वेध माझा ऑनलाइन।
आर्थिक वर्ष 2025-26 संपण्याच्या उंबरठ्यावर असताना मार्च महिना काही दिवसांवर आला आहे. या काळात बँकांमध्ये व्यवहारांची मोठी गर्दी असते. मात्र सण आणि सार्वजनिक उत्सवांमुळे देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आर्थिक कामांचे नियोजन आधीच करणे आवश्यक ठरणार आहे.
RBI ने जाहीर केलेल्या अधिकृत कॅलेंडरनुसार मार्च 2026 मध्ये विविध राज्यांमध्ये सण-उत्सवांमुळे बँकांना सुट्ट्या असतील. या सुट्ट्या सर्व राज्यांत समान नसून स्थानिक सणांनुसार बदलतात. काही दिवशी देशभर बँका बंद राहतील, तर काही ठिकाणीच कामकाज थांबेल. 1 मार्च रोजी रविवार असल्याने देशातील सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. 2 मार्चला होलिका दहनानिमित्त अनेक राज्यांत कामकाज बंद राहील, तर 3 मार्चला धुलिवंदनामुळे व्यवहार होणार नाहीत. 4 मार्चला होळीच्या दुसऱ्या दिवशी नवी दिल्ली, चंदीगड, कानपूर आणि अहमदाबादसह काही शहरांमध्ये बँका बंद असतील. 13 मार्चला चपचार कुटमुळे ऐझवालमध्ये सुट्टी जाहीर आहे.17 मार्चला शब-ए-कद्र निमित्त काही राज्यांत बँक सेवा उपलब्ध राहणार नाही. 19 मार्चला गुढीपाडवा, तेलगू नववर्ष आणि पहिली नवरात्री असल्याने महाराष्ट्र, नागपूर, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद येथे बँका बंद राहतील. 20 मार्चला ईद-उल-फित्र (रमजान) आणि जुमात-उल-विदा निमित्त जम्मू, श्रीनगर आणि केरळमध्ये सुट्टी असेल. 21 मार्चला रमजान-ईदनिमित्त देशभर सुट्टी असण्याची शक्यता वर्तवली आहे. 26 मार्चला रामनवमीमुळे अनेक राज्यांत कामकाज थांबेल, तर 27 मार्चला रामनवमीच्या उत्तरार्धात भोपाळ, पाटणा आणि भुवनेश्वरमध्ये बँका बंद असतील. 31 मार्चला महावीर जयंतीनिमित्त नवी दिल्ली, मुंबई (बेलापूर), जयपूर आणि कानपूर येथे बँका बंद राहतील.
आरबीआयच्या नियमांनुसार सर्व सुट्ट्या प्रत्येक राज्यात लागू होत नाहीत. स्थानिक सणांनुसार सुट्टीची अंमलबजावणी केली जाते. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टनुसार या सुट्टीच्या दिवशी चेक क्लिअरिंग, ओव्हर-द-काउंटर व्यवहार, रोख रक्कम भरणे किंवा काढणे यांसारखी कामे करता येणार नाहीत. त्यामुळे महत्त्वाचे व्यवहार वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे . शाखा बंद असल्या तरी डिजिटल सेवा सुरळीत सुरू राहतील. नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि यूपीआयद्वारे पैशांची देवाणघेवाण करता येईल. बँकेचे अधिकृत अॅप नेहमीप्रमाणे कार्यरत असेल. रोख रकमेची गरज असल्यास एटीएममधून पैसे काढता येतील, तसेच सीडीएमच्या माध्यमातून रोख जमा करता येईल. कोणत्याही अनपेक्षित बदलांसाठी बँकेकडून येणाऱ्या सूचनांवर आणि संदेशांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment