंतर आता होणार पोटनिवडणूक : या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती आली समोर : काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
बारामती विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. दीर्घकाळ मतदारसंघाचे नेतृत्व करणारे अजित पवार यांच्या निधनानंतर आता पोटनिवडणूक होणार असून, या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी  सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी देण्यावर एकमत झाल्याची चर्चा आहे. सध्या त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. त्यामुळेच बारामतीतून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार असल्याचे म्हणणे आहे.
बारामती मतदारसंघ हा अनेक वर्षे अजित पवार  यांच्या नेतृत्वाखाली राहिला. त्यांच्या काळात विविध विकासकामे झाल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. आता त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाची पुढील रणनीती काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
या पोटनिवडणुकीबाबत आणखी एक मोठी शक्यता व्यक्त केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. प्रारूप मतदारयादी 10 मार्च रोजी जाहीर होणार असून, त्यानंतर निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते.

दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा करून अंतिम भूमिका जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रत्यक्ष लढत होणार की बिनविरोध पार पडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेत संधी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी काही दिवसांत बारामतीच्या राजकारणात आणखी घडामोडी होण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यात बँका एकूण किती दिवस राहणार बंद ? ; काय आहे कारण?

वेध माझा ऑनलाइन।

आर्थिक वर्ष 2025-26 संपण्याच्या उंबरठ्यावर असताना मार्च महिना काही दिवसांवर आला आहे. या काळात बँकांमध्ये व्यवहारांची मोठी गर्दी असते. मात्र सण आणि सार्वजनिक उत्सवांमुळे देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आर्थिक कामांचे नियोजन आधीच करणे आवश्यक ठरणार आहे.

 RBI ने जाहीर केलेल्या अधिकृत कॅलेंडरनुसार मार्च 2026 मध्ये विविध राज्यांमध्ये सण-उत्सवांमुळे बँकांना सुट्ट्या असतील. या सुट्ट्या सर्व राज्यांत समान नसून स्थानिक सणांनुसार बदलतात. काही दिवशी देशभर बँका बंद राहतील, तर काही ठिकाणीच कामकाज थांबेल. 1 मार्च रोजी रविवार असल्याने देशातील सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. 2 मार्चला होलिका दहनानिमित्त अनेक राज्यांत कामकाज बंद राहील, तर 3 मार्चला धुलिवंदनामुळे व्यवहार होणार नाहीत. 4 मार्चला होळीच्या दुसऱ्या दिवशी नवी दिल्ली, चंदीगड, कानपूर आणि अहमदाबादसह काही शहरांमध्ये बँका बंद असतील. 13 मार्चला चपचार कुटमुळे ऐझवालमध्ये सुट्टी जाहीर आहे.17 मार्चला शब-ए-कद्र निमित्त काही राज्यांत बँक सेवा उपलब्ध राहणार नाही. 19 मार्चला गुढीपाडवा, तेलगू नववर्ष आणि पहिली नवरात्री असल्याने महाराष्ट्र, नागपूर, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद येथे बँका बंद राहतील. 20 मार्चला ईद-उल-फित्र (रमजान) आणि जुमात-उल-विदा निमित्त जम्मू, श्रीनगर आणि केरळमध्ये सुट्टी असेल. 21 मार्चला रमजान-ईदनिमित्त देशभर सुट्टी असण्याची शक्यता वर्तवली आहे. 26 मार्चला रामनवमीमुळे अनेक राज्यांत कामकाज थांबेल, तर 27 मार्चला रामनवमीच्या उत्तरार्धात भोपाळ, पाटणा आणि भुवनेश्वरमध्ये बँका बंद असतील. 31 मार्चला महावीर जयंतीनिमित्त नवी दिल्ली, मुंबई (बेलापूर), जयपूर आणि कानपूर येथे बँका बंद राहतील.

आरबीआयच्या नियमांनुसार सर्व सुट्ट्या प्रत्येक राज्यात लागू होत नाहीत. स्थानिक सणांनुसार सुट्टीची अंमलबजावणी केली जाते. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टनुसार या सुट्टीच्या दिवशी चेक क्लिअरिंग, ओव्हर-द-काउंटर व्यवहार, रोख रक्कम भरणे किंवा काढणे यांसारखी कामे करता येणार नाहीत. त्यामुळे महत्त्वाचे व्यवहार वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे . शाखा बंद असल्या तरी डिजिटल सेवा सुरळीत सुरू राहतील. नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि यूपीआयद्वारे पैशांची देवाणघेवाण करता येईल. बँकेचे अधिकृत अॅप नेहमीप्रमाणे कार्यरत असेल. रोख रकमेची गरज असल्यास एटीएममधून पैसे काढता येतील, तसेच सीडीएमच्या माध्यमातून रोख जमा करता येईल. कोणत्याही अनपेक्षित बदलांसाठी बँकेकडून येणाऱ्या सूचनांवर आणि संदेशांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

उद्योगपती अनिल अंबानींना ईडी चा झटका ; 3 हजार कोटीचे घर केले जप्त ;

वेध माझा ऑनलाईन।
मुंबईतून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या निवासस्थानावर ईडीने कारवाई केली आहे. ‘Abode’ नावाच्या आलिशान घरावर तात्पुरती जप्तीची प्रक्रिया राबवण्यात आली असून, या मालमत्तेची किंमत हजारो कोटींमध्ये असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार या संपत्तीचे अंदाजित मूल्य सुमारे 3,716 कोटी रुपये आहे. ही कारवाई आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासाच्या अनुषंगाने करण्यात आल्याचे सांगितले जाते.
ईडीच्या माहितीनुसार, अनिल अंबानी आणि त्यांच्या उद्योग समूहाशी संबंधित कंपन्यांविरुद्ध आतापर्यंत 15,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई झाली आहे. संबंधित प्रकरणांच्या तपासाचा भाग म्हणून विविध मालमत्तांवर ही प्रक्रिया राबवण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या कारवाईपूर्वी सोमवारी मुंबई हाय कोर्ट नेही संबंधित प्रकरणात महत्त्वाचा आदेश दिला होता. न्यायालयाने एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला अंतरिम आदेश रद्द केला. यापूर्वी  च्या बँक खात्यांना ‘फसवे’ म्हणून वर्गीकृत करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.

मात्र उच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशानंतर ती स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांना पुढील कारवाईसाठी मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व घडामोडींमुळे उद्योगक्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून, पुढील कायदेशीर पावले काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


यशवन्त बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना अटक ; न्यायालयाने सुनावली 6 दिवसाची पोलीस कोठडी ;

वेध माझा ऑनलाइन।
अंदाजे 112 कोटीचा आर्थिक घोटाळा झालेल्या कराडच्या यशवन्त बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर याना आज सातारा गुन्हे अनवेशन शाखेने अटक केली 
न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे
शेखर चरेगावकर हे यशवन्त बँकेचे अध्यक्ष म्हणून सुरुवातीला कार्यरत होते आजपर्यंत या बँकेत 112 कोटीहून अधिक रुपयेचा घोटाळा झाल्याचे बोलले गेले 
दरम्यान हा घोटाळा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चेचा झाला होता 
मधल्या काळात या प्रकरणी बँकेच्या फलटण शाखेवर तसेच चरेगावकर यांच्या कराडच्या बंगल्यावर धाडी पडल्या होत्या 
चरेगावकर तेव्हापासून फरार असल्याच्या शहरात चर्चा सुरू होत्या 
आज विंग गावातून त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे
त्यांना 2 मार्च पर्यंत म्हणजेच 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

Tuesday, February 24, 2026

"केरळ' चे नाव बदलले - केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय- केरळ आता कोणत्या नावाने ओळखले जाणार ?

वेध माझा ऑनलाईन।
केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत केरळ राज्याचे अधिकृत नाव बदलण्यास मंजुरी दिली आहे. यापुढे हे राज्य “केरळम” या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य विधानसभेने मंजूर केलेला ठराव केंद्राकडे पाठवण्यात आला होता आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या नावबदलाला औपचारिक मान्यता मिळाली आहे.
केरळ विधानसभेने 24 जून 2024 रोजी एकमताने ठराव मंजूर करत राज्याचे नाव “केरळ” वरून “केरळम” असे करण्याची शिफारस केली होती. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्येही असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाने काही तांत्रिक बाबींचा उल्लेख करत सुधारणा सुचवल्या होत्या.त्या सूचनांनुसार सुधारित ठराव पुन्हा मंजूर करून केंद्राकडे पाठवण्यात आला. मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय जाहीर झाला. राज्याच्या सांस्कृतिक आणि भाषिक ओळखीचा सन्मान राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी राज्याचे मूळ आणि स्थानिक उच्चार प्रतिबिंबित करणारे “केरळम” हे नाव अधिकृत करण्याचा प्रस्ताव मांडला होता. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव “केरळम” असे नमूद व्हावे, अशी त्यांची भूमिका होती. स्थानिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करण्यासाठी नावबदल आवश्यक असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. 

विधान परिषदेत राडा ! प्रज्ञा सातव यांचा राजीनामा;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत प्रज्ञा राजीव सातव  यांच्या राजीनाम्याचा मुद्दा गाजला. काँग्रेसकडून निवडून आलेल्या आणि अजून तीन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत त्या भारतीय जनता पक्षात आल्या आहेत.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे  यांनी सभागृहाला सातव यांच्या राजीनाम्याची माहिती दिल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे  यांनी राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण मागितले. कार्यकाळ उर्वरित असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामागील कारणांबाबत त्यांनी शंका उपस्थित केल्या.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच हा मुद्दा पुढे आला. त्यावर उत्तर देताना सभापतींनी सातव यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा त्याग केल्याचे सांगितले. अधिक तपशील जाणून घ्यायचा असल्यास खासगीत भेटण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मात्र या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही आणि काही काळ सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली
विरोधी पक्षनेते पदाची निवड होऊ नये म्हणून सातव यांना राजीनामा देण्यास भाग पाडले का, असा थेट सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला. त्यांच्या सुरात शशिकांत शिंदे यांनीही प्रश्नांची सरबत्ती केली. सातव यांच्यावर कोणताही राजकीय दबाव होता का, याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी करण्यात आली.

या सर्व प्रश्नांवर सभापती राम शिंदे  यांनी आक्षेप नोंदवत सांगितले की, राजीनामा दिल्यानंतर अडीच महिने उलटून गेल्यावर हरकती घेणे योग्य नाही. त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून आलेल्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांनी १८ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्याकडे राजीनामा सादर केला होता आणि तो त्यांनी आपल्या अधिकारक्षेत्रात स्वीकारला आहे. विरोधकांनी पुन्हा आक्षेप घेतल्यानंतर सभापतींनी स्मितहास्य करत खासगीत भेटल्यास अधिक माहिती देण्याचे सांगितले.
महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत प्रज्ञा राजीव सातव यांच्या राजीनाम्याचा मुद्दा गाजला. काँग्रेसकडून निवडून आलेल्या आणि अजून तीन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राजीनाम्यावरून सभागृहात सवाल-जवाब :
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (यांनी सभागृहाला सातव यांच्या राजीनाम्याची माहिती दिल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण मागितले. कार्यकाळ उर्वरित असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामागील कारणांबाबत त्यांनी शंका उपस्थित केल्या.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच हा मुद्दा पुढे आला. त्यावर उत्तर देताना सभापतींनी सातव यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा त्याग केल्याचे सांगितले. अधिक तपशील जाणून घ्यायचा असल्यास खासगीत भेटण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मात्र या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही आणि काही काळ सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

Pradnya Satav | दबावाचा आरोप आणि सभापतींचे स्पष्टीकरण :
विरोधी पक्षनेते पदाची निवड होऊ नये म्हणून सातव यांना राजीनामा देण्यास भाग पाडले का, असा थेट सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला. त्यांच्या सुरात शशिकांत शिंदे यांनीही प्रश्नांची सरबत्ती केली. सातव यांच्यावर कोणताही राजकीय दबाव होता का, याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी करण्यात आली.

या सर्व प्रश्नांवर सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी आक्षेप नोंदवत सांगितले की, राजीनामा दिल्यानंतर अडीच महिने उलटून गेल्यावर हरकती घेणे योग्य नाही. त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून आलेल्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांनी १८ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्याकडे राजीनामा सादर केला होता आणि तो त्यांनी आपल्या अधिकारक्षेत्रात स्वीकारला आहे. विरोधकांनी पुन्हा आक्षेप घेतल्यानंतर सभापतींनी स्मितहास्य करत खासगीत भेटल्यास अधिक माहिती देण्याचे सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता अखेर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागला आहे. ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील महिलांसाठी राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता अखेर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागला आहे. अनेक दिवस प्रतीक्षा केल्यानंतर महिलांना दिलासा मिळाला असून आता पुढील हप्त्याबाबत उत्सुकता वाढली आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  राज्य सरकारने महिलांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला. जानेवारी महिन्याची आर्थिक मदत लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील पात्र महिलांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला.
या निधीसाठी सामाजिक न्याय विभागाने 18 फेब्रुवारी रोजी महिला व बालविकास विभागाकडे तब्बल 98 कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला होता. ही रक्कम प्राप्त होताच लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ते जमा करण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात आली. यापूर्वी डिसेंबर 2025 चा हप्ता जानेवारी महिन्यात जमा करण्यात आला होता, तर आता जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या अखेरीस वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, फेब्रुवारी महिना संपण्यास अवघे चार दिवस उरले असतानाही या महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांकडून पुढील हप्त्याबाबत चौकशी सुरू आहे.
सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची केल्यानंतर अनेक लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. काही महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही योजना जुलै 2024 पासून सुरू असून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. पात्रतेच्या निकषात बसत नसलेल्या आणि ई-केवायसीत अपात्र ठरलेल्या महिलांना यादीतून वगळण्यात आले आहे.

रामकृष्ण वेताळ पुन्हा भाजप किसान मोर्च्याच्या अध्यक्षपदी विराजमान ;

वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे रामकृष्ण वेताळ यांच्यावर जिल्हा कार्यालयातून पुढील पाच वर्षासाठी हकालपट्टी केल्याचे पत्र काढण्यात आले होते. मात्र अवघ्या एका महिन्यातच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रामकृष्ण वेताळ यांना किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी स्थान दिले आहे. त्यामुळे भाजपकडून वेताळ यांचा पुन्हा सन्मान झाला आहे
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षात जिल्हा परिषद निवडणुकीत अंतर्गत धूसफूस पाहायला मिळाली. या मतदारसंघातील कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी विद्या वेताळ यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे विद्या वेताळ यांनी आपला अपक्ष अर्ज भरला होता. विद्या वेताळ यांना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आव्हान होते. मात्र रामकृष्ण वेताळ यांच्या झंजावाता पुढे आणि त्यांच्या रणनीतीमुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा पराभव केला. विद्या वेताळ अपक्ष बाजी मारणाऱ्या सातारा जिल्ह्यातून एकमेव उमेदवार ठरल्या आहेत.
पत्नी विद्या वेताळ यांच्या विजयानंतर रामकृष्ण वेताळ कोणता निर्णय घेणार याकडे राजकीय पक्षांचे व नेत्यांचे लक्ष लागून होते. भाजपा कडून अन्याय झाल्याच्या भावनेतून रामकृष्ण वेताळ शिवसेना किंवा अन्य पर्याय सोबत येतील असे सांगितले जात होते. परंतु  आज भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रामकृष्ण वेताळ यांना किसान मोर्चाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा बहुमान करत पुन्हा पक्षात सामील केले आहे.


Monday, February 23, 2026

भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर ; शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी व्याही अरूण लखानी या कार्यकारणीत सह कोषाध्यक्ष असतील :

वेध माझा ऑनलाईन।
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी व्याही अरूण लखानी यांची सुद्धा वर्णी लागली आहे. लखानी हे प्रदेश कार्यकारिणीत सह कोषाध्यक्ष असतील. तर या बहुप्रतिक्षित प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहर्‍यांना सुद्धा संधी मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचे व्याही अरूण लखानी सह कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील

भाजप प्रदेश कार्यकारिणीत खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरूण लखानी यांची वर्णी लागली आहे. त्यांना सह कोषाध्यक्ष पद देण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचे लग्न सारंग अरुण लखानी यांच्यासोबत निश्चित झाले आहे. 
सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि पुढे सुप्रिया सुळे यांनी याविषयीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरूण लखानी हे आहेत. ते मूळचे नागपूरचे आहेत. रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात सार्वजनिक-खासगी भागीदारी PPP प्रकल्पांसह इतर अनेक उद्योगात हा समूह आघाडीवर आहे.


संजय राऊत म्हणतात ...भाजप पक्ष नाही, छळ छावणी आहे ! त्याचे बळी दादा ;एकनाथ शिंदे पून्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत ; आणखी काय म्हणाले राऊत ?

वेध माझा ऑनलाइन ।
संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका करत त्याला पक्ष नसून छळ छावणी असे संबोधले आहे. त्यांच्या मते, अजित पवार हे या छळ छावणीचे बळी आहेत. राऊत यांनी हिटलरच्या छळ छावण्यांची उपमा देत भाजपच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

ते म्हणाले की, 
जसे हिटलरने आपल्या विरोधकांसाठी छळ छावण्या निर्माण केल्या होत्या, तशाच प्रकारची ही भाजपची छळ छावणी आहे.
राऊत यांनी दावा केला की, अजित पवार हे महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री झाले असते. छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांच्यासारखे नेतेही महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम होते, असे त्यांनी अधोरेखित केले. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना राऊत यांनी म्हटले की, शिंदे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल, काही काळ वाट पहावी लागेल आणि त्यानंतरच त्यांना कदाचित नव्याने उमेदवारी करावी लागेल. हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.

कराडमध्ये शिवसेनेने राहुल गांधींच्या प्रतिमेला जोड्याने मारले ;

वेध माझा ऑनलाइन।
नवी दिल्ली येथे समिट भारत मंडपम येथे जगातील  अनेक प्रतिनिधी उपस्थित असताना भारताचे पंतप्रधान भारताची बाजू मांडत होते त्यावेळी राहुल गांधी अर्धनग्न अवस्थेत त्याठिकाणी आपल्या समर्थकांसह आंदोलनाचा फॅशन शो करत आले व भारताची बाजू अन्य देशांपूढे एकप्रकारे मलिन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे राहुल गांधींचा कराडमध्ये शिवसेनेच्या वतीने त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला

यावेळी महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या  नेत्या सुलोचना पवार,  शहर अध्यक्ष राजेंद्र माने,उप शहर प्रमुख संदीप थोरवडे, शिवउद्योग सेनेचे जिल्ह्याचे नेते प्रमोद वेरणेकर, उपशहर प्रमुख  राजू खराडे, तसेच महिला नेत्या संध्याताई दाभाडे, गायत्रीताई पाठक, मोनिकाताई पवार,मलकापूर अध्यक्ष विद्याताई घाडगे,अरिफाताई मुजावर,सीमाताई साळुंखे,विजयालक्ष्मी चावडीमनी,तसेच अनिललोंढे, महेश काळे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते

ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा मनोज जरांगे-पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल ; गृह विभागाने लक्ष देण्याची केली मागणी ; चिखला प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना वारंवार टार्गेट करणे आणि ब्लॅकमेल करण्याचा धंदा सुरू असल्याचा केला आरोप ;


वेध माझा ऑनलाइन।
बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला गावात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे, यावरून आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या मुद्द्यावरून दोन दिवसांपूर्वी दोन गटात जोरदार राडा झाला होता. सध्या यावरून गावात वातावरण चांगलंच तापलं आहे. गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावरून आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  

संजीवनी वाघ जरांगे पाटलांच्या जुन्या समर्थक आहेत, त्यामुळे जरांगे हेच असे कट रचू शकतात. अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक करून जसा दंगलीचा प्रकार केला, तसाच या ठिकाणी दंगलीचं प्रकरण शिजत आहे का? असा सवाल उपस्थित करतानाच  चिखला प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना वारंवार टार्गेट करणे आणि ब्लॅकमेल करण्याचा धंदा सुरू आहे, असा आरोप यावेळी नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.
  वाघमारे म्हणाले
बुलढाण्याची जी घटना आहे ते एखादं कटकारस्थान आहे का? याकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. कारण संजीवनी वाघ जरांगेच्या जुन्या समर्थक आहेत, त्यामुळे जरांगेच असे कट करू शकतात. जरांगेंची प्रसिद्धी संपलेली आहे, टीआरपी राहिला नाही, लोक येत नाही, समाजातील लोकांनी आता बाजूला केलंय. परंतु गर्दीची सवय आता लागलेली आहे. आम्ही त्या गावांमध्ये नेमकं काय घडलं त्याबद्दल माहिती घेतली आहे. सगळ्या गावाने ठरवलं होतं, फक्त पुतळ्याची जागा बदलायची होती. परंतु मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी गेले. त्यांची भाषा अतिशय चुकीची होती, असं यावेळी वाघमारे यांनी म्हटलं आहे.

जरांगेंच्या डोक्यात फक्त आमचं आणि तुमचंच आहे, असं करून त्यांना फक्त जातीय तेढ निर्माण करायची आहे. माझी गृह विभागाला विनंती आहे, जरांगे यांचे सीडीआर तपासा, त्या भागातील कोणत्या लोकांसोबत त्यांनी कॉन्टॅक्ट केला, यातून काही कट शिजत होता का? याकडे देखील गृह विभागाने लक्ष दिलं पाहिजे. या कटामध्ये जर मनोज जरांगे पाटलांचा सहभाग असेल तर त्यांच्या मुसक्या आवळा, अन्यथा येणारा काळ वाईट असेल, असं वाघमारे यांनी यावेळी म्हटलं आहे.

अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार यांचा सरकारला गंभीर इशारा ; काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या घटनेनंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अजित दादांच्या विमान अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत. अजित दादांच्या विमान अपघातानंतर मिळालेला ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता यावरून रोहित पवार यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. 

ब्लॅक बॉक्सच्या मुद्द्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, 
‘ब्लॅक बॉक्सचा फोटो आमच्याकडे आलेला आहे. तो कसा आहे? किती जळालेला आहे याचीही माहिती आमच्याकडे आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय याची कसा तपास करते याची आम्ही वाट पाहत आहोत. अधिवेशनाच्या निमित्ताने मी सरकारमधील लोकांना सांगू इच्छितो की, आम्ही आतापर्यंत फक्त 20 ते 30 टक्के माहिती दिली आहे. आमच्याकडे आणखी 70 टक्के माहिती आहे. त्यामुळे तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि जर त्यात काही काळंबेरं झालं तर सरकारला महागात पडेल.’
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी अहवालावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘अजित पवार पवार यांच्या विमान अपघाताचा 28 फेब्रुवारी आधीच प्राथमिक अहवाल येणार आहे. अजित पवार यांच्या विषयी दोन दिवसांपूर्वी सिविल एव्हियेशियने स्पष्ट स्वरुपात प्रसिद्धीपत्रक जारी केले असून त्यात माहिती दिली आहे.’ त्यामुळे आता या अहवालातून नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कुठे होणार पाऊस...? हवामान विभागाने 23 आणि 24 फ्रेब्रुवारी रोजी राज्यात अनके ठिकाणी पाऊस होण्याची वर्तवली शक्यता !

वेध माझा ऑनलाईन।
गेल्या काही दिवसांपासून हवामानात काहीसा बदल जाणवत आहे. वातावरणातील गारवा नाहीसा होऊन आता तापमानात वाढ होताना दिसत आहे. वातावरणात गरमी जाणवत असताना आता पुन्हा एकदा तापमानात घट होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील इतरही काही राज्यांत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवत असताना महाराष्ट्रातील एकूण 11 जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
कुठे होणार पाऊस?
हवामान विभागाने 23 तसेच 24 फ्रेब्रुवारी अशा दोन दिवसात राज्यात अने ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या शक्यतेनुसार 23 तारखेला मराठवाडा, विदर्भ तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी पासवाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या. आता 24 फेब्रुवारी रोजीदेखील राज्यातील सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, सातूर, धाराशीव, चंद्रपूर, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

आज सकाळी उंब्रज येथे घडली धाडसी चोरीची घटना ; सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, ८ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे ५ किलो चांदीच्या वस्तू लंपास ;

वेध माझा ऑनलाइन
 कराड तालुक्यातील उंब्रज येथे सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानासमोरच अत्यंत धाडसी चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने डोळ्याची पापणी लवते न लवते तोच सोन्या-चांदीचे दागिने आणि अडीच लाखांची रोकड असलेली बॅग पळवली आहे. या घटनेनं सराफा व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.चोरे रोड परिसरातील ‘श्री वाग्देवी ज्वेलर्स’ चे मालक गणेश यादव (चोरेकर) हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला सोनं, चांदी आणि रोकडने भरलेली बॅग लावली होती. त्यांनी दुकानाचं शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता, एका कुलपामध्ये जाणीवपूर्वक ‘मेन’ भरल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे कुलूप उघडण्यास त्यांना विलंब झाला.ते कुलूप उघडण्यात व्यस्त असल्याची संधी साधून, दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने क्षणात दुचाकीला अडकवलेली बॅग उचलली आणि दुचाकीवरून भरधाव वेगाने पसार झाला. गणेश यादव यांनी तातडीने आरडाओरडा करत चोरट्याचा पाठलाग केला, मात्र चोरटा वेगाने निसटून जाण्यात यशस्वी झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 
लंपास केलेल्या बॅगेत सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, ८ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे ५ किलो चांदीच्या वस्तू होत्या. या घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश ठाणेकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चोरीचे गांभीर्य ओळखून तातडीने श्वान पथकाला पाचारण केलं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, संशयित दुचाकीस्वाराचा माग काढला जात आहे.

एकनाथराव उशिरापर्यंत काम करु नका! अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा

वेध माझा ऑनलाइन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना अजित पवार यांच्या कार्यशैलीचे आणि प्रशासकीय कौशल्याचे कौतुक केले आहे. शिंदे यांच्या मते, अजित पवार यांनी महाराष्ट्राचा आर्थिक गाडा योग्य प्रकारे सांभाळला. ते प्रत्येक बैठकीत अधिकाऱ्यांना काटकसरीने खर्च करण्याचा सल्ला देत असत. महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्यांचा प्रदीर्घ अनुभव मोलाचा ठरला आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.अधिवेशनाच्या काळात अजित पवार सभागृहात पूर्णवेळ थांबायचे  विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायचे. त्यांच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष असायचे आणि कामाच्या गुणवत्तेत ते कधीच तडजोड करत नसत. प्रशासकीय कौशल्याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून त्यांची ओळख होती. सामान्य नागरिकांविषयी त्यांना कळकळ होती आणि नव्याने राजकारणात येणाऱ्यांसाठी ते एक आदर्श होते, असेही शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांना अजित पवारांनी उशिरापर्यंत काम न करण्याचा आणि तब्येतीची काळजी घेण्याचा वडीलकीचा सल्ला अनेकदा दिला होता.

फडणवीसांचे अजितदादांच्या बाबतीत मोठे विधान ; म्हणाले...राज्याने दादांच्या रुपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. विमान अपघातामध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला.
आज, 23 फेब्रुवारी पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. दिवंगत नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प मांडणार होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अजित दादांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी अजितदादा जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा काय म्हणाले हे देखील सांगितले आहे.
अजित दादांविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दादांना एखादा निर्णय पटला नाही तर स्पष्ट सांगयचे. मंत्रीमंडळातील प्रत्येक विषयाचा नीट अभ्यास दादा करायचे. राज्याने दादांच्या रुपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला. अजितदादांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवला. मी विरोधी पक्ष नेता होतो तेव्हा दादा मला मुख्यमंत्री बोलायचे. 12 वाजता कार्यक्रम असेल तर दादा 11.59ला हजर असायचे
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला एक जो चांगला मुख्यमंत्री मिळाला असता तो अजित दादांच्या रुपाने. ते आता आपल्यामध्ये नाहीत आणि मला विश्वास आहे की शेवटी नियतीने त्यांचे स्वप्न पूर्ण केलं असतं. त्यांच्यामध्ये ती क्षमता नक्की होती. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणीतं असतात. पण क्षमतेचा जर विचार केला मुख्यमंत्री पदाकरीता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्त्व अजित दादांचे होते. खरं तर मी असं म्हणेल की राजकारणामध्ये आपल्याकडे अनेक नेते आहेत अनेक दादा आहेत, सगळ्याच दादांनी चांगले काम केले. पण महाराष्ट्रामध्ये वसंत दादा आणि अजित दादा ही दोन नाव अशी आहेत की ज्यांना दादा म्हणून नेहमीच महाराष्ट्र हा त्यांच्या कामाकरता याठिकाणी लक्षात ठेवेल.
बारामतीचा अपराजित नेता म्हणून दादांकडे आपण पाहातो. जनतेचं जे प्रेम दादांना मिळालं ते निश्चितपणे कोणत्याही नेत्याकरीता त्यापेक्षा मोठा दुसराही ठेवा असू शकत नाही” असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता...जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मोठी शंका ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ ‘लिअरजेट ४५’ या विमानाला झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह अन्य चार सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा अपघात की घातपात अशी शंका अनेकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या याची चौकशी केली जात आहे. त्यातच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका व्यक्त केली आहे.आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे अजित पवारांच्या विमान अपघातांच्या मुद्द्यावर गाजणार आहे. आता याच मुद्द्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका आहे. त्या विमानाला भारतात उडण्याची परवानगी नव्हती. त्या विमानाने ५००० तासापेक्षा जास्त उडू नये, असे असतानाही ते विमान ८ हजारपेक्षा जास्त उडून झालं होतं, असा धक्कादायक खुलासा जितेंद्र आव्हाडांनी केला.

Saturday, February 21, 2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले दरे गावी ; जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव करणार का? ; जिल्ह्यात चर्चा; मंत्री गोरे म्हणाले...साताऱ्यात महायुती म्हणून पुढे जाऊ, अन्यथा चमत्कार करून दाखवावा लागेल ...

वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी दोन दिवस मुक्कामी आहेत. हा उपमुख्यमंत्र्यांचा विश्रांती दौरा असला तरीसुद्धा या ठिकाणी राजकीय चर्चांना उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरेगावी असल्यामुळे त्यांच्या पक्षाचे नेते किंवा राष्ट्रवादीचे काही नेते त्यांना भेटण्यासाठी येतात का याबाबत सध्या चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेकांचं लक्ष या घडामोडींकडे लागलेलं आहे.

सातारा जिल्हा परिषदेमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे. बहुमतासाठी 33 चा आकडा कोणालाच गाठता आला नाही. अशा परिस्थितीत भाजपला 27 जागा जिंकता आल्या आहेत, तर राष्ट्रवादीने 20 जागा जिंकल्या आहेत. तसेच शिवसेनेने 15 जागा जिंकल्या आहेत. यामुळे सत्ता कोण स्थापन करणार याकडे जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात पाहायला मिळते. यामुळे एकनाथ शिंदे या ठिकाणी आल्यानंतर काही घडामोडी घडतात का याबाबत सातारा जिल्ह्यात सध्या चर्चा सुरू आहे. 
साताऱ्यात राष्ट्रावादी काँग्रेसचे 20 आणि शिवसेनेचे 16 सदस्य एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यास ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ स्तरावर बोलत आहेत असं मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं आहे. साताऱ्यात महायुती म्हणून पुढे जाऊ. तसे न घडल्यास चमत्कार करून दाखवावा लागेल असंही जयकुमार गोरे म्हणाले.

Friday, February 20, 2026

यशवन्त आघाडीचे समर्थक सामाजिक कार्यकर्ते संजय चन्ने यांचा प्रभाग क्रमांक 8 च्या विकासासाठी पुढाकार ; नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना प्रभागातील कामाची दिली "भलीमोठी' लिस्ट ; सर्व कामे मार्गी लावू- नगराध्यक्ष यादव यांनी चन्ने यांना दिले आश्वासन

वेध माझा ऑनलाइन।
कराड शहराच्या प्रभाग क्रमांक 8 मधील प्रलंबित व आवश्यक ती कामे लवकरात लवकर सुरू करावीत अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते व यशवन्त विकास आघाडीचे समर्थक संजय चन्ने यांनी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना "त्या' कामांची भलीमोठी लिस्ट दिली आहे 
दरम्यान प्रभाग 8 च्या विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे चन्ने म्हणाले आहेत

दरम्यान सदर कामे  लवकरात लवकर मार्गी लावू आणि त्यासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष यादव यांनी त्यांना दिले आहे 

यशवन्त आघाडीचे समर्थक संजय चन्ने हे प्रभाग क्रमांक 8 मध्ये नवीन नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. संजय चन्ने हे शहरातील सजग सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांशी समनवय साधत त्याठिकाणी आपले सामाजिक काम चालू ठेवले आहे या प्रभागासाठी आवशक असणाऱ्या कामाची लिस्ट त्यांनी नगराध्यक्ष यादव याना सादर केली आहे ती कामे लवकरच सुरू व्हावीत यासाठी त्यांचा पाठपुरावा देखील सुरू आहे 

त्या एकूण कामामध्ये...
1) तवर गल्ली नाईकबा मंदिरापासून ते शिंदे गल्ली ते निकम पार्किंग पर्यंतचे कार्पेट करणे 
2) तवर  गल्ली शिंदे वाडा पर्यंत सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे
 3) कदम वाडा ते अंतर्गत दुबल गल्ली पेंढारकर बोळ येथे डांबरीकरण करणे  
 4) पंढरपूर अर्बन बँक ते बटाने मंदिर याठिकाणी डांबरीकरण करणे
 5)बटाने गल्लीतील बागवान बोळ ते आर्टिस्टिक टेलर पर्यंत काँक्रिटीकरण  करणे
 6)भैया बडे ते अण्णा वाघ एकांडे बोळ येथे कार्पेट करणे 

बंदिस्त गटारे  
1)होमकर घर ते महादेव मंदिर पर्यंत दोन्ही बाजूला बंधिस्त गटार करणे (अवसरे बोळ  
 2)खराडे वाडा ते संतोष सारडा पर्यंत दोन्ही बाजूला बंधिस्त गटारे करणे
3)विभूत  बोळ  ते जनकल्याण पतसंस्था पर्यंत दोन्ही बाजूला बंधिस्त गटार करणे 
 श्रोत्री घरासमोर ते निखिल शहा घरापर्यंत (पालकर बोळ) बंधिस्त गटार करणे

स्ट्रीट लाईट बसवणे 
 1) शुक्रवार पेठ रंगारवेस महादेव मंदिर परिसरामध्ये शेजारील मैदानात हायमास्ट लाईट बसवणे 
 2)बाळनाथ बुवा मठासमोर पोल उभारून स्ट्रीट लाईट बसवणे 
 3) सर्जेराव भोसले यांच्या घरासमोर पोल उभारून स्ट्रीट लाईट बसवणे 
 4)क्षीरसागर यांच्या घरासमोर एम एस ई बी चा डांब धोकादायक स्थितीत आहे तो नवीन उभारणे
प्रभाग क्रमांक 8 मध्ये सर्व सार्वजनिक शौचालयातील दुरुस्ती करणे तसेच दरवाजे, संडास भांडी, नळ, लाईट इत्यादी दुरुस्त करणे
प्रभाग क्रमांक 8  मध्ये शुक्रवार पेठ शिंदे गल्लीतील शौचालयाच्या बाजूस संरक्षक भिंतीवरून खाली उतरण्यासाठी पायऱ्या स्वरूपात घाट बांधणे

सी सी टीव्ही बसवणे 
1) शुक्रवार पेठ तवर गल्ली रंगारवेस चौकामध्ये 360 डिग्री सी सी टीव्ही बसवणे
 2)शुक्रवार पेठ फल्ले चौकामध्ये 360 डिग्री सी सी टीव्ही बसवणे
3)गुरुवार पेठ मध्ये बटाने गल्ली विभूते बोळा मध्ये एका पोलवर दोन सीसीटीव्ही बसवणे
 4)बालाजी मंदिर चौकामध्ये पत्रा चाळ नजीक एका पोलवर दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे
तसेच चावडी चौक ते नेहरू चौक व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार लेडीज टॉयलेट उभारणे....या व अशा अनेक कामांचा चन्ने यांनी दिलेल्या कामाच्या यादीत समावेश आहे 
दरम्यान सदर कामे लवकरच मार्गी लावू असे आश्वासन नगराध्यक्ष यादव यांनी त्यांना दिले आहे

संजय चन्ने हे नुकत्याच झालेल्या कराड पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून ओबीसी प्रवर्गातून यशवन्त आघाडीचे उमेदवार म्हणून उभे होते त्यांचा थोडक्या मताने विजय हुकला असला तरी निकालाच्या दुसऱ्यादिवसापासून त्यांनी त्या प्रभागाच्या विकासासाठी आपले योगदान देत आपले सामाजिक कार्य चालूच ठेवले आहे 
त्यांनी कराडच्या प्रभाग 8 साठी सुचवलेल्या कामांना गती मिळण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सातत्याने सुरू आहे

राहुल गांधी यांना उद्देशून धमकीचा व्हिडीओ ! ; घरात घुसून गोळी मारण्याची धमकी ! ;

वेध माझा ऑनलाइन।
राजस्थानातील कोटा शहरात एका तरुणाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उद्देशून धमकीचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केल्याची घटना समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित तरुणाने अत्यंत आक्रमक आणि हिंसक भाषा वापरत घरात घुसून गोळी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून वातावरण तापले आहे.

घटनेनंतर काँग्रेस पक्षाने तीव्र प्रतिक्रिया नोंदवत हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे. पक्षाकडून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. अद्याप पोलिसांनी अधिकृत कारवाईबाबत सविस्तर माहिती जाहीर केलेली नसली, तरी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान व्हिडीओमध्ये संबंधित तरुणाने स्वतःला करणी सेना आणि भाजप कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी असल्याचा दावा केला आहे. लोकसभेत काही काँग्रेस खासदारांनी सभागृहातील वर्तनाबाबत आक्षेपार्ह भूमिका घेतल्याचा आरोप करत त्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. विशेषतः राहुल गांधी यांना उद्देशून पुन्हा असा प्रकार घडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी उघड धमकी त्याने दिल्याचे दिसते.
या व्हिडीओमध्ये लोकसभेतील अध्यक्ष ओम बिर्ला  यांचा उल्लेख करत काही खासदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 24 तासांत कठोर पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा बँकिंग क्षेत्रातील पदाचा राजीनामा ; तब्बल 23 वर्षाची कारकीर्द पूर्ण करत दिला राजीनामा ;

वेध माझा ऑनलाईन।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रातील तब्बल तेवीस वर्षांची कारकीर्द पूर्ण करत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती जाहीर करत आपल्या व्यावसायिक प्रवासाचा एक महत्त्वाचा अध्याय संपल्याचे सांगितले आहे.


अमृता फडणवीस यांनी सुमारे 23 वर्षांपूर्वी अॅक्सिस बँक मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली होती. सुरुवातीच्या पदावरून पुढे जात त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत वरिष्ठ उपाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास केला. शाखा व्यवस्थापन, कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी विभाग तसेच इतर उच्चस्तरीय कामकाजाची जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे पार पाडली.
या दीर्घ कालावधीत त्यांनी केवळ प्रशासकीयच नव्हे तर धोरणात्मक पातळीवरही काम करत बँकेच्या विविध विभागांमध्ये योगदान दिले. अखेर वरिष्ठ उपाध्यक्ष या पदावर कार्यरत असताना त्यांनी आपला राजीनामा सादर केला. त्यामुळे त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
आपल्या निर्णयाची माहिती देताना अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर एक भावनिक संदेश पोस्ट केला. त्यांनी नमूद केले की, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून सुरू झालेला प्रवास आज कृतज्ञतेच्या भावनेने संपवत आहे. शाखा संचालनापासून कॉर्पोरेट बँकिंग आणि ट्रेझरीपासून ग्राहक संबंध विभागापर्यंत विविध अनुभव मिळाल्याने ही संस्था त्यांच्यासाठी कुटुंब, मार्गदर्शक आणि दुसरे घर ठरली.तसेच त्यांनी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी यांचे विशेष आभार मानले. सहकाऱ्यांचा पाठिंबा आणि नेतृत्वाचे मार्गदर्शन यामुळे हा प्रवास संस्मरणीय ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा अध्याय संपत असला तरी आयुष्यभर उपयोगी पडतील असे धडे आणि मैत्री सोबत घेऊन जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील हवामानात मोठा बदल ! ; 20, 21 आणि 22 फेब्रुवारीदरम्यान पावसाची शक्यता ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत असून 20, 21 आणि 22 फेब्रुवारीदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग यांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागांत हलक्या सरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मागील आठवड्यापासून थंडीचा प्रभाव कमी झाला असून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. सकाळी किंचित गारवा जाणवत असला तरी दुपारच्या वेळी तापमानात वाढ होत आहे. हवामानातील या सततच्या बदलामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या देखील डोके वर काढताना दिसत आहेत.
राजधानी मुंबई मध्ये सध्या वायू प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे. वातावरणात धुळीचे कण मोठ्या प्रमाणावर असल्याने दृश्यता कमी झाली आहे. अनेक नागरिकांना श्वसनास त्रास होत असून सर्दी, खोकला आणि अॅलर्जीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मास्क वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. प्रशासनाकडून प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी परिस्थिती चिंताजनकच आहे.
हवामानातील बदल आणि प्रदूषण यांचा दुहेरी परिणाम आरोग्यावर होत आहे. तज्ज्ञांच्या मते, तापमानातील चढ-उतारामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे
IMD च्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात 20 ते 22 फेब्रुवारीदरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. जेऊर येथे 14.5 अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवण्यात आले. दिवसभर तापमानात चढ-उतार होत असल्याने हवामानाचा अंदाज सतत बदलताना दिसत आहे.
दरम्यान, 22 फेब्रुवारी रोजी केरळ आणि तामिळनाडू  येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हिमाचल प्रदेश मध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हंगामी स्वरूप पाहायला मिळत असून काही भागात थंडी, काही ठिकाणी उन्हाचा चटका तर काही राज्यांत पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.


पेट्रोल , डिझेल महागले की स्वस्त झाले ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
20 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठा बदल झालेला नाही. दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवीन दर जाहीर केले जातात. आजही बहुतांश शहरांमध्ये दर स्थिर असल्याने वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार सुरू असले तरी देशांतर्गत दरांवर त्याचा मोठा परिणाम झालेला दिसत नाही.

गेल्या काही महिन्यांपासून इंधन दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महागाईवर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक खर्च वाढू न देणे हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे मानले जाते.
आज मुंबई येथे पेट्रोलचा दर 103.50 रुपये प्रति लिटर असून कालच्या तुलनेत केवळ 4 पैशांची घट झाली आहे. दिल्ली मध्ये पेट्रोल 94.77 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. बेंगलुरू येथे 102.55 रुपये, तर पटना येथे 105.23 रुपये प्रति लिटर असा दर आहे. कोलकाता आणि चेन्नई येथे दर स्थिर आहेत. 
डिझेलच्या दरातही विशेष बदल झालेला नाही. मुंबईत डिझेल 90.03 रुपये प्रति लिटर, दिल्ली 87.67 रुपये, चेन्नई 92.48 रुपये, कोलकाता 92.02 रुपये, बेंगलुरू 90.65 रुपये आणि पटना 91.49 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. बहुतांश शहरांमध्ये दर स्थिर राहिल्यामुळे वाहतूक क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला आहे.
मे 2022 नंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या कर कपातीमुळे इंधन दर तुलनेने स्थिर राहिले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या अंतिम किमती ठरवताना तीन प्रमुख घटक महत्त्वाचे ठरतात. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाची किंमत, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती आणि केंद्र व राज्य सरकारांचे कर (एक्साईज ड्यूटी व VAT).
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले किंवा घटले तरी कर संरचना आणि सरकारी हस्तक्षेपामुळे घरगुती बाजारात मोठे चढ-उतार दिसून येत नाहीत. त्यामुळे सध्या तरी वाहनधारकांसाठी इंधन दर स्थिर राहिल्याचे चित्र आहे.

पाकिस्तानचे 4 खेळाडू कायमचे बॅन ; क्रिकेट विश्वात खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन।
भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी क्रिकेटवरही दिसू लागला आहे. इंग्लंडमधील लोकप्रिय स्पर्धा हंगामापूर्वीच मोठ्या वादात सापडली आहे. भारतीय मालकी असलेल्या चार संघांनी पाकिस्तानी खेळाडूंवर बोली न लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

‘द हंड्रेड’च्या लिलाव प्रक्रियेपूर्वीच हा निर्णय अनौपचारिकरीत्या कळवण्यात आला. महिला खेळाडूंसाठी 11 मार्च आणि पुरुष खेळाडूंसाठी 12 मार्च रोजी लिलाव होणार आहे. मात्र भारतीय गुंतवणूक असलेल्या चार फ्रँचायझींकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूंना करारबद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

ज्या चार संघांबाबत हा निर्णय लागू असल्याचे सांगितले जाते, त्यामध्ये Manchester Originals, Oval Invincibles, Southern Brave आणि Northern Superchargers यांचा समावेश आहे. या चारही फ्रँचायझींमध्ये भारतीय उद्योगसमूहांची गुंतवणूक आहे.
सुमारे 18 देशांतील जवळपास 1,000 खेळाडू लिलावासाठी नोंदणीकृत असून त्यात पाकिस्तानी क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. मात्र संबंधित चार संघांकडून त्यांच्यावर बोली लावली जाणार नसल्याने त्यांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. याचा परिणाम आधीच (IPL) मध्ये दिसून येतो, जिथे पाकिस्तानी खेळाडूंना संधी दिली जात नाही. त्याचप्रमाणे SA20 आणि CPL सारख्या लीगमधील भारतीय मालकीच्या संघांकडूनही पाकिस्तानच्या खेळाडूंना करार दिले जात नसल्याचे दिसते.
पूर्वी ‘द हंड्रेड’मध्ये मोहम्मद आमीर, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, शादाब खान आणि हरिस रौफ यांसारख्या स्टार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मात्र 2026 च्या लिलावात परिस्थिती बदललेली दिसत आहे.
दरम्यान, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी देशाच्या आधारावर भेदभाव होणार नाही, असे संकेत दिले होते. तरीही सध्याच्या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली असून खेळ आणि राजकारण पुन्हा एकदा समोरासमोर आल्याचे चित्र आहे.

अजितदादा पवार विमान अपघात प्रकरणी मोठी अपडेट आली समोर;

वेध माझा ऑनलाइन।
बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भीषण विमान अपघातातअजित पवार यांचे निधन झाले. या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अपघातामागे तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू असतानाच आता नागरी उड्डाण मंत्रालय यांनी तपासाबाबत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 
अपघातग्रस्त ‘Learjet 45’ या विमानाचा ब्लॅक बॉक्स नवी दिल्ली येथे पोहोचला असून त्यातील डेटा यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात आला आहे. तपासाची जबाबदारी कडे असून आंतरराष्ट्रीय मानांकानुसार सखोल चौकशी सुरू आहे.
विमानातील डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर मधील माहिती मिळवण्यात यश आले आहे. हा रेकॉर्डर L3 कम्युनिकेशन्स कंपनीने तयार केलेला असून त्यातील माहितीचे विश्लेषण दिल्लीतील AAIB प्रयोगशाळेत सुरू आहे. या डेटामधून अपघाताच्या क्षणांपूर्वी विमानाची स्थिती, उंची, वेग आणि इतर तांत्रिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
मात्र कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर ला आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. हे उपकरण हॅनीवेल कंपनीचे असल्याने त्यातील माहिती पुनरप्राप्त करण्यासाठी परदेशी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे तपासाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
अपघातानंतर सरकारने संबंधित विमान कंपनी ‘VSR व्हेंचर्स’च्या कामकाजाचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.  4 फेब्रुवारी 2026 पासून ऑडिट सुरू आहे. यात नियमपालन, देखभाल प्रक्रिया, वैमानिकांचे प्रशिक्षण आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीची तपासणी केली जात आहे.
मंत्रालयाने स्पष्ट केले की 
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या नियमांनुसार अपघाताचा प्राथमिक अहवाल 30 दिवसांच्या आत प्रसिद्ध केला जाईल. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत देशातील इतर नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर्स आणि VVIP उड्डाणांसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानतळांचेही टप्प्याटप्प्याने ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Wednesday, February 18, 2026

"कराड संग्रहालय' उभे करण्यासाठी कराड नगरपरिषदेच्या वतीने जागा व इमारत उपलब्ध करून द्यावी ; कराडच्या जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टची मागणी ; "कराड संग्रहालयाच्या' माध्यमातून कराडच्या इतिहासाची महती लोकांसमोर येणार ! ;

वेध माझा ऑनलाइन।
कराडमधील जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने "कराड संग्रहालय' नावाचे दालन उभे करण्याचा मानस आहे यासाठी नगरपरिषदेच्या वतीने जागा व इमारत आम्हाला उपलब्ध करून द्यावी अशी मागणी  ट्रस्ट चे अध्यक्ष विनायक गरुड यांच्यावतीने कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

निवेदनात म्हटले आहे की
जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट हे गेली कित्येक वर्षं कराडमध्ये कार्यरत आहे अनेक सामाजिक ऐतिहासिक धार्मिक अशा अनेकविविध उपक्रमांना या ट्रस्ट च्या वतीने राबवण्यात येते तसेच याठिकाणी विविध मार्गदर्शनपर कार्यशाळा रक्तदान शीबीरे व स्वयंरोजगार कौशल्य मार्गदर्शनपर शिबिरे देखील राबवली जातात अनेक पौराणिक व ऐतिहासिक वस्तुचा संग्रह तसेच कराडच्या इतिहासाची महती सांगणारी अनेक ऐवजे या ट्रस्ट कडे संग्रही आहेत ज्याद्वारे कराडच्या प्राचीन ईतिहासावर प्रकाश टाकला जाऊ शकतो या व अशा अनेक बाबींद्वारे कराडच्या अनेक पैलूंना या कराड संग्रहालयाच्या माध्यमातून लोकांसमोर आणले जाऊ शकते 
सध्या हे संग्रहालय भाड्याच्या जागेत सुरू आहे तरी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी यात लक्ष घालून व पाठपुरावा करून आम्हाला नगरपरिषदेच्या माध्यमातून योग्य ते सहकार्य करावे असेही या निवेदनात म्हटलय

वर्षभरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे काम पूर्ण होणार - स्टेडीयमच्या कामाच्या दर्जाबाबत कसलेही कॉम्प्रमाईज करणार नाही- आ. भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सुचना -

वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिडासंकुलाचे काम अत्यंत चांगल्या पध्दतीने सुरू असून 2027 मध्ये स्टेडियमचे उद्घाटन घेता येऊ शकेल इतक्या गतीने काम चालू राहणार आहे. या स्टेडियमवर आयपीएल मॅचेस व्हाव्यात अशा दृष्टीने अत्याधुनिक स्टेडियम होणार असल्याची माहिती आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.

कराड नगरपालिका अधिकारी,सार्वजनिक बांधकाम अधिकारी व नगरसेवक यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी अधिकार्‍यांकडून स्टेडियमच्या कामकाजाची माहिती घेवून सूचना केल्या.  बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी कराड पालिका भाजपाचे विरोधी गटनेते विजय वाटेगावकर, नगरसेवक सुहास जगताप, शिवाजी पवार, माजी नगरसेविका सौ. स्मिता हुलवान, माजी नगरसेवक अतुल शिंदे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जयवंत पाटील, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, पालिकेचे अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीचे क्रिडा संकुल असते त्या पद्धतीचा क्रीडा संकुल आपल्या कराडमध्ये तयार होत आहे.  अत्यंत चांगल्या पद्धतीने काम सुरू असून  ठेकेदार, कंपनीच्या अधिकार्‍यांना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्याच्या अधिकार्‍यांना यावेळी दर्जाच्या बाबतीत कसलाही कॉम्प्रमाईज आपल्याला करून चालणार नाही तसेच विटांचा दर्जा,  इन्फ्रास्ट्रक्चर हे दर्जेदार असावे याबाबत आ. भोसले यांनी सुचना केल्या.  रनिंग ट्रॅक, इंटरनॅशनल ऑलिंपिक असोसिएशनच्या नॉर्म्स नुसार होतोय की नाही, मॅटचे टेक्चर वापरतात ज्या म्हणजे मॅटचा दर्जा कोणत्या  कंपनीकडून चांगला  मिळू शकेल याची माहिती आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी घेतली.  याठिकाणी पाच बॅडमिंटन कोर्ट करायचे असून जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा स्टेट लेवल टूर्नामेंट, नॅशनल लेवल टूर्नामेंट तरी होऊ शकतील आणि  हुआ कोर्ट करत असताना मटेरियल कुठल्या प्रकारचा वापरले पाहिजे कुठल्या कंपनीकडून घेतलं पाहिजे या सगळ्या बाबतीमध्ये सखोल चर्चा झाली.स्टेडियमचे काम चांगल्या पध्दतीने सुरू असून ठेकेदार कंपनीला बार चार्ट करण्याच्या सूचना आ. भोसले यांनी केल्या. काम वेळेत व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याला बार चार्ट सबमिट करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला केल्या.  त्याचा पाठपुरावा नगरपालिकेस करण्याच्या सूचना देण्यात आल्या.  तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, नगरसेवक अशी कमिटी केली तर यावर देखरेख करू शकतील.  भविष्य काळामध्ये टाईम बाउंडमध्ये हे काम पूर्ण करण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे, असेही यावेळी आ. भोसले यांनी सांगितले.

Tuesday, February 17, 2026

कराडला गुरुवारी साजरा होणार भव्य शिवजयंती सोहळा ; शहरात निघणार भव्य शोभायात्रा ; हजारो विद्यार्थी होणार सहभागी; सोहळ्यात विविध देखाव्यांच्या चित्ररथांचे आकर्षण ठरणार ;

वेध माझा ऑनलाइन/
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त कराड नगरपालिकेतर्फे गुरुवारी (दि. १९) शहरात भव्य आणि देखणी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण असून, विविध शाळांमधील सुमारे तीन हजार विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नगरपालिका व खाजगी मान्यताप्राप्त शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, प्रशासन अधिकारी रमेश कांबळे, तसेच शिवजयंती शिवयात्रा समितीचे प्रमुख अर्जुन कोळी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष यादव म्हणाले, शासकीय शिवजयंतीनिमित्त सकाळी आठ वाजता शिवतीर्थ दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास नगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. यावेळी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर भव्य शोभायात्रेला प्रारंभ होईल.

शोभायात्रा दत्त चौकातील शिवस्मारक येथून सुरू होऊन एस.टी. बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय, कन्या प्रशाला, चावडी चौक, आझाद चौक मार्गे पुन्हा दत्त चौक येथे येऊन समारोप होईल. कार्यक्रमाची सुरुवात बँड पथकाच्या दिमाखदार सादरीकरणाने होणार असून, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, नगरपालिका अधिकारी व सर्व मुख्याध्यापक यांचा सहभाग असेल. त्यानंतर विविध शाळांकडून साकारण्यात येणारे आकर्षक चित्ररथ आणि पारंपरिक पथके शोभायात्रेची शोभा वाढवणार आहेत.
यावेळी शिवजन्म सोहळा, शिवरायांचे बालपण आणि स्वराज्याची प्रतिज्ञा यांसारखे प्रसंग जिवंत केले जाणार आहेत. मावळा पथक, लेझीम पथक, दांडपट्टा पथक आणि पाच घोड्यांची मिरवणूक या शोभायात्रेला ऐतिहासिक तेज देणार आहेत. नगरपालिका शाळा क्रमांक ७ कडून ‘कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग’ साकारला जाणार असून पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी सहभागी होतील. शाळा क्रमांक १२ कडून ‘गड आला पण सिंह गेला’ हा हृदयस्पर्शी प्रसंग उभा केला जाणार आहे. शाळा क्रमांक ९ कडून अष्टप्रधान मंडळाचे दर्शन घडवले जाईल, तसेच धारकरी पथकाचे सादरीकरण होईल. एस.एम.एस. इंग्लिश मीडियम स्कूलकडून ‘स्वराज्याचे गुप्तहेर’ ही संकल्पना मांडली जाणार आहे. नूतन मराठी शाळेकडून महाराष्ट्रातील संत परंपरेचे दर्शन घडवले जाईल, तर आदर्श प्राथमिक शाळेकडून शिवराज्याभिषेक सोहळा साकारला जाईल. का. ना. पालकर शाळेकडून पावनखिंड प्रसंगाचे सादरीकरण करण्यात येणार असून, तलवार पथक विशेष आकर्षण ठरणार आहे.

Friday, February 13, 2026

मंत्री हसन मुश्रीफ यांचे महत्त्वपूर्ण विधान ; राजकीय वर्तुळात चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन ।अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वपूर्ण विधान करत राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली आहे.

बारामती येथे घडलेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत अपघाताबाबत शंका मांडल्या तसेच सविस्तर सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या मनातील शंका दूर व्हाव्यात यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले होते. या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून तपास प्रक्रिया सुरू आहे.

रोहित पवारांना उद्देशून बोलताना मुश्रीफ म्हणाले की काकांच्या निधनामुळे त्यांना जसे दु:ख झाले आहे तसेच आम्हालाही वेदना झाल्या आहेत. अपघाताबाबत आम्हीही काही शंका मांडल्या आहेत; मात्र पक्षातील अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. रोहित पवार यांनी सध्या दिलेल्या माहितीसंदर्भात ते पाठपुरावा करत आहेत, हे समजू शकतो; पण पक्षाच्या अंतर्गत घडामोडींमध्ये सहभाग घेणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

Monday, February 9, 2026

कराड उत्तरमध्ये आ.मनोजदादा घोरपडे यांचा करिष्मा ; भाजपची ताकद वाढली ;

वेध माझा ऑनलाइन।
आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्या साथीने कराड उत्तरेतील नऊ जिल्हा परिषद गटांपैकी सहा गटांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे कराड तालुक्यातील पाचपैकी चार जिल्हा परिषद गट भाजपकडे आले असून ही कामगिरी ऐतिहासिक मानली जात आहे.दरम्यान या निवडणुकीत मानसिंगराव जगदाळे व देवराजदादा पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे 
यानिमित्ताने कराड उत्तरमध्ये आमदार मनोजदादा घोरपडे यांचा करिश्मा पहायला मिळाला आहे 

कराड उत्तरमध्ये भाजप विरोधी राष्ट्रवादी अशीच प्रामुख्याने लढत पहायला मिळाली. पण आ. मनोजदादा घोरपडे आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी भाजप उमेदवारांना निवडून आणत उत्तरेत भाजपाला राजकीय वैभव मिळवून दिले आहे.
कोपर्डे हवेली गटातून भाजपाचे नेते रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडाचे निशान फडकावत या गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवाय याच गणातील दोन्ही अपक्ष उमेदवारांना त्यांना सोबत घेतले होते. अटीतटीच्या लढतील त्यांच्या पत्नी विद्या रामकृष्ण वेताळ विजयी झाल्या. कोपर्डे हवेली गणात राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील गटाचे सिध्दार्थ चव्हाण विजयी झाले. तर वाघेरी गणात भाजपच्या अनिता वेताळ विजयी झाल्या आहेत. या गटात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. पण येथे अपक्ष उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली. राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या स्थानावर गेला आहे.
सैदापूर जि.प.गटात मोठी चूरस पहायला मिळाली. भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फटका भाजप उमेदवारांना बसणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र या गटात जि.प.व गणातील दोन्ही उमेदवार भाजपाचे निवडून आले. या गटात राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाने स्वतंत्र उमेदवार दिले होते. शिवाय दोन अपक्ष उमेदवार रिंगणात होते. मतविभागणीचा फायदा भाजप उमेदवारांना झाला. या जि.प. गटात भाजपाचे सागर शिवदास पुन्हा विजयी झाले. तर यावेळी पहिल्यांदाच सैदापूर गण व हजारमाची गणात भाजपाचे दोन्ही उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील गट व काँग्रेसच्या गटाची या ठिकाणी पिछेहाट झाली आहे.
मसूर गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण याला सुरूंग लावण्याचे काम भाजपने केले आहे. जि.प.चे माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या ठिकाणी भाजपाचे लालासो जगदाळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सोमनाथ चव्हाण व अपक्ष कुलदीप क्षीरसागर यांनी चांगली लढत दिली पण त्यांना पराभवाचा समाना करावा लागला. मसूर गट व त्या अंतर्गत मसूर गण व वडोली भिकेश्वर हे दोन्ही गण अशा तिन्ही जागेवर भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या पाल जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप यांच्या मध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार माधवराव उर्फ मदनभाऊ काळभोर विजयी झाले.  पाल गणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रताप चव्हाण तर चरेगांव गणात भाजपच्या धैर्यजा माने विजयी झाल्या आहेत. दरम्यान आतापर्यंत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला पाल जिल्हा परिषद गट भाजपच्या ताब्यात घेण्यात आमदार मनोजदादा घोरपडे यांना यश आले आहे.
पाल जिल्हा परिषदेचे उमेदवार मदनभाऊ काळभोर हे जवळपास  997 मतांनी विजय जाहीर होताच कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला. कराड उत्तर मतदार संघातील पाल गट हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माजी शिक्षण सभापती तथा पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, भाजपकडून माधवराव उर्फ मदनराव  काळभोर, शिवसेना शिंदे पक्षाकडून नयनेश निकम हे प्रमुख उमेदवार असले तरी खरी लढत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप यांच्यात झाली. कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी पाल गटावर विशेष लक्ष केंद्रीत केले होते.
उंब्रज जिल्हा परिषद गटात बहुरंगी लढत झाली असली तरी खरी लढत ही राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप यांच्या मध्ये अत्यंत चुरशीची झाली. या लढतीत भाजपचे उमेदवार रणजित जाधव विजयी झाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे  उमेदवार संग्रामसिंह जाधव यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. दरम्यान भाजपचे उमेदवार रणजित जाधव यांचे उंब्रज येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कराड उत्तर मतदार संघातील उंब्रज गट हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र गतवर्षी विधानसभा निवडणूकीत भाजपचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांनी  माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पराभव करून कराड उत्तर मतदार संघावर भाजपचे वर्चस्व प्रस्थापीत केले होते. याच अनुषंगाने कोणत्याही परिस्थितीत उंब्रज जिल्हा परिषद गट भाजपकडे आला पाहिजे यासाठी आ. मनोजदादा घोरपडे यांनी स्वत: लक्ष घातले होते.
उंब्रज जिल्हा परिषद गटासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार रणजित जाधव पहिल्या फेरी पासून कमीजास्त प्रमाणात आघाडीवर होते. दोन्ही उमेदवार यांच्या मतामधील कमी जास्त होणारी आघाडी ही दोघा उमेदवाराबरोबरच कार्यकर्ते यांची धाकधुक वाढवणारी होती. दरम्यान भाजपचे उमेदवार रणजीत जाधव विजयी झाल्याचे समजताच उंब्रज येथे कार्यकर्त्यानी फटाकांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. 

खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचे लग्न ठरलं ; मुख्यमंत्री फडणवीसांच्या मध्यस्थीने जुळली सोयरीक;

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचे लग्न ठरलं आहे. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्न ठरलं आहे. सारंग लखानी हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंची मुलगी आता नागपूरची सून होणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने हि सोयरीक जुळली असल्याचं बोललं जात आहे.

सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियात पोस्ट शेअर करत रेवती सुळे यांच्या लग्नाची गोड़ बातमी दिली आहे. या पोस्टमध्ये स्मृती शिंदे यांनी सुप्रिया सुळे आणि सारंग लखाणी यांचा फोटो शेअर करत खाली कॅप्शन मध्ये लिहलं कि रेवती सुळे, सारंग लखानी आणि दोन्ही परिवाराचे अभिनंदन…. परंतु हे लग्न नेमकं कोणत्या दिवशी होणार आहे याबाबतची मात्र कोणतीही अपडेट अजून समोर आलेली नाही.

सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्याचं मिनी मंत्रालय असलेल्या सातारा जिल्हा परिषदेवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सातारा जिल्ह्यातील मतदारांनी 67.80 टक्के मतदान केलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कारभारी निवडण्यासाठी जिल्ह्यातील 21 लाख 94 हजार 110 मतदारांपैकी 14 लाख 87 हजार 554 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.  
सातारा जिल्हा परिषदेसाठी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत व्हायची. 2012 आणि 2017 ला राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला होता. यावेळी भाजपनं ताकदीनं निवडणूक लढवली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सातारा जिल्हा परिषद निवडणूक लढल्या. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं प्रचार साधेपणानं पार पडल्याचं पाहायला मिळालं. सातारा जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सातारा जिल्हा परिषदेचा निकाल त्रिशंकू लागला आहे. 

 सातारा जिल्हा परिषद गटनिहाय निवडणूक विजयी उमेदवार यादी
सातारा तालुका...पाटखळ:  शुभांगी जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस ) लिंब: सर्जेराव सावंत (भाजप)  खेड:  कामेश कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस)कोडोली(ओबीसी महिला): निता खरात (भाजप )कारी :  राजू भोसले (भाजप) शेंद्रे:  पूजा मोरे (भाजप) वर्णे:  राजेंद्र शेळके (स्वाभिमानी शेतकरी संघटना)राष्ट्रवादी पाठिंबानागठाणे:  अजित साळुंखे (भाजप) 

कराड तालुका... पाल:माधवराव काळभोर (भाजप)    उंब्रज:रणजीत जाधव (भाजप)   मसूर:लालासो जगदाळे (भाजप)   कोपर्डे हवेली: विद्या रामकृष्ण वेताळ (अपक्ष)  सैदापूर : सागर शिवदास (भाजप)  तांबवे: धनंजय ताटे (भाजप)   विंग(ओबीसी महिला) :शैलजा शिंदे (भाजप)  कार्वे: विजया थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस)  रेठरे बुद्रुक: प्रियांका साळुंखे (भाजप)  काले (ओबीसी महिला) : मनीषा पाटील (भाजप)येळगाव : उदयसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस )वारुंजी : सुनंदा पाटील (काँग्रेस)

पाटण तालुका... गोकुळ तर्फ हेळवाक:अशोक पाटील ( शिवसेना)     तारळे: स्वप्ना अभिजीत पाटील (शिवसेना)म्हावशी:राजेश पवार (भाजप)  मल्हार पेठ(ओबीसी महिला) :विजया कुंभार (शिवसेना)  मारुल हवेली (ओबीसी महिला): योगिता गिरी (शिवसेना)मंद्रुळकोळे:  मृणाल पाटील (शिवसेना) काळगाव: सुनीता चाळके (शिवसेना ) 

कोरेगांव तालुका.. पिंपोडे बुद्रुक :अमित चव्हाण (भाजप)     वाठार स्टेशन(ओबीसी महिला) :जयश्री भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)  सातारा रोड : सारिका फाळके (शिवसेना)  कुमठे : हणमंत जगदाळे (शिवसेना)  एकंबे :राजश्री भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)   वाठार किरोली :संध्या रजनी भोसले पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)  

जावळी तालुका... म्हसवे:  वसंतराव मानकुमरे (भाजप)   कुडाळ (ओबीसी महिला):  जयश्री गिरी (भाजप) कुसुंबी: कविता ओंबळे (शिवसेना)   वाई तालुका यशवंतनगर : दिनकर शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)     बावधन :   ऋतुजा शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)ओझर्डे :  वृषाली चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)भुईंज:  दिलीप बाबर (भाजप)

खंडाळा तालुका... शिरवळ :  उदय कबुले (राष्ट्रवादी काँग्रेस)  भादे :  संतोष साळुंखे (राष्ट्रवादी काँग्रेस ) खेड बुद्रुक :  ऋषिकेश धायगुडे (भाजप)

फलटण तालुका... तरडगाव :गिरीश बनकर (शिवसेना)  साखरवाडी पिंपळवाडी : रुपाली सरगर (शिवसेना)  विडणी :  ज्योती गौतम मोरे (शिवसेना)गुणवरे :ऋतुजा अभिजीत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)    बरड :वैशाली संदीप कांबळे (शिवसेना)   कोळकी : सह्यादी कदम (शिवसेना)   वाठार निंबाळकर : विष्णू किसन लोखंडे (भाजप)   हिंगणगाव :किरण निलेश नलवडे (भाजप) 

खटाव तालुका बुध... लता कर्णे (राष्ट्रवादी काँग्रेस)   कातर खटाव: धनंजय जाधव (भाजप)   खटाव: डॉ. प्रिया शिंदे  (भाजप)  निमसोड: संदीप मांडवे (राष्ट्रवादी काँग्रेस)   औंध(ओबीसी महिला) :  मनिषा फडतरे (राष्ट्रवादी काँग्रेस)पुसेसावळी: तेजस्विनी कदम (भाजप)   मायणी:  सुरज पाटील (भाजप)

माण आंधळी... सोनल गोरे (भाजप)  बिदाल :अलका जगदाळे (भाजप)   मार्डी:सोनाली पोळ (राष्ट्रवादी काँग्रेस)   गोंदवले बुद्रुक :शीतल रणपिसे (राष्ट्रवादी काँग्रेस)  कुकुडवाड : अनिल देसाई (राष्ट्रवादी काँग्रेस)  

महाबळेश्वर 
तळदेव जिल्हा परिषद गट  : 
अजित सपकाळ (शिवसेना)भिलार जिल्हा परिषद गट : संजय केळगणे  (राष्ट्रवादी काँग्रेस)

महाबळेश्वर तालुका... पंचायत समिती गण तळदेव पंचायत समिती गण :
 संजय शेलार (शिवसेना)वाडा कुंभरोशी पंचायत समिती गण : संजय मोरे (शिवसेना)

भिलार जिल्हा... परिषद गट : 
संजय केळगणे  राष्ट्रवादी काँग्रेसमेटगुताड पंचायत समिती गण : शकुंचला चोरमले राष्ट्रवादी काँग्रेस

सातारा तालुका... पंचायत समिती निकाल : 
पाटखळ पंचायत समिती गण : 
राहुल शिंदे (भाजप)शिवथर पंचायत समिती गण : राजेश पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

लिंब गट जिल्हा परिषद गट : 
सर्जेराव सावंत (भाजप)लिंब पंचायत समिती गण : प्रभाकर पवार  (भाजप)कोंडवे पंचायत समिती गण : महेश गाडे (भाजप)

खेड जिल्हा परिषद गट : 
कामेश कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस)खेड  पंचायत समिती गण : कोमल अजित गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस)क्षेत्र माहुली पंचायत समिती गण : राणी अजय पवार (राष्ट्रवादी काँग्रेस

कोडोली पंचायत समिती गण : 
राहुल कापले (राष्ट्रवादी काँग्रेस)संभाजीनगर पंचायत समिती गण : विजया साळुंखे ( भाजप) परळी पंचायत समिती गण : वसंतराव भंडारे (भाजप)


काले गटात दयानंद पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील विजयी ;

वेध माझा ऑनलाइन।
 संपूर्ण भागाचे लक्ष्य लागलेल्या काले गटात दयानंद पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी पावणे यांचा दणदणीत पराभव केला. 
मनीषा पाटील यांच्या पराभवासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकत्रित आले होते. 
दरम्यान मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेत  मनिषा पाटील यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी थेट जिल्हा परिषदेत धडक मारली आहे.

ऍड उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा तब्बल 4338 इतक्या मतांनी विजय ;

वेध माझा ऑनलाईन।
येळगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि स्व. विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह उंडाळकर यांनी तब्बल 4338 इतक्या मतांनी विजय मिळवत आपला बालेकिल्ला कायम राखला. याठिकाणी सख्खे चुलत बंधू अॅड. आनंदराव ऊर्फ राजाभाऊ उंडाळकर यांचा पराभव केला. खरं तर अपक्ष निवडणूक लढलेल्या राजाभाऊ उंडाळकर यांच्यामागे भाजपने ताकद उभी केल्याने निवडणुकीत मोठी रंगत आणली होती. राजाभाऊंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपने उदयसिंह उंडाळकर यांच्यावर नेम तर साधला होताच. मात्र उदयसिंह उंडाळकर यांच्या अचूक नियोजनामुळे भाजपचा डाव फसला.

खरं तर सातारा जिल्ह्यातील लक्षवेधी लढतीपैकी एक लढत म्हणून कराड तालुक्यातील येळगाव जिल्हा परिषद गटाकडे पाहिले जाते . मागील वेळी प्रमाणे यावेळीही उंडाळकर बंधूंमध्ये निवडणूक लागल्याने संपूर्ण परिसरात मागील महिन्यापासूनच निवडणुकीचे जोरदार वार होते. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या राजाभाऊंना आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या भाजपने पाठींबा दिल्याने निवडणूक रंगतदार अवस्थेत होती. आजच्या मतमोजणीत सुद्धा पहिल्या फेरीपासून उदयसिंह उंडाळकर आणि राजाभाऊ उंडाळकर यांच्या अगदीच कमी मतांचा फरक होता. मात्र अखेर उदयदादांनी विजय खेचुन आणला

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांचा पराभव ; मृणाल पाटील या 22 वर्षीय युवतीचा विजय ;

वेध माझा ऑनलाइन।
पाटणमधून मोठी राजकीय बातमी समोर येतेय. मुंद्रळ कोळे गटातून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील  यांच्या पत्नी प्राची पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्राची पाटील याना अवघ्या २२ वर्षाच्या मृणाल पाटील यांनी पराभव केला आहे. मृणाल पाटील या शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उभ्या होत्या, तर प्राची पाटील भाजपच्या चिन्हावर उभ्या होत्या. अटीतटीच्या या लढतीत शंभूराज देसाई यांनी नरेंद्र पाटील यांच्यावर मात केली. निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळीच नरेंद्र पाटील यांच्या पत्नीच्या विरोधात अवघ्या २२ वर्षांच्या मृणाल पाटील यांना तिकीट देऊन शिवसेनेने अचूक डाव टाकला होता. युवा मतदार २२ वर्षांच्या मृणाल पाटील यांच्याकडे आकर्षित झाला. तसेच शंभूराज देसाई यांची ताकद आणि पारंपारिक शिवसैनिकांच्या मतदारांच्या साथीच्या जोरावर मृणाल पाटील यांनी निवडणुकीत आघाडी घेतली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच मृणाल पाटील या आघाडीवर होत्या. त्यांची हि आघाडी शेवट्पर्यंत टिकली 

Monday, February 2, 2026

पार्थ पवार राज्यसभेवर जाणार!

वेध माझा ऑनलाईन।
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षातून महत्त्वाचा निर्णय समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाची पुनर्रचना सुरू असून आता त्यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. 

राज्यसभेच्या रिक्त जागेवर पार्थ पवारांचे नाव :
अजित पवार  यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती. 31 जानेवारी रोजी झालेल्या शपथविधीनंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला, ज्यामुळे उच्च सभागृहातील जागा रिक्त झाली. या रिक्त जागेवर आता त्यांचा मुलगा पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची जोरदार शक्यता व्यक्त होत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या कार्यकाळाची अजून दोन वर्षे बाकी असून त्यांची मुदत 4 जुलै 2028 रोजी संपणार होती. मात्र, त्या जागेवर पाठवण्याऐवजी पार्थ पवार यांना सहा वर्षांच्या पूर्ण टर्मसाठी असलेल्या दुसऱ्या जागेवर पाठवण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. लवकरच ही जागा भरली जाणार असून त्या दृष्टीने पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण ; बिघाड लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली ;

वेध माझा ऑनलाइन
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना होण्याआधीच हा बिघाड लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण रद्द करण्यात आले असून त्या आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. 

उड्डाणाआधीच आढळला तांत्रिक दोष :
भाजप नेत्या पंकजा मुंडे या सध्या मराठवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांसाठी त्या छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या. मात्र हेलिकॉप्टरने आकाशात झेपावण्यापूर्वीच वैमानिकाच्या लक्षात तांत्रिक बिघाड आला.
तत्काळ सुरक्षेचा विचार करून उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याचे सांगण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही समस्या उड्डाणाच्या आधीच लक्षात आल्यामुळे प्रवास सुरू होण्याआधीच आवश्यक खबरदारी घेण्यात आली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विमानात ५ लोक होते की ६ ? उज्ज्वल निकम यांचा सर्वात मोठा खुलासा!

वेध माझा ऑनलाईन।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यात तर्कवितर्क आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही नेत्यांकडून हा अपघात घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात असताना, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी या चर्चांना थेट आव्हान देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना अशा गंभीर घटनेला वेगळी कलाटणी देणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

उज्ज्वल निकम यांनी अजित पवार  यांच्या अपघातासोबतच जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत होणाऱ्या दाव्यांवरही भाष्य केले. पुराव्यांशिवाय केवळ संशयाच्या आधारावर निष्कर्ष काढणे हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये राजकारण टाळले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. 

त्या विमानात नेमके किती प्रवासी होते? :
विमानात 5 की 6 लोक होते, या प्रश्नावर उज्ज्वल निकम म्हणाले की, खासगी विमानाच्या प्रत्येक उड्डाणाची अधिकृत नोंद विमान प्राधिकरणाकडे असते. मात्र, त्या विमानात सहा प्रवासी होते, असा कोणताही अधिकृत पुरावा आजवर समोर आलेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता तपास यंत्रणांच्या निष्कर्षांची वाट पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अपघाताच्या वेळी विमानात मोठ्या प्रमाणात इंधन असल्याने आग तीव्र झाली आणि त्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे यामागे कट असल्याचे म्हणणाऱ्यांनी ठोस पुरावे सादर करणे आवश्यक आहे. केवळ संशय व्यक्त करून विषयाला वेगळी दिशा देणे योग्य नाही,

भुजबळ म्हणाले ; सरकार मधून बाहेर पडायचे असा विचार दादांनी केला असेल हे कदापिही आम्हाला वाटत नाही ;

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे. शरद पवार यांच्यासह सर्वत महत्त्वाच्या नेत्यांनी येत्या 12 तारखेला दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार होते अशी माहिती दिली आहे. या विलिनीकरणाबाबत अजित पवार यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या होत्या अशीही माहिती समोर आली आहे. मात्र आधी नगरपंचायत त्यानंतर महानगर पालिका आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे हे विलिनीकरण होऊ शकले नव्हते. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. दरम्यान सरकार मधून बाहेर पडायचे असा विचार दादांनी केला असेल हे कदापिही आम्हाला वाटत नाही असेही भुजबळ म्हणाले...

नाशिकच्या येवला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरील प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटले की, दोन्ही ठाकरे बंधू जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे असं वाटत आहे. परंतु अशा काही चर्चा झाल्या का याबाबत माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले की माझ्याशी कधीही अजित पवार त्याबाबत कधीही बोलले नाहीत. जे काही करायचे ते आम्हाला बीजेपी सोबत राहून करायचे आहे. असं काही करायचे असले तर त्याबाबत आम्हाला भाजपला विचारावे लागेल. कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही घ्यायचे याबाबत भाजपच्या काही ज्येष्ठ मंडळींना विचारावं लागेल. कारण काय बोलणं झालं होतं हे माझ्यासहीत कोणालाही माहीत नाही.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, ज्यांच्या सोबत यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना तर विचारावे लागेल ना. सरकार मधून बाहेर पडायचे असा विचार दादांनी केला असेल हे कदापिही आम्हाला वाटत नाही. आम्ही उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड केली. आता त्यांच्या नेतृत्वात चर्चा होतील ना, आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असे काही नाही. राजकारणाच्या गोष्टी कधी होतात कधी नाही होत
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांची शपथ घेत एकत्रि‍करणाची चर्चा झाली होती अशी माहिती दिली आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, बोलणं झालं असेल, परंतु आता परिस्थिती बदलली, नेते बदलले आहेत. सुनेत्रा ताईंना माहिती होती का ? आता त्यांच्या नेतृत्वाखालील बाकी नेते देखील चर्चा करतील. शेवटी हा निर्णय सामुदायिक रीतीने घ्यावे लागेल. त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागे भाजपला सुद्धा उभे राहणे आवश्यक आहे.

कराडात सुनील तटकरेंच्या "त्या' वक्तव्यामुळे राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या तर्कवितर्कांना मिळाला अखेरचा पूर्णविराम ; तटकरे म्हणाले...आम्ही एन डी ए सोबतच राहणार...आणखी काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाइन।
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का, या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थेट उत्तर देत सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली असून पक्ष मजबूत आहे. नेता निवडीचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांचा आहे.” त्यामुळे आता तटकरेंच्या या वक्तव्यामुळे राज्यात सुरु असलेल्या तर्कवितर्कांना अखेरचा पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान आम्ही एनडीएमध्येच आहोत आणि तिथेच राहणार आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर कराड येथील प्रीतिसंगम येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी चव्हाण साहेबांच्या विचारांचा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दादांच्या नेतृत्वाखाली पुढे वाटचाल करत राहणार आहे.

विलिनीकरणाच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका :
शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत वक्तव्य केल्यानंतर या मुद्द्यावर प्रतिक्रिया विचारली असता सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं की, “विलिनीकरणाबाबत साहेबांनी जे काही म्हटलं आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, जनतेने विधानसभेत त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.”

तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, “प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बोलत असतो. मात्र, एनडीएमध्ये भाजपसोबत सत्तेत राहण्याची आमची भूमिका ठाम आहे.”

 “आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि राहणार” :
याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, या थेट प्रश्नावर सुनील तटकरे  म्हणाले, “आम्ही भाजपप्रणीत एनडीएमध्ये आहोत आणि सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि देश गतिमान करण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली असून, ती दादांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याचं आमचं कर्तव्य आहे.”

तसेच विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना तटकरे यांनी काँग्रेसवरही टीका करत म्हटलं की, “काँग्रेसचा महापौर कोणत्या गटाचा होणार, याची काळजी त्यांनी घ्यावी. नंतर आमच्याकडे पाहावं.” 

दरम्यान आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी सुनेत्रा पवार पुढाकार घेणार का, या प्रश्नावर तटकरे यांनी स्पष्ट भूमिका घेत म्हटलं की, “दादा असल्यापासून आम्ही एनडीएमध्ये आहोत, म्हणजे भाजपसोबत सत्तेत आहोत. या निर्णयाला जे अनुकूल आहेत, त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा.” मात्र आता तटकरेंच्या या सर्व रोखठोक वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली ;

वेध माझा ऑनलाइन।
आज कराड येथील प्रीतिसंगम येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. 
सन्मानीय वेणुताई यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाला भेट देत, स्व. यशवंतराव चव्हाण साहेब व वेणुताई चव्हाण यांच्या पुतळ्यांना त्यांनी पुष्पहार अर्पण केला. 

तटकरे यांची पोस्ट व्हायरल; 
आमचे नेते तसेच राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार  यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळाचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आणि प्रेरणादायी होते. अजितदादा अनेक वेळा कराड येथे येऊन समाधीस्थळी दर्शन घेत, महाराष्ट्राच्या भाग्यविधात्यासमोर नतमस्तक होत आणि त्यांच्या विचारांतून समाजाभिमुख कार्यासाठी नवी ऊर्जा घेत असत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली.

यावेळी  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील  खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील  उपस्थित होते.तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदी उपस्थित होते

Sunday, February 1, 2026

फडणवीस म्हणाले...विलीनीकरण ठरलंच नाही!...तर, अजित पवारांनी आम्हाला कळवले असते,;

वेध माझा ऑनलाइन।
राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा तीव्र झाली आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती असा दावा केला होता. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा खोडून काढला. विलीनीकरणाबाबत कोणतीही तारीख निश्चित झाली असती किंवा चर्चा झाली असती, तर अजित पवारांनी आम्हाला कळवले असते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात शशिकांत शिंदे यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. दादांनी भाजप नेतृत्वाशी चर्चा केली होती आणि फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर विलीनीकरणाचा निर्णय घेण्याचे सुचवले होते, असा गौप्यस्फोट शिंदेंनी केला. शिंदेंनी दादांची शपथ घेऊन आपला दावा खरा असल्याचे सांगितले.
सध्या अजित पवारांच्या गटाचे नेतृत्व सुनेत्रा पवार करत आहेत. फडणवीस यांनी असेही स्पष्ट केले की, विलीनीकरणाचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत विषय आहे, परंतु कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी महायुतीशी चर्चा करावी. या विषयावर वेगवेगळी विधाने येत असल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम कायम आहे.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार उद्या (सोमवारी)तातडीने कराड दौऱ्यावर ;

वेध माझा ऑनलाइन।
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार सोमवारी तातडीने कराड दौऱ्यावर येणार आहेत. स्व यशवन्तराव चव्हाणसाहेब यांच्या समधीस्थळी नतमस्तक होऊन राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आपल्या नव्या इनिंगची सुरूवात करणार आहेत. त्या प्रथमच यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी येत आहेत. सुनेत्रा ताईंच्या या दौऱ्यामुळे दिवंगत अजित पवार यांच्या प्रीतिसंगमावरील आठवणींना उजाळा मिळणार आहे.



उंब्रजच्या विकासाचा फैसला करणारी ही निवडणूक – उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे.

वेध माझा ऑनलाइन
शिवसेना आज राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. लाडकी बहीण योजना ही देशातील पहिली आणि महत्त्वाची योजना ठरली असून लाडक्या बहिणींनी भरभरून प्रेम दिले आहे. येणाऱ्या काळात रस्ते, पिण्याचे पाणी, पर्यटन आणि नागरी सुविधांसाठी शिवसेना विकासकामांना गती देईल,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उंब्रजच्या भविष्याचा फैसला करणारी हीच निवडणूक असल्याचे त्यांनी  सांगितले.
   कराड तालुक्यातील उंब्रज येथील बाजारपेठ तळावर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाईन संबोधीत केले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, सभेला सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवसेनेचे उमेदवार ॲड. महादेव साळुंखे, नयन निकम, सोमनाथ चव्हाण यांच्यासह पंचायत समिती गणांतील उमेदवार, हजारो शिवसैनिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले उंब्रजला नगरपंचायत दर्जा, घनकचरा व्यवस्थापन, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दळणवळणाच्या सुविधा आणि उड्डाणपूल या प्रश्नांना वर्षभरात न्याय देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. या सभेला प्रत्यक्ष येणार होतो; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने मनात प्रचंड वेदना आहेत. मी सातारा जिल्ह्याचा सुपुत्र आहे. कर्मभूमी ठाणे-मुंबई असली तरी जन्मभूमी सातारा आहे. या मातीशी माझी नाळ कायम जुळलेली असून सातारा जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. छत्रपतींचा भगवा हाती असलेल्या शिवसेनेला मतदान करून जिल्हा परिषदेत भगवा फडकवा.मी गरिबी जवळून पाहिली आहे, आईची काटकसर अनुभवली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना कोणालाही बंद करता येणार नाही. शब्द द्यायचा नाही आणि दिला तर मागे घ्यायचा नाही—हीच मला बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. 

उद्योगमंत्री उदय सामंत  म्हणाले, 
ही स्व. यशवंतराव चव्हाण यांची भूमी आहे. याच भूमीचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सन्मानासाठी देशातील पहिली लाडकी बहीण योजना आणली. त्यामुळे दर महिन्याला भाऊबीज साजरी होते. महाराष्ट्राच्या विकासात शिवसेनेचा मोठा वाटा असून विकासकामे वेगाने सुरू आहेत.
उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या ५० लाखांनंतर उर्वरित १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासनही उदय सामंत यांनी दिले. तसेच नगरपंचायत व्यापारी संकुल, घनकचरा व्यवस्थापन, पाणी प्रश्न व इतर नागरी सुविधा या सर्व प्रश्नांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वर्षभरात पूर्णविराम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव म्हणाले...
उंब्रज परिसरातील समस्या उद्योग मंत्र्यांसमोर मांडताना उंब्रजच्या गावाच्या वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत बदल होणे आवश्यक आहे.याची फाईलही नगर विकास विभागाकडे प्रलंबित आहे. उंब्रज गावात घनकचर्‍याची गंभीर समस्या आहे तातडीने इथे घनकचरा निर्मुलन प्रकल्प होणे आवश्यक आहे. शिवाजीनगर व लगतच्या चार गावांमधे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो तातडीने मार्गी लागावा. छ.शिवाजी महाराज स्मारकासाठी वाढीव निधी देण्यात यावा.उंब्रजमधील व्यापार्‍यांसाठी व्यापारी संकुल  व्हावे तसेच तासवडे औधोगिक वसाहतीत स्थानिक युवकांना नोकरीत प्राधान्य मिळावे अशा प्रकारच्या अनेक मागण्या मांडल्या.यावर उद्योगमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्यावतीने हे सर्व नागरी प्रश्न लवकरच मार्गी लागतील अशी जाहीर घोषणा केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे ग्रामीण भागातील महत्व अधोरेखित करताना यादव म्हणाले या माध्यमातुन केंद्र व राज्य सरकार विविध योजना व विकास तळागाळात पोहोचवत असते.ग्रामीण भागाशी नाळ असलेल्या ना.एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहुन गट व गणातील शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे अवाहन केले.
अॅड. महादेव साळुंखे यांनी आभार मानले.