वेध माझा ऑनलाईन।
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून महत्त्वाचा निर्णय समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाची पुनर्रचना सुरू असून आता त्यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यसभेच्या रिक्त जागेवर पार्थ पवारांचे नाव :
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती. 31 जानेवारी रोजी झालेल्या शपथविधीनंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला, ज्यामुळे उच्च सभागृहातील जागा रिक्त झाली. या रिक्त जागेवर आता त्यांचा मुलगा पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची जोरदार शक्यता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या कार्यकाळाची अजून दोन वर्षे बाकी असून त्यांची मुदत 4 जुलै 2028 रोजी संपणार होती. मात्र, त्या जागेवर पाठवण्याऐवजी पार्थ पवार यांना सहा वर्षांच्या पूर्ण टर्मसाठी असलेल्या दुसऱ्या जागेवर पाठवण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. लवकरच ही जागा भरली जाणार असून त्या दृष्टीने पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
No comments:
Post a Comment