सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे रामकृष्ण वेताळ यांच्यावर जिल्हा कार्यालयातून पुढील पाच वर्षासाठी हकालपट्टी केल्याचे पत्र काढण्यात आले होते. मात्र अवघ्या एका महिन्यातच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रामकृष्ण वेताळ यांना किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी स्थान दिले आहे. त्यामुळे भाजपकडून वेताळ यांचा पुन्हा सन्मान झाला आहे
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षात जिल्हा परिषद निवडणुकीत अंतर्गत धूसफूस पाहायला मिळाली. या मतदारसंघातील कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी विद्या वेताळ यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे विद्या वेताळ यांनी आपला अपक्ष अर्ज भरला होता. विद्या वेताळ यांना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आव्हान होते. मात्र रामकृष्ण वेताळ यांच्या झंजावाता पुढे आणि त्यांच्या रणनीतीमुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा पराभव केला. विद्या वेताळ अपक्ष बाजी मारणाऱ्या सातारा जिल्ह्यातून एकमेव उमेदवार ठरल्या आहेत.
पत्नी विद्या वेताळ यांच्या विजयानंतर रामकृष्ण वेताळ कोणता निर्णय घेणार याकडे राजकीय पक्षांचे व नेत्यांचे लक्ष लागून होते. भाजपा कडून अन्याय झाल्याच्या भावनेतून रामकृष्ण वेताळ शिवसेना किंवा अन्य पर्याय सोबत येतील असे सांगितले जात होते. परंतु आज भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रामकृष्ण वेताळ यांना किसान मोर्चाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा बहुमान करत पुन्हा पक्षात सामील केले आहे.
No comments:
Post a Comment