काल शुक्रवारी कराड पालिकेची अर्थसंकल्पीय सभा कराडच्या प्रीतिसंगम येथे स्व चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी पार पडली यावेळी सत्ताधारी व विरोधक (भाजप) नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली वाटेगावकर व अल्ताफ शिकलगार यांच्यात यावेळी
जोरदार शाब्दिक चकमक झाली
मात्र यावेळी नगराध्यक्ष यादव यांनी दोन्ही बाजूच्या नगरसेवकांना शांत करत सभा पुढे नेण्याचा प्रयत्न केला
दरम्यान या अर्थसंकल्पाला विरोधीपक्ष नेते विजय वाटेगावकर यांनी भर सभेत "बोगस' म्हटले याचा धागा पकडत नगरसेवक अल्ताफ शिकलगार आणि वाटेगावकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली
यावेळी शिकलगार मधेच उठून बोलले की
एकीकडे आम्ही सहकार्य करू असे म्हणायचे आणि दुसरीकडे चुका दाखवायच्या आणि अर्थसंकल्प बोगस असल्याचे बोलायचे आम्हाला मूर्ख समजायच चाललंय का?
यावर उत्तर देताना वाटेगावकर म्हणाले
आम्हाला जनतेने सत्ताधारी लोकांना प्रश्न विचारायलाच पालिकेत निवडून पाठवले आहे आम्ही तुम्हा सत्ताधार्यांना प्रश्न नाही विचारायचा... तर मग कोणाला विचारायचा? असे म्हणत हा अर्थसंकल्प व आकडेवारी बोगस असल्याचा पुनरुच्चार पुन्हा 2 ते 3 वेळ यावेळी केला यावरून सत्ताधारी व वाटेगावकर यांच्यात जोरदार खडाजंगी पहायला मिळाली
या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी नेते वाटेगावकर म्हणाले...
हा अर्थसंकल्प व आकडेवारी बोगस वाटते त्यामुळे आम्ही सुचवलेले बदल त्यात झाले पाहिजेत... तसेच आमच्या पार्टी च्या इतर नगरसेवकांनी सांगितलेल्या सूचनांनुसार त्यामधून बदलदेखील केले गेले पाहिजेत... आणि आम्हाला ते दाखवुनच हे बजेट पुढे पाठवले जावे असे आम्ही सत्ताधार्यांना सांगितले आहे... आणि तसे झाले तर ठीक,नाहीतर आम्हाला ते मान्य नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले
या सभेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला पण माझा आवाज हे लोक कधीच दाबू शकणार नाहीत असेही ते या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले
लोकहितासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ शहरातील लोकांचे नुकसान होऊ देणार नाही
असेही त्यांनी स्पष्ट केले
या सभेबाबत मी वारंवार माहिती मागत होतो पण आम्हाला या सभेबाबत माहिती दिली नाही तर फक्त सभेपुर्वीची नोटीसच दिली गेली आम्हीदेखील नगरसेवक आहोत त्यामुळे आम्हालाही याबाबत कल्पना देणे, विश्वासात घेणे गरजेचे होते असेही वाटेगावकर यावेळी म्हणाले
दरम्यान भाजपच्या शिवाजी पवार अजय पावसकर व दिग्विजय डूबल या तिघांनी यावेळी सत्ताधार्यांना आपले प्रश्न विचारले आणि पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी काही सूचना देखील केल्या तसेच शिकलगार आणि वाटेगावकर यांच्यातील झालेल्या बाचाबाचीवेळी वाटेगावकर यांच्या बाजूने भाजपचे हेच तिघे खंबीरपणे बोलताना दिसले
तर शिकलगार यांच्या बाजूने सत्ताधारी नगरसेवक उभे राहिलेले दिसले
दरम्यान शिकलगार आणि वाटेगावकर यांच्यातील झालेल्या या वादावादीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे
No comments:
Post a Comment